Sensex and Nifty open in red as Donald Trump issues a fresh bombing threat to Iran: गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे वित्तीय बाजारपेठांवर याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. या युद्धामुळे जागतिक आर्थिक चिंता निर्माण झाल्या असून जगभरातील शेअर बाजारांना याचा फटका बसत आहे. यामध्ये भारतीय शेअर बाजारांचाही समावेश आहे.
काल शस्त्रविरामाच्या चर्चेनंतर भारतीय शेअर बाजार मोठ्या तेजीसह सकारात्मक पातळीवर बंद झाले. पण तरीही गुंतवणूकदारांना सावध भूमिका घेतल्याने आज सेन्सेक्स ४१७.२० (०.५६%) अंशांच्या घसरणीसह ७३,६८९.६६ अंशांवर उघतला. तर निफ्टी ५० निर्देशांक २२४.०० (०.९८%) अंशांच्या घसरणीसह २२,७४४.२५ वर उघडला.
सकाळी १०:०० वाजता सेन्सेक्स २९१.२७ अंशांनी (किंवा ०.३९ टक्क्यांनी) घसरून ७३,८१५.५८ वर, तर निफ्टी ८४.८० अंशांनी (किंवा ०.३७ टक्क्यांनी) घसरून २२,८८३.४५ वर व्यवहार करत होता. सुमारे १८५६ शेअर्समध्ये वाढ झाली, १४८१ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १६३ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
सकाळी ११:०० वाजता सेन्सेक्स ४३४.५६ अंशांनी (किंवा ०.५९ टक्क्यांनी) घसरून ७३,६७२.२९ वर, तर निफ्टी १२९.८० अंशांनी (किंवा ०.५७ टक्क्यांनी) घसरून २२,८३८.४५ वर व्यवहार करत होता. सुमारे २,२८२ शेअर्समध्ये वाढ झाली, १,३०५ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १४९ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
दुपारी १२:०० वाजता सेन्सेक्स ५२.९५ अंशांनी वधारून ७४,१५९.८० अंशांवर, तर निफ्टी ५० निर्देशांक १६ अंशांनी वाधारून २२,९८४.२५ अंशांवर व्यवहार करत होता. यामध्ये सुमारे २४४६ शेअर्स वधारले, १२५० शेअर्स घसरले तर १५० शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
दुपारी १:०० वाजता सेन्सेक्स १७७.४५ अंशांनी (किंवा ०.२४ टक्क्यांनी) घसरून ७३,९२९.४० वर, तर निफ्टी ५७.४५ अंशांनी (किंवा ०.२५ टक्क्यांनी) घसरून २२,९१०.८० वर व्यवहार करत होता. सुमारे २,३६२ शेअर्समध्ये वाढ झाली, १,४१४ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १३७ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
दुपारी २:०० वाजता सेन्सेक्स २९.८८ अंशांनी (किंवा ०.०४ टक्क्यांनी) वधारून ७४,१३६.७३ वर पोहोचला, तर निफ्टी १३.६५ अंशांनी (किंवा ०.०६ टक्क्यांनी) वधारून २२,९८१.९० वर व्यवहार करत होता. सुमारे २४५१ शेअर्समध्ये वाढ झाली, १३७२ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १४० शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
ट्रम्प यांच्या नव्या धमक्या
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, इराणने लवकरच होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास सहमती न दिल्यास, तेथील पूल आणि वीज प्रकल्पांवर बॉम्बहल्ला करण्याची पुन्हा एकदा धमकी दिली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यांचे इराणी जनतेने समर्थन केले होते, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
आजचे सोन्याचे दर
आज २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १,४९,९७० रुपये आहे. सोन्याच्या किमतीत कालच्या तुलनेत जवळपास ०.३% ची घट झाली आहे. दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १,४९,७१० रुपये आहे. भारतात आज १८ कॅरेट सोन्याची किंमत १,१२,४७७.५ रुपये आहे. COMEX वर, या मौल्यवान धातूचा व्यापार ४,६८६.२० रुपये प्रति औंस दराने होत होता, ज्यामध्ये ०.०३% ची वाढ नोंदवली गेली आहे.
आजचे चांदीचे दर
भारतात, चांदीच्या दरात ०.३३ टक्क्यांची घट झाली असून, दर प्रति किलो २.३३ लाख रुपयांवर पोहोचले आहेत. COMEX वर, मंगळवारी चांदीच्या किमतीत ०.४ टक्क्यांची वाढ झाली आणि ती प्रति ट्रॉय औंस ७३.१४ डॉलर्सवर व्यवहार करत होती. जानेवारी महिन्यातही, भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणावरील सट्टेबाजीच्या खरेदीमुळे किमतीत वाढ झाली होती.
