कोची : स्कोडा ऑटो इंडियाने भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे. युरोपियन तंत्रज्ञानाला भारतातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे धोरण कंपनीने स्वीकारले आहे. याचाच भाग म्हणून कंपनीने अत्याधुनिक वैशिष्टांसह नवीन कुशाक एसयूव्ही सादर केली आहे.
यावेळी स्कोडा ऑटोचे मुख्याधिकारी क्लॉस झेलमर म्हणाले की, स्कोडा ऑटोच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याच्या धोरणात भारताचे महत्त्वाचे स्थान आहे. कंपनीने नवीन कुशाक भारतात सादर करून यावर शिक्कामोर्तब केले आहे. कुशाकची निर्यात भारतातून इतर आशियायी देश आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये होत आहे. आता नवीन कुशाकमध्ये अत्याधुनिक रचनेसह इन्फोटेनमेंट आणि ड्रायव्हर असिस्टन्सची वैशिष्टे समाविष्ट आहेत. त्यामुळे मोटार चालविताना अधिक आरामदायी आणि सुरक्षित अनुभव मिळतो. नवीन कुशाकमुळे युरोपबाहेरील आमच्या बाजारपेठेत अतिरिक्त मागणी आणि वाढीची संधी निर्माण झाली आहे.
या प्रसंगी स्कोडा ऑटो इंडियाचे संचालक आशीष गुप्ता म्हणाले की, युरोपियन तंत्रज्ञानाला भारतातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि ते संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी अधिक सुलभ करणे हे आमचे ध्येय आहे. आज शहरे आणि प्रदेशांमधील सीमा धूसर होत आहेत. ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडींची पूर्तता करणाऱ्या मोटारी सादर करून आम्ही या अपेक्षा पूर्ण करत आहोत. नवीन कुशाकच्या माध्यमातून आम्ही खऱ्या ऑटोमॅटिक गाड्यांची श्रेणी सादर केल्या आहेत. युरोपियन अभियांत्रिकीनुसार सर्वांत महत्त्वाची सुरक्षा, आराम, रचना आणि सुविधांचा समावेश नवीन मोटारीत आहे.
गुगलद्वारे समर्थित एआय कंपॅनियन
नवीन कुशाकमध्ये १०.१ इंचाची (२५.६ सेमी) इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. त्यात वायरलेस अँड्राईड ऑटो आणि अॅपल कारप्लेची सुविधा आहे ही सिस्टीम नेक्स्ट-जनरेशन इन्फोटेनमेंट सिस्टीमद्वारे आधुनिक बनवण्यात आली असून भारतीय ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समर्थित एक परिवर्तनकारी इन-कार डिजिटल अनुभव प्रदान करते. प्रगत डिजिटल आर्किटेक्चरवर आधारित ही नवीन सिस्टीम कार्यक्षमता, कनेक्टिव्हिटी आणि सहजसोप्या ग्राहक संवादात वाढ करते. यामुळे आधुनिक भारतीय ड्रायव्हिंगच्या गरजांनुसार तयार केलेला एक अखंड आणि आकर्षक इन-केबिन अनुभव मिळतो.
स्कोडा सुपर केअर
नवीन कुशाक स्कोडा सुपर केअर पॅकेजसह येते: यामध्ये सर्वोत्तम दर्जाची ४ वर्षे किंवा १ लाख किलोमीटरची स्टँडर्ड वॉरंटी, तसेच ४ वर्षांची रोडसाइड असिस्टन्स सेवा मिळते. याव्यतिरिक्त, ग्राहकांना दोन वर्षांपर्यंत किंवा ३० हजार किलोमीटरपर्यंत चार मोफत सर्व्हिसेसचा लाभ मिळतो. वॉरंटी आणखी दोन वर्षांसाठी वाढवता येते, ज्यामुळे एकूण कव्हरेज सहा वर्षांपर्यंत होते. याला पुढे सहा वर्षांची गंजरोधक वॉरंटी आणि तीन वर्षांच्या पेंट वॉरंटीची जोड दिली आहे.
