Stock Market Crash September 2026 Worst Performance: गेल्या काही महिन्यांपासून सतत कोसळत असलेल्या भारतीय शेअर बाजारासाठी सप्टेंबर २०२६ हा महिना आठ वर्षांतील सर्वात वाईट महिना ठरला आहे. सप्टेंबरमध्ये निफ्टी ५० निर्देशांक जवळपास ६% घसरला. हा घसरणीचा सलग आठवा आठवडा होता. जी गेल्या २५ वर्षांतील सर्वात मोठी घसरण आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, अनेकांचे पोर्टफोलिओ अर्ध्यावर आले आहेत.
सप्टेंबर महिन्यात निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. यामागे परदेशी गुंतवणूकदारांनी वाढलेली विक्री, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कमकुवत झालेला रुपया आणि ५% च्या वर गेलेले अमेरिकन बाँड यील्ड ही प्रमुख कारणे आहेत.
दोन्ही प्रमुख निर्देशांकांवर मुख्य दबाव परदेशी गुंतवणूकदारांकडून आला. त्यांनी सप्टेंबरमध्ये आपली दोन महिन्यांची खरेदीची मालिका संपवली आणि भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केली. एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, त्यांनी केलेल्या या विक्रीमुळे २०२६ मध्ये परदेशी गुंतवणुकीची विक्री २.५ लाख कोटी रुपयांचा पुढे गेली आहे.
ब्लू एस्टर कॅपिटल आणि क्रेबाको ग्लोबलचे संस्थापक, सीईओ आणि फंड मॅनेजर सिद्धार्थ सोगानी जैन म्हणाले, “सप्टेंबरमधील घसरण ही एक सामान्य घसरण नव्हती. निफ्टी सुमारे ६ टक्क्यांनी घसरला, जो बाजारासाठी गेल्या आठ वर्षांतील सर्वात वाईट सप्टेंबर होता.” भारतीय शेअर बाजारासाठी जागतिक अनिश्चितता सर्वात मोठी समस्या आहे. ५% पेक्षा जास्त अमेरिकन बाँड यील्डचा परतावा, मजबूत डॉलर, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि रुपयाची कमजोरी यामुळे भारत अधिक असुरक्षित बनला आहे.
अमेरिकेतील वाढलेल्या बाँड यिल्ड परताव्यामुळे उदयोन्मुख शेअर बाजारांतील गुंतवणूक करण्याचे आकर्षण कमी होते, कारण जागतिक गुंतवणूकदार डॉलर मालमत्तेतून अधिक चांगला परतावा मिळवू शकतात. भारतासाठी, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे आयातीचा खर्च वाढण्याचा, महागाईचा दबाव आणि चालू खात्यावरील ताणाचा धोकाही वाढतो.
दुष्काळाचा फटका बसणार?
अरिहंत कॅपिटल मार्केट्सच्या संस्थात्मक प्रमुख अनिता गांधी म्हणाल्या की, पुढील मोठी परीक्षा दुसऱ्या तिमाहीतील कमाईची असेल. त्यांच्या मते कच्च्या तेलाच्या किमती आणि भू-राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरतील, तर अनेक राज्यांमधील कमकुवत मान्सूनची स्थिती देखील बाजारातील भावनांवर परिणाम करू शकते. सणासुदीच्या दिवसांतील मागणीमुळे एफएमसीजी आणि ऑटो कंपन्यांना मदत होऊ शकते, परंतु हा आधार टिकेल की नाही हे मागणीच्या ताकदीवर अवलंबून असेल. याबाबत इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तात उल्लेख आहे.
