scorecardresearch

Ram Navami Stock Market Holiday : शेअर बाजार बंद राहणार, अर्धा दिवस सोन्याची विक्री होणार नाही

रामनवमीच्या निमित्ताने शेअर बाजार बंद राहणार आहे. मुंबई शेअर बाजार आणि एनएसहीसुद्धा बंद राहणार आहे. विशेष म्हणजे आज २७ मार्चला आठवड्याच्या पहिल्याच दिवशीही सुरुवातील शेअर बाजार निर्देशांकात वाढीसह व्यापार करीत होता.

Share Market
Share Market

गुरुवार ३० मार्च रोजी रामनवमीच्या सुट्टीमुळे शेअर बाजारासह कमोडिटी मार्केट बंद राहणार आहे. बीएसईने आपल्या वेबसाइट bseindia.com वर २०२३ मध्ये इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह आणि एसएलबी विभागांसाठी १५ सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. भगवान राम हा विष्णूचा सातवा अवतार मानला जातो. या दिवशी प्रभू रामाचा जन्म झाला, असे मानतात. या दिवशी देशातील करोडो लोक उपवास करतात. त्याच कारणास्तव शेअर बाजार बंद ठेवण्यात आला आहे.

रामनवमीला शेअर बाजाराला सुट्टी

रामनवमीच्या निमित्ताने शेअर बाजार बंद राहणार आहे. मुंबई शेअर बाजार आणि एनएसहीसुद्धा बंद राहणार आहे. विशेष म्हणजे आज २७ मार्चला आठवड्याच्या पहिल्याच दिवशीही सुरुवातील शेअर बाजार निर्देशांकात वाढीसह व्यापार करीत होता. खरं तर शुक्रवारी मोठी घसरणी नोंदवल्यानंतर आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार गडगडेल, असं तज्ज्ञांना वाटत होतं, पण शेअर मार्केट हिरव्या चिन्हावर उघडला. यूएस फ्युचर्सच्या संकेतामुळे भारतीय बाजाराला पाठिंबा मिळतोय.

भारतात पुढील शेअर बाजाराला सुट्टी कधी?

NSE आणि BSE मंगळवारी ४ एप्रिल रोजी महावीर जयंतीनिमित्त बंद राहतील. या दिवशी सर्व विभागांमध्ये कोणताही व्यवहार होणार नाही.

एमसीएक्स दिवसभर बंद राहणार का?

भारतातील पहिले मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) ३० मार्च रोजी सकाळच्या सत्रात व्यापार करणार नाही, परंतु संध्याकाळच्या सत्रात ५ ते ११:५५ पर्यंत ११:३०/११:५५ पर्यंत व्यापार करेल. जोपर्यंत कमोडिटी डेरिव्हेटिव्ह विभागाचा संबंध आहे, तोपर्यंत ट्रेडिंग फक्त संध्याकाळच्या सत्रात होईल.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 19:22 IST

संबंधित बातम्या