OnePlus N6X Price in India : ग्लोबल तंत्रज्ञान ब्रँड वनप्लसने भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी नवीन ‘वनप्लस एन६एक्स’ (OnePlus N6X) लाँच केला आहे. एन-सिरीजच्या अंतर्गत आलेला हा फोन दमदार ७,००० एमएएच बॅटरी, ६ वर्षांची बॅटरी लाईफ, मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा आणि आधुनिक डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. भारतीय ग्राहकांसाठी हा फोन ४ ऑगस्ट २०२६ पासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

अडीच दिवसांचा बॅटरी बॅकअप

या सेगमेंटमध्ये आघाडीवर असलेल्या ७००० एमएएच बॅटरीसह एन६एक्स एका चार्जवर तब्बल अडीच दिवसांचा बॅकअप देतो. यात २०.५६ तास व्हिडिओ स्ट्रीमिंग, १३३.५६ तास संगीत, २५.०४ तास सोशल स्क्रोलिंग किंवा ७५९.१३ तास स्टँडबायचा समावेश आहे. अगदी १% चार्ज असतानाही, अल्ट्रा पॉवर सेव्हिंग मोड आवश्यक फंक्शन्स चालू ठेवतो आणि ५४ मिनिटे कॉल्स, साडेसात तास स्टँडबाय किंवा २२ मिनिटे नेव्हिगेशन सुरू राहू शकते.

दीर्घकालीन विश्वासार्हतेसाठी खास डिझाइन

जे ग्राहक एकदा फोन घेतल्यानंतर ५-६ वर्ष बदल नाही, त्यांच्यासाठी हा फोन परफेक्ट आहे. एन६एक्स खास दीर्घकालीन विश्वासार्हतेसाठी खास डिझाइन केलेला आहे. याची बॅटरी १६०० चार्जिंग सायकल्स आणि तब्बल सहा वर्षांच्या हेल्थसाठी रेटेड आहे. सहा वर्षांनंतरही ती ८०% पेक्षा जास्त क्षमता टिकवून ठेवते. अत्यंत तापमान, ओव्हरचार्जिंग, ड्रॉप्स आणि कॉम्प्रेशनपासून संरक्षण देणाऱ्या चार लेयर्ससह ही बॅटरी सुरक्षित आहे. बायपास चार्जिंग दीर्घकाळ वापरात उष्णता कमी करते, रिव्हर्स चार्जिंग सुसंगत अॅक्सेसरीजना पॉवर देते, तर नाईट चार्जिंग मोड झोपेच्या रूटीननुसार चार्जिंग अॅडजस्ट करून ओव्हरचार्जिंग टाळतो.

एन६एक्स एंट्री स्मार्टफोन सेगमेंटमध्ये उंचावलेलं डिझाइन घेऊन येतो. गार्नेट‑इन्स्पायर्ड बर्गंडी रेड आणि अॅक्वामरीन‑इन्स्पायर्ड आईस ब्लू या रंगांमध्ये उपलब्ध असलेला हा फोन, रिफाइंड फिनिशसह स्वच्छ व्हर्टिकल कॅमेरा लेआउट आणि मऊ गोलाकार कॉर्नर देतो. फ्लुइड १२० हर्ट्झ आय कम्फर्ट डिस्प्ले अधिक स्मूद स्क्रोलिंग आणि इमर्सिव्ह व्ह्यूइंगचा अनुभव देतो, तर ओव्हरसाईज्ड स्पीकर ३००% अल्ट्रा व्हॉल्युमसह ऑडिओ अनुभव पूर्ण करतो.

डिझाइनच्या पलीकडे, एन६एक्स मध्ये एमआयएल एसटीडी ८१०एच मिलिटरी‑ग्रेड टिकाऊपणा आहे. -४०°से ते ८५°से तापमान, मीठामुळे होणारा गंज, वाळू आणि धुळीचे वादळ, तसेच सलग २५ वेळा मार्बलवर पडण्याची चाचणी अशा कठीण परीक्षेत हे मॉडेल पास झाले आहे. चार‑लेयर आर्मरशेल प्रोटेक्शनमध्ये मजबूत कोपरे, एअरबॅग कुशनिंग, हार्डन केलेले ग्लास आणि रिइन्फोर्स्ड अॅल्युमिनियम फ्रेमचा समावेश आहे, जे आयपी ६४ डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्ससह मिळून अपघाती पडणे, पाण्याचे शिंतोडे आणि रोजच्या वापरातील झीज यांच्यापासून संरक्षण करतात.

वनप्लस एन६एक्स किंमत आणि भारतातील सेल

या फोनची किंमत १७,४९९ पासून सुरू होते, वनप्लस एन६एक्स भारतात ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता ओपन सेलमध्ये उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन ४जीबी+६४जीबी आणि ४जीबी+१२८जीबी कॉन्फिगरेशनमध्ये येईल.