Stock Market Rally RBI MPC Meeting Crude Oil Price FPI Short Covering: भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्ससह इतर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये गेल्या आठवड्यातील व्यवहारांच्या सर्व चार दिवसांत मोठी घसरण झाल्याचे पाहायल मिळाले होते. मात्र, कालपासून सुरू झालेल्या आठव्यातील पहिल्या दोन दिवसांत सेन्सेक्सने जोरदार मुसंडी मारत १००० हून अधिक अशांची झेप घेतली आहे. निफ्टी ५० निर्देशांकात गेल्या दोन दिवसांत ३०० हून अधिक अंशांची भर पडली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना लाखो कोटी रुपयांचा लाभ झाला आहे.

आरबीआयच्या चनलविषयक समितीच्या तीन दिवसीय बैठकीला कालपासून (सोमवार) सुरुवात झाली असून या बैठकीचा अंतिम निर्णय उद्या जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत भारतीय शेअर बाजारातील तेजीची कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, दलाल स्ट्रीटवर अशी चर्चा आहे की आरबीआयच्या चनलविषयक समितीच्या बैठकीत व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो. याव्यतिरिक्त, मध्य पूर्वेतील पुरवठा साखळीतील अडथळे कमी झाल्यामुळेकच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या खाली आले आहेत. याचबरोबर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून ‘शॉर्ट कव्हरिंग’ झाली आहे. हे घटक भारतीय शेअर बाजारातील तेजीला चालना देणाऱ्या प्रमुख कारणांपैकी एक आहेत.

आरबीआयच्या एमपीसी बैठकीबाबत अपेक्षा

अमेरिकेतील महागाई आणि ‘नॉन-फार्म पेरोल’ची आकडेवारी सकारात्मक आल्यामुळे, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह ऑक्टोबर २०२६ च्या बैठकीत व्याजदर वाढवणार नाही, अशी शक्यता बळावली आहे. यामुळे आरबीआयवरील दबाव कमी होऊ शकतो. विशेषतः आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची दमदार आकडेवारी पाहता आरबीआयची स्थिती आधीच समाधानकारक आहे.

कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या खाली

“आरबीआयच्या एमपीसी बैठकीच्या निकालापूर्वी भारतीय शेअर बाजारात दिसून आलेली सततची तेजी ही क्रूड तेलाच्या किमतीतील घसरणीशी जोडली जाऊ शकते. मध्यपूर्वेतील काही देशांनी क्रूड तेलाचा नव्याने पुरवठा सुरू केल्यानंतर किमतीत झालेली वाढ ओसरली आणि कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या खाली आली”, असे बसव कॅपिटलचे संदीप पांडे यांनी सांगितले.

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून ‘शॉर्ट कव्हरिंग’

FPI 150 निर्देशांकाच्या ‘हीटमॅप’चे विश्लेषण करताना सेबी-नोंदणीकृत बाजार विश्लेषख अनुज गुप्ता यांनी सांगितले की, या निर्देशांकात समाविष्ट असलेल्या ५० टक्क्यांहून अधिक स्टॉक्सचे व्यवहार सध्या तेजीसह होत आहेत. यापैकी बहुतांश स्टॉक्सनी त्यांच्या मागील बंद भावाच्या तुलनेत मोठी वाढ नोंदवली आहे, जे भारतीय शेअर बाजारात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार खरेदी करत असल्याचे दर्शवते.

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या खरेदीचे विश्लेषण करताना बसव कॅपिटलचे संदीप पांडे म्हणाले, “बाजारात मोठी घसरण होत असताना परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ‘शॉर्ट पोझिशन्स’ घेतल्या होत्या. आता भारतीय बाजार ‘ओव्हरसोल्ड झोन’मध्ये गेल्यामुळे ते आपल्या पोझिशन्स ‘शॉर्ट-कव्हर’ करत आहेत. त्यामुळे, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून होणारी ही ‘शॉर्ट-कव्हरिंग’ हे देखील भारतीय शेअर बाजारातील सलग दोन सत्रांमधील तेजीचे एक प्रमुख कारण आहे.”