मणिपाल हेल्थ आयपीओच्या माध्यमातून नवीन समभागांची विक्री करणार आहे. याचबरोबर इम्पेरियस हेल्थकेअर इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि. आणि मणिपाल एज्युकेशन अँड मेडिकल ग्रुप इंडिया, तसेच गुंतवणूकदार टीपीजी एसजी मॅगझिन प्रा. लि., सेव्हेंटी सेकंड इन्व्हेस्टमेंट कंपनी, नोव्हो होल्डिंग्स इन्व्हेस्ट एशिया आणि फिनिक्स बेअर इन्व्हेस्टमेंट्स हे आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून ४.३२ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत.

नवीन समभाग विक्रीतून मिळणाऱ्या ५,३७८ कोटी रुपयांच्या निधीचा वापर, मणिपाल हॉस्पिटलने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी केला जाईल. तसेच, ५७४ कोटी रुपयांचा वापर कंपनीची दुसरी उपकंपनी असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलमधील अल्प हिस्सा संपादित करण्यासाठी आणि इतर सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी केला जाईल.

मणिपाल हेल्थ इंटरप्राइजेस हे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सेवा देणाऱ्या (मल्टीस्पेशालिटी) रुग्णालयांचे देशभर चालवते. यामध्ये हृदयरोगशास्त्र, कर्करोगशास्त्र, मज्जातंतू शस्त्रक्रिया, पचनसंस्था विकारशास्त्र, अस्थिरोगशास्त्र, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.

३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनी १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ३८ रुग्णालये चालवत होती, ज्यामध्ये १०,७६१ खाटांची क्षमता उपलब्ध आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत कंपनीने ३९.४ लाख रुग्णांना सेवा दिली, तर आर्थिक वर्ष २०२५ मध्ये एकूण ७१.९ लाख रुग्णांवर उपचार केले.

आर्थिक आघाडीवर पाहता, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीचा कामकाजातून मिळणारा महसूल ८,२४२.२ कोटी रुपये इतका राहिला, तर निव्वळ नफा १,०८१.६ कोटी रुपये नोंदवला गेला. या समभाग विक्री प्रक्रियेस साहाय्य करण्यासाठी, मनिपाल हेल्थने कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, ॲक्सिस कॅपिटल, गोल्डमॅन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, जेफरीज इंडिया, जेपी मॉर्गन इंडिया, यूबीएस सिक्युरिटीज इंडिया आणि डीबीएस बँक इंडिया यांची ‘बुक-रनिंग लीड मॅनेजर्स’ म्हणून नियुक्ती केली आहे.