Ratan Tata’s Successors Meet Tata’s next Generation : टाटा समुहाचे माजी चेअरमन, उद्योगपती व समाजसेवक रतन टाटा यांचं बुधवारी (९ ऑक्टोबर) रात्री मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा हे त्यांच्या व्यवसायांइतकेच परोपकारी कामांमुळे चर्चेत असायचे. टाटा समुहाचे प्रमुख म्हणून त्यांची जगभर ओळख असली तरी एक समाजसेवक म्हणूनही त्यांना लोक ओळखतात. टाटा समुहाचं साम्राज्य विस्तारण्यात रतन टाटांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा सन्सने नवी उंची गाठली आणि जगभर आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. तर टाटा ट्रस्टच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्यासाठी, देशातील गरिबांचं जीवनमान सुधारण्यासाठी देखील ते आयुष्यभर झटत राहीले. हे सगळं करत असतानाच ते प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहीले. साधी राहणी, उच्च विचारसरणीसह सर्वोच्च दर्जाचं काम करण्यासाठी ते ओळखले जातात.
Premium
Ratan Tata’s Successors : कोण होणार रतन टाटांचा उत्तराधिकारी? टाटा समुहाची धुरा कोण सांभाळणार?
Ratan Tata Family Scions : रतन टाटांचा उत्तराधिकारी म्हणून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावांची चर्चा होत असते.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-10-2024 at 01:33 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSटाटा समूहTATA Groupमराठी बातम्याMarathi Newsरतन टाटाRatan Tataलोकसत्ता प्रीमियमPremium Loksatta
मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratan tata passes away who will be his successors meet next generation asc