Share Market Today Sensex Nifty Rise Outlook And Expert Analysis On Geopolitical Impact: गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धाचा भारतीय शेअर बाजाराला जोरदार फटका बसला होता. यामुळे भारतीय गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. पण हे युद्धा आता निवळण्याचे संकेत दिसत असल्याने कालपासून जागतिक शेअर बाजारांसह भारतीय शेअर बाजार सावरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
काल सुमारे सुमारे १४०० अंशांच्या वाढीसह बंद झालेला मुंबई शेअर बाजार (सेन्सेक्स) आज ६५१.९५ अंशांच्या वाढीसह ७४,७२०.४१ अंशांवर उघडला आहे. तर ४०० अंशांच्या वाढीसह बंद झालेला निफ्टी ५० निर्देशांक सुमारे २५० अंशांच्या वाढीसह उघडला आहे.
- सकाळी ९:३० वाजता, सेन्सेक्स ९२६.०५ अंशांनी (किंवा १.२५ टक्क्यांनी) वधारून ७४,९९०.४५ वर पोहोचला, तर निफ्टी ३०४.१५ अंशांनी (किंवा १.३३ टक्क्यांनी) वाढून २३,२१६.५५ वर पोहचला होता.
- सकाळी १०:०० वा. सेन्सेक्स १,२१९.५८ अंशांनी (किंवा १.६५ टक्क्यांनी) वधारून ७५,२८८.०३ वर पोहोचला होता, तर निफ्टी ३८९.८० अंशांनी (किंवा १.७० टक्क्यांनी) वाढून २३,३०२.२० वर व्यवहार करत आहे.
- सकाळी ११:०० वा. सेन्सेक्स १,४३९.६९ अंशांनी (किंवा १.९४ टक्क्यांनी) वधारून ७५,५०८.१४ वर पोहोचला, तर निफ्टी ४६०.७५ अंकांनी (किंवा २.०१ टक्क्यांनी) वधारून २३,३७३.१५ वर व्यवहार करत होता.
- दुपारी १२:०० वा. सेन्सेक्स १,५६७.१० अंशांनी (किंवा २.१२ टक्क्यांनी) वधारून ७५,६३५.५५ वर पोहोचला, तर निफ्टी ४८९.८५ अंशांनी (किंवा २.१४ टक्क्यांनी) वधारून २३,४०२.२५ वर व्यवहार करत होता.
- दुपारी १:०० वा. सेन्सेक्स १,४७६.०९ अंशांनी (किंवा १.९९ टक्क्यांनी) वधारून ७५,५४४.५४ वर, तर निफ्टी ४६४.४५ अंशांनी (किंवा २.०३ टक्क्यांनी) वधारून २३,३७६.८५ वर व्यवहार करत होते. यामध्ये सुमारे ३,०७५ शेअर्समध्ये वाढ झाली, ८२४ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १४० शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
- दुपारी ०२:०० वाजता सेन्सेक्स १,६०७.११ अंशांनी (किंवा २.१७ टक्क्यांनी) वधारून ७५,६७५.५६ वर पोहोचला, तर निफ्टी ५१७.६५ अंशांनी (किंवा २.२६ टक्क्यांनी) वधारून २३,४३०.०५ वर व्यवहार करत होता.
बाजार तेजीसह बंद
२५ मार्च रोजी भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकानी दमदार कामगिरी केली. बाजार बंद होताना, सेन्सेक्स १,२१६.३४ अंशांनी (किंवा १.६४ टक्क्यांनी) वधारून ७५,२८४.७९ वर पोहोचला, तर निफ्टी ३९२.७० अंशांनी (किंवा १.७१ टक्क्यांनी) वाढून २३,३०५.१० च्या पातळीवर बंद झाला. या सत्रात सुमारे २,७४८ शेअर्समध्ये वाढ झाली, १,२६७ शेअर्समध्ये घसरण झाली आणि ११७ शेअर्सचे भाव स्थिर राहिले.
“…तर शेअर बाजारात मोठी तेजी येण्यास वाव”
शेअर बाजारातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणतज्ञ, व्ही. के. विजयकुमार म्हणाले, “युद्धाचा तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे बाजारात आशेचा किरण परत येत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणच्या सरकारकडून आलेल्या वक्तव्यांवरून हा संघर्ष लवकरच संपुष्टात येऊ शकतो असे दिसते. विशेषतः, इराणने “अहिंसक जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकतात” असे पुन्हा एकदा स्पष्ट केल्याने भारताच्या ऊर्जेसंबंधीच्या चिंता कमी होण्यास मदत होईल.”
“या सकारात्मक भू-राजकीय घडामोडींमुळे ब्रेंट क्रूडच्या दरात मोठी घसरण होऊन तो सुमारे ९८ डॉलरवर आला आहे. सोन्याच्या दरात सुधारणा झाली आहे. जर ही सकारात्मक घडामोड टिकून राहिली, तर बाजारात मोठी तेजी येण्यास वाव आहे. परंतु ही सुधारणा टिकवून ठेवण्यासाठी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) त्यांची मोठी आणि सातत्यपूर्ण विक्री थांबवली पाहिजे”, असे ते म्हणाले.
शेवटी त्यांनी नमूद केले की, “नजीकच्या काळात, लार्ज कॅप्सच्या तुलनेत मिड आणि स्मॉल कॅप्स अधिक उसळी घेऊ शकतात, कारण या सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात एफआयआय (FII) विक्रीची चिंता नाही.”
