Best Camera Phones Under 30000 : आगामी दिवाळी सण आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून अनेकजण या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करत असतात. या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिफकार्टनेही आपल्या वर्षातील मोठ्या सेलची घोषणा केली आहे. या सणासुदीत तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल आणि त्यात तुमचा फोकस कॅमेरावर असेल तर हा लेख तुमची मदत करू शकतो. ३०,००० रुपयांच्या बजेटमध्ये आता ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन, डेडीकेड टेलीफोटो लेन्स, अल्ट्रा-वाईड कॅमेरे आणि जबरदस्त सेल्फी कॅमेऱ्यांचा समावेश असलेले काही फोन्सची तुलना पाहू.
१. विवो व्ही ६० ई (Vivo V60e)
Vivo V60e हा या किंमत श्रेणीतील चांगला कॅमेरा फोन आहे, ज्यामध्ये २०० मेगापिक्सेलचा मुख्य मागील कॅमेरा मिळतो, जो OIS सपोर्टेड आहे. मागील सेटअपमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा देखील आहे. सेल्फीसाठी, फोनला ऑटोफोकस आणि AI फीचर्ससह ५० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या मॉडेलमध्ये तुम्हाला ६,५००mAh ची तगडी बॅटरी मिळते. ९०W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याव्यतिरिक्त ६.७७-इंच 120Hz AMOLED डिस्प्ले, मीडियाटेक डायमेंसिटी ७३६० टर्बो (MediaTek Dimensity 7360 Turbo) प्रोसेसर मिळतो. याची किंमत २९,९९९ पासून सुरू (८GB + १२८GB) होते. हाय-रिजोल्यूशनचा मूळ कॅमेरा हवा असणाऱ्यांसाठी हा फोन एक दमदार पर्याय ठरतो.
२. रेडमी नोट १५ प्रो ५जी (Redmi Note 15 Pro 5G)
Redmi Note 15 Pro 5G या श्रेणीमध्ये २००-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा घेऊन आला आहे. याचा मुख्य सेन्सर १/१.४-इंच आकाराचा असून त्याला ८-मेगापिक्सेलच्या अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेट असलेला ६.८३-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले मिळतो. MediaTek Dimensity 7400-Ultra चिपसेटवर चालतो. तसेच, यात ४५W चार्जिंगला सपोर्ट करणारी ६,५८०mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोनही तुम्हाला २९,९९९ (८GB + १२८GB) रुपयांत मिळेल.
३. नथिंग फोन ३ए प्रो (Nothing Phone 3a Pro)
Nothing Phone 3a Pro मध्ये खास टेलिफोटो कॅमेराचा समावेश करण्यात आल्याने तो वेगळा ठरतो. याच्या मागील बाजूस असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये ५०-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, ५०-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि ८-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. याचा टेलिफोटो सेन्सर ३x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. यात ५०-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. इतर फीचर्समध्ये १२०Hz रिफ्रेश रेट असलेला ६.७-इंचाचा AMOLED डिस्प्ले, Snapdragon 7s Gen 3 चिपसेट, तसेच १२GB पर्यंत रॅम (RAM) आणि २५६GB पर्यंत स्टोरेज मिळते. या फोनमध्ये ५,०००mAh ची बॅटरी असून ५०W फास्ट चार्जिंगची सुविधा मिळते. या सेगमेंटमध्ये डेटा झूम आणि टेलीफोटो लेन्स शोधणाऱ्या फोटोग्राफीप्रेमींसाठी हा फोन बजेटमध्ये सर्वोत्तम डील देतो. २७,९९९ रुपयांमध्ये हा फोन मिळत आहे.
४. मोटोरोला एज ७० फ्युजन (Motorola Edge 70 Fusion)
Motorola Edge 70 Fusion मध्ये ५०-मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आणि १३-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा असलेला ड्युअल-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी यात ३२-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन Snapdragon 7s Gen 4 चिपसेटवर चालत असून यात १४४Hz रिफ्रेश रेट असलेला ६.८-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, यात ७,०००mAh ची बॅटरी असून तो ६८W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. ८GB रॅम + १२८GB स्टोरेजसाठी २६,९९९ रुपये, तर ८GB + २५६GB व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आहे.
५. सॅमसंग गॅलेक्सी एफ ७० प्रो ५जी (Samsung Galaxy F70 Pro 5G)
Samsung Galaxy F70 Pro 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ५०-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, ५-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा यांचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी यात १२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेटसह ६.७-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असून Snapdragon 6 Gen 3 चिपसेट मिळतो. हा फोन ८GB पर्यंत रॅम (RAM) आणि २५६GB पर्यंत स्टोरेजच्या पर्यायांसह उपलब्ध आहे; तसेच यात ४५W चार्जिंग क्षमतेसह ६,०००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. २५,९९९ रुपयांपासून या फोनची सुरुवात होते.
आर्थिक व खरेदी सल्ला
जर तुमचे प्राधान्य हाय-रिझोल्यूशन प्रायमरी सेन्सर आणि तगडी बॅटरी असेल, तर Vivo V60e किंवा Redmi Note 15 Pro 5G चांगले पर्याय आहे. जर तुम्हाला पोर्ट्रेट्स आणि दूरच्या ऑबजेक्ट्ससाठी झूम हवा असेल, तर Nothing Phone 3a Pro हा पैसा वसूल करणारा पर्याय ठरतो. चांगला स्क्रिन अनुभव हवा असेल तर सॅमसंग घेण्यास हरकत नाही.
