मुंबई : गुरुवारच्या सत्रातील अस्थिर व्यवहारानंतर, एचडीएफसी बँक आणि इतर ब्लू-चिप कंपन्यांच्या समभागांमधील घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी जवळजवळ स्थिर राहिले. अमेरिका-इराण चर्चेपूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने बाजारात मर्यादित श्रेणीत व्यवहार झाले.
सेन्सेक्स २७.४६ घसरून ८२,२४८.६१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ८२,५७९.१६ अंशांचा उच्चांक आणि ८१,९७०.४७ हा नीचांक गाठला. दुसरीकडे निफ्टी १४.०५ वधारून २५,४९६.५५ पातळीवर बंद झाला.
जागतिक भांडवली बाजारांमधील मिश्र संकेत आणि वाढत्या सावधगिरीमुळे सुरुवातीच्या वाढ टिकवून ठेवण्यास देशांतर्गत निर्देशांक अपयशी ठरले. अमेरिका-इराण अणु-चर्चेपूर्वी, तसेच अमेरिकेच्या सुरुवातीच्या बेरोजगारी दाव्यांसह आणि देशांतर्गत आघाडीवर सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) आकडेवारी जाहीर होणार असल्याने बाजारात नफा-वसुली सुरू झाली, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले सेन्सेक्समध्ये, ट्रेंट, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि अॅक्सिस बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली, तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, सन फार्मा, अदानी पोर्ट्स, मारुती आणि भारती एअरटेल यांचे समभाग वधारले.
सेन्सेक्स ८२,२४८.६१ -२७.४६
निफ्टी २५,४९६.५५ १४.०५
डॉलर ९०.९२ १ पैसा
खनिज तेल – ७०.१८ -०.९५

