Jio Platforms Share Price Today target buy sell hold: जिओ प्लॅटफॉर्म्सने गेल्या आठवड्यात शेअर बाजारात दमदार पदार्पण केले होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी कंपनीने आपले पहिले त्रैमासिक निकाल जाहीर केले. त्यानंतर सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात जिओ प्लॅटफॉर्म्सच्या शेअर्सच्या किमतीत ३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

आज जिओ प्लॅटफॉर्म्सचे शेअर्स १४६५ रुपयांवर उघडले आणि १४७५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. शुक्रवारी हे शेअर्स १४३१ रुपयांवर बंद झाले होते.

हे निकाल जिओ प्लॅटफॉर्म्सच्या २८ ऑक्टोबर रोजी शेअर बाजारातील पदार्पणानंतर आले आहेत. कंपनीचे शेअर्स प्रति शेअर १३५८ रुपयांच्या किमतीवर सूचीबद्ध झाले होते. जे १११९ रुपयांच्या आयपीओ किमतीच्या तुलनेत २१.३६ टक्के अधिक होते.

जिओ प्लॅटफॉर्मचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल

जिओ प्लॅटफॉर्मने सप्टेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात १४ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे. नव्या ग्राहकांचा भक्कम ओघ, डिजिटल सेवा व्यवसायातील विस्तार आणि प्रति युजर सरासरी कमाई मधील माफक सुधारणा यामुळे ही वाढ झाली.

तीन महिन्यांत ७७६५ कोटी रुपयांचा नफा

कामकाजातून मिळणारा महसूल वार्षिक आधारावर ११ टक्क्यांनी वाढून ४०४७५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत तो ३६३३२ कोटी रुपये होता. त्रैमासिक आधारावर विचार करता, निव्वळ नफ्यात ८ टक्क्यांची वाढ झाली असून तो ७७६५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर महसुलात ३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

ग्राहकांची संख्या ३० कोटींवर

सप्टेंबरच्या अखेरीस, जिओच्या ५जी ग्राहकांची संख्या ३० कोटींवर पोहोचली आहे. यात गेल्या १२ महिन्यांत ६ कोटी ६० लाख नवीन ग्राहकांची भर पडली आहे. ग्राहकांचा सहभागही उत्तम राहिला असून, कंपनीच्या एकूण वायरलेस डेटा ट्रॅफिकपैकी ५६ टक्के वाटा ५जी युजर्सचा आहे.

शेअर बाय, सेल की होल्ड करायचा?

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने जिओ प्लॅटफॉर्म्सच्या शेअरवर ६ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता वर्तवत, १५१५ रुपयांच्या नव्या टार्गेट प्राईससह आपले ‘बाय’ रेटिंग कायम ठेवले आहे.

फर्मने म्हटले आहे की, “आम्ही जिओ प्लॅटफॉर्म्सवरील आमचे ‘बाय’ रेटिंग कायम ठेवत आहोत आणि नवी टार्गेट प्राईस १५१५ रुपये निश्चित केली आहे.”

(शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. लोसकत्ता ऑनलाईनमध्ये शेअर बाजाराशी संबंधित वृत्त केवळ माहितीच्या उद्देशाने प्रकाशित केले जाते. याला गुंतवणुकीचा समजू नये. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी, वाचकांनी पात्र आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)