Share Market Crash after Diwali Sensex nifty fall : दिवाळीच्या सुट्टीनंतर ४ नोव्हेंबर रोजी शेअर बाजार नियमित वेळेत सुरू झाला. मात्र बाजार सुरू होताच सेन्सेक्स व निफ्टीमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. सकाळी ९.५० च्या सुमारास सेन्सेक्स ८६० अंकानी घसरून ७८,८६४.५७ व स्थिर होता तर निफ्टी २७३ अंकांनी घसरून २४,०३१ वर स्थिर झाला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झाल्यास बँकिंग फायनान्स व आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक व फेड रिझर्व्हच्या बैठकीमुळे ही घसरण झाल्याचं सांगितलं जात आहे.

सेन्सेक्समध्ये १.८ टक्क्यांची घसरण झाल्यामुळे त्यावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटल ५.५६ लाख कोटी रुपयांनी कमी झालं आहे. सेन्सेक्समध्ये देशातील सर्वात मोठ्या कंपन्या, जसे की रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफशी बँक आणि सन फार्मा ४२० अंकांच्या घसरणीसह खूपच खाली राहिले. एल अँड टी, अ‍ॅक्सिस बँक, टीसीएस आणि टाटा मोटर्सची देखील काही प्रमाणात घसरण झाली आहे.

Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Sharad Pawar on Jarange Patil
Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मला आनंद, कारण…”
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

बीएसई सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी २५ शेअर्स घसरले आहेत. तर, केवळ चार शेअर्समध्ये वाढ दिसून येत होती. तर एका शेअरची स्थिती ‘जैसे थे’ अशी आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये सर्वाधिक २.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वात मोठी घसरण सन फार्माच्या शेअर्समध्ये झाली आहे. या शेअरची पाच टक्क्यांनी घसरण जाली आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्सही २.६४ टक्क्यांनी घसरले आहेत.

हे ही वाचा >> Initial Public Offer: गुंतवणूकदारांचा ‘आयपीओ’द्वारे २०२४ मध्ये विक्रमी १.२२ लाख कोटींचा भरणा

दुसऱ्या बाजूला एनएसईच्या २,६७३ शेअर्सपैकी ४३० शेअर वधारले आहेत. तर, २,१९३ शेअर्सची घसरण झाली आहे. ५० शेअर्समध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही.या घसरणीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. मीडिया क्षेत्राची २.६६ टक्के, तेल व वायू क्षेत्रालची २.६३ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

हे ही वाचा >> बाजारातली माणसं- बाजाराला तालावर नाचवणारा समभाग : टाटा डिफर्ड

अमेरिकेतील निवडणुकीचे परिणाम

अमेरिकेत ५ नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. अशा परिस्थितीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या व विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस विरुद्ध रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार तथा अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड यांच्यात यंदा चुरशीची लढत होत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे.

Story img Loader