Sterlite Technologies Multibagger Share 1 Crore Return: यंदाच्या वर्षात दूरसंचार क्षेत्रातील स्टर्लाइट टेक्नॉलॉजीज शेअरने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. शेअर बाजारातील एकूणच नकारात्मक वातावरण असूनही, ४०या शेअरने गुंतवणूकदारांना थक्क करणारा ‘मल्टीबॅगर’ परतावा दिला आहे. स्टर्लाइट टेक्नॉलॉजीज ही कंपनी ‘एआय-रेडी’ पायाभूत सुविधा, FTTx, तसेच ग्रामीण आणि कॉर्पोरेट नेटवर्क उभारण्यासाठी सर्वसमावेशक सेवा पुरवते. ही कंपनी १०० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असून, तिचे उत्पादन प्रकल्प उत्तर अमेरिका, युरोप व आशियामध्ये स्थित आहेत.

सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी इंट्राडे व्यवहारादरम्यान या शेअरने ९८९.७० रुपयांचा ५२-आठवड्यांचा उच्चांक गाठला. सलग तीन सत्रांमध्ये ‘अप्पर सर्किट’ लागल्यानंतर या शेअरच्या किमतीत जवळपास ४ टक्क्यांची वाढ झाली.

१ ऑक्टोबर रोजी कंपनीने जाहीर केले की, त्यांच्या पूर्ण मालकीच्या एका उपकंपनीने एका ‘हायपरस्केल’ भागीदारासोबत दीर्घकालीन पुरवठा करार केला आहे. हा करार २०२६ ते २०३० या कालावधीत दरवर्षी ऑप्टिकल कनेक्टिव्हिटी उत्पादनांचा पुरवठा करण्याबाबत आहे. पुरवठा केल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या सध्याच्या विक्री किमतीनुसार, या कराराचे एकूण संभाव्य मूल्य जवळपास १.२ अब्ज डॉलर्स इतके आहे.

१० लाखांचे झाले १ कोटी

बीएसईच्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू वर्षात आतापर्यंत या शेअरमध्ये ८६० टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की, ३१ डिसेंबर २०२५ रोजी गुंतवलेल्या १०.४ लाख रुपयांचे मूल्य आता अवघ्या नऊ महिन्यांहून अधिक कालावधीनंतर जवळपास १ कोटी रुपये झाले असते. सहा महिन्यांच्या अल्प कालावधीतही या शेअरने ४५० टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे.

या वर्षी २७ जानेवारी रोजी स्टरलाइट टेकच्या शेअरची किंमत ८४.६५ रुपये या ५२-आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आली होती. सध्याच्या स्थितीत, ही किंमत तिच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवरून १०६९ टक्क्यांनी वधारली आहे.

आणखी ४० टक्की वाढीची क्षमता

निर्मल बंग इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या मते, या शेअरमध्ये अजूनही वाढीची चांगली क्षमता आहे. या ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला असून, १,३४० रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. याचा अर्थ यात ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मने नमूद केले की, डेटा-सेंटर उत्पादनांमुळे निर्माण झालेल्या या मागणीमुळे कंपनीला आर्थिक वर्ष २५ मधील १२३ कोटी रुपयांचे नुकसान भरून काढून आर्थिक वर्ष २६ मध्ये ५६ कोटी रुपयांचा नफा मिळवणे शक्य झाले.

(शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. लोसकत्ता ऑनलाईनमध्ये शेअर बाजाराशी संबंधित वृत्त केवळ माहितीच्या उद्देशाने प्रकाशित केले जाते. याला गुंतवणुकीचा समजू नये. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी, वाचकांनी पात्र आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)