Tax saving tips: मार्च महिना सुरु झाल्यावर सर्व गुंतवणूकदार कर (Tax) नियोजनाच्या कामामध्ये गुंतून जातात. या काळामध्ये गुंतवलेले पैसे अधिक परताव्यासह मिळावेत अशा योजनांचा शोध प्रत्येक गुंतवणूकदार घेत असतो. हे लोक जबरदस्त परताव्यासह करामध्ये सवलतही मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. अशा वेळी बहुंताश लोक कर बचत व्हावी यासाठी आयकर विभागाच्या कलम ८० सीची मदत घेतात. या कलमानुसार, गुंतवणूकदारांना त्यामध्ये १.५ लाख रुपयांची सूट मिळते. जर तुम्हाला पैसे गुंतवून जोखीम न पत्करता कर बचत करायची असेल तर तुम्ही या पर्यायांचा विचार करु शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॅंक टॅक्स सेव्हर एफडी (Bank Tax Saving FD)

सुरक्षितपणे पैसे गुंतवण्यासाठी हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. या ठेवीअंतर्गत बॅंक त्यांच्या ग्राहकांना ५ वर्षांपर्यंतची गुंतवणूक करण्याची संधी देते. म्हणजेच या मुदत ठेवीचा लॉक इनचा कालावधी ५ वर्षांचा आहे. यामध्ये गुंतवलेल्या ठेवींवर वार्षिक १.५० लाख रुपयांची कर सूट मिळू शकते. आपल्या देशातील बहुतांश बॅंका ग्राहकांना बॅंक टॅक्स सेव्हर एफी योजनेअंतर्गत पैसे गुंतवल्यास ६.५ टक्के ते ७.५ टक्के व्याजदर देतात

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund)

सरकारद्वारे सुरु केलेल्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेअंतर्गत पैश्यांची गुंतवणूक करणे सुरक्षित असते. यामध्ये ५०० रुपयांपासून ते १.५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवता येते. आयकर विभागाच्या कलम ८० सी नुसार, पीपीएफमध्ये पैसे गुंतवल्यास ग्राहकांना करामध्ये १.५ लाख रुपयांपर्यंतची सूट मिळते. यामध्ये गुंतवणूकदारांना ७.१ टक्के व्याजदर मिळत असतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये १५ वर्षांसाठी पैसे गुंतवता येतात.

आणखी वाचा – SBI खातेदारांनो लक्ष द्या! तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेलेत का? जाणून घ्या ‘कारण’

राष्ट्रीय बचत पत्र (National Savings Certificates)

राष्ट्रीय बचत पत्र या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना ७ टक्क्यांनी परतावा मिळतो. यात ५ वर्षांसाठी पैसे गुंतवता येतात. ही योजना देखील आयकर विभागाच्या ८० सी कलमाअंतर्गत येते असून यामध्येही ग्राहकांना १.५ लाख रुपयांची कर बचत करण्याची संधी मिळते.

ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी (Voluntary Provident Fund)

ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी ही ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेमधील एक छोटी बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्व कर्मचाऱ्याच्या पगारातील १२ टक्के पैसे गुंतवले जातात. ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना १२ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक करता येते. यावर ग्राहकांना ८.१ टक्के व्याजदर मिळतो.

आणखी वाचा – Income Tax : कर वाचवण्यासाठी भाडे करार करताय, 5 गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा मोठा दंड

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)

जर तुमच्या घरामध्ये १० वर्षापेक्षा कमी वय असलेली मुलगी असेल, तर तिच्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता. यामुळे करामध्ये सवलती मिळण्यासह योग्य प्रमाणात परतावा देखील मिळतो. मुली आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पैसे गुंतवल्यास ७.८ टक्के व्याजदराने पैसे मिळतात. शिवाय मुलीला १.५ लाख रुपये देखील मिळतात.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tax saving tips invest in these risk free options tax saving fd ppf ssy nsc vpf know more details yps
First published on: 21-03-2023 at 13:15 IST