Kia Sorento India Launch : सध्या देशात आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्यांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्सने नुकतीच आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही कूपे Curvv चे नवे Series X लाइनअप भारतीय बाजारात सादर केले. यानंतर आता किया इंडियाने आपली जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेली थ्री-रो एसयूव्ही ‘किया सोरेंटो’ (Kia Sorento) भारतीय बाजारात उतरवली आहे. ही हायब्रिड कार असून आकर्षक डिझाइन, आरामदायी सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि जनरेटीव्ह एआयसह सुसज्ज आहे. या किमतीत नेक्स्ट लेव्हलचे फीचर्स असलेली किया सोरेंटो ग्राहकांच्या आकर्षणाचा विषय ठरू शकते.

भारतातील पहिली हायब्रिड कार आणि जागतिक दर्जाचे एआय तंत्रज्ञान

किया सोरेंटोच्या माध्यमातून कंपनीने भारतात प्रथमच हायब्रिड कार सादर केली आहे. याशिवाय, तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकत, रिअल-टाईम जनरेटिव्ह एआय क्षमता असलेला ‘किया एआय असिस्टंट’ जागतिक स्तरावर प्रथमच भारतीय मॉडेलमध्ये देण्यात आले आहे. यामुळे हे प्रगत फीचर देणारी ही या सेगमेंटमधील पहिलीच कार ठरली आहे.

प्रमुख फीचर्स आणि आकर्षक डिझाइन

  • ४.८ मीटर लांबी आणि १.९ मीटर रुंदीसह ही तिच्या सेगमेंटमधील सर्वात लांब आणि रुंद एसयूव्ही आहे. यात फ्रंटला ‘किया डिजिटल टायगर फेस’, १९ इंच क्रिस्टल कट अलॉय व्हील्स मिळतात. ही गाडी एकूण ८ रंगात उपलब्ध आहे. कारचे इंटिरियर प्रीमियम ब्लॅक आणि ऑलिव्ह ब्राउन थीममध्ये देण्यात आले आहे.
  • ही कार ६ आणि ७ सीटर अशा दोन्ही पर्यायंमध्ये उपलब्ध आहे. ६ सीटरमध्ये मिडिल रो कॅप्टन सीट्स मिळतात तर, ७ सीटरमध्ये बेंच सीट्स मिळतात. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत व्हेंटिलेटेड सीट्स देण्यात आले आहेत.
  • केबिनमध्ये ३१.२४ सेमीचे पॅनोरामिक कर्व्ह्ड डिस्प्ले, विंडशील्ड हेड-अप डिस्प्ले आणि अ‍ॅडव्हान्स डिजिटल आयआरव्हीएम आहे.

इंजिन आणि परफॉर्मन्सचे दमदार पर्याय

दमदार इंजिन पर्याय किआ सोरेंटोमध्ये १.६ लीटर टर्बो जीडीआय हाइब्रिड इंजिन आणि २.२ लीटर डिझेल इंजिन देण्यात आली आहेत. १.६ लिटर टर्बो इंजिन ६५ PS च्या इलेक्ट्रिक मोटरसह येते. यात ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या या इंजिनमधून १८० PS पॉवर आणि २६५ Nm चा दमदार टॉर्क जनरेट होतो. तर, २.२ लिटर डिझेल इंजिनमध्ये ८-स्पीड डीसीटी ट्रान्समिशनसह येते. यात १९३ PS ची पॉवर आणि ४४२ Nm चा जबरदस्त टॉर्क जनरेट करते.

सुरक्षा आणि विशेष व्हेरियंट्स

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडीत अडास लेव्हल २+ फीटर, ३६० डिग्री कॅमेरा, १२ पार्किंग सेन्सर्स, ५ रडार आणि ७ ते १० एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. ही कार कियाच्या सुरक्षित ‘N3’ प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.

किंमत किती?

या प्रीमियम एसयूव्हीची सुरुवातीची किंमत डिझेल व्हेरियंटसाठी २७.९९ लाख रुपये आणि हायब्रिड व्हेरियंटसाठी २९.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) असणार आहे. या लाँचिंगसह कियाने भारतातील प्रीमियम थ्री-रो एसयूव्ही विभागात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. ४ सप्टेंबर २०२६ पासून या कारची अधिकृत डिलिव्हरी देशभरात सुरू झाली आहे.