मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते, पण यासाठी तुमच्या हातातील अनोखी अंगठी (रिंग) तुमच्या आरोग्याची काळजी घेईल असे सांगितले तर? विश्वास बसत नसला तरी ते प्रत्यक्षात आले आहे. हातातील स्मार्टरिंगच्या माध्यमातून आरोग्याविषयी अपडेट मिळणार आहे. फिनलंडची आघाडीच्या औउराने (ÕURA)  जगभरात सर्वोत्कृष्ट स्मार्ट रिंग आता भारतातही उपलब्ध करून दिली आहे. ही रिंग अत्याधुनिक सुविधांनी सज्ज स्मार्ट रिंग आहे. रिंग दैनंदिन वापरासाठी खास तयार करण्यात आली असून या रिंगच्या वापराने आरोग्य आणि वेलनेस संबंधित तब्बल ५० हून अधिक विषयासंदर्भात माहिती मिळते.

औउरा नेमकी कार्य कशी करते?

औउरा एप्लिकेशनमध्ये ही माहिती अगदी सोप्या भाषेत वाचता येते. औउरा रिंग ४ हे औउरा स्मार्ट सेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात अत्याधुनिक अल्गोरिदम आणि संशोधनासाठी वापरल्या जाणा-या उच्च दर्ज्याच्या सेन्सरचा वापर केला जातो. ही  रिंग प्रत्येक व्यक्तीच्या बोटाच्या आकारानुसार, त्वचेच्या रंगानुसार आणि इतर बदलांनुसार जुळवून घेते. या रिंगमधील मल्टी-वेव्हलेंथ सेन्सिंग प्रणाली आणि १८ सिग्नल पाथवेच्या मदतीने शरीरातील संकेत अचूकरित्या नोंदवले जातात. या विश्वासार्हतेमुळे वापरकर्त्यांना वैयक्तिकपातळीवर आरोग्यविषयक अचूक माहिती मिळते. यामुळे कामाचा ताण किंवा अगदी रक्तदाब याची अचूक माहिती मिळत असल्याने प्रतिकूल परिस्थितीत वेळेत उपचार घेणे शक्य आहे. कारण स्मार्ट रिंगच्या माध्यमातून सतत माहिती मिळत असते.  

औउरा रिंगची निर्मिती हलक्या टायटॅनियमपासून करण्यात आली आहे. रिंगच्या आतल्या बाजूला सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. या सुविधेमुळे दिवसा आणि रात्रीही ही रिंग वापरता येते. झोपेतही या रिंगच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या आरोग्याची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरुच राहते.

भारतीयांच्या झोपेविषयी धक्कादायक वास्तव समोर

औउरा कंपनीने ‘इंडियाः द स्टेट ऑफ स्लीप २०२६’ हा अहवालदेखील प्रसिद्ध केला. या अहवालात औउरा स्मार्ट रिंग वापरणा-या भारतीय ग्राहकांची माहिती देण्यात आली आहे. या अहवालात ग्राहकांच्या झोपेच्या सवयी, पद्धती यांचा सखोल अभ्यास करण्यात आला.

अहवालातील आकडेवारीनुसार, पुरेशी झोप हा उत्तम आरोग्यासाठी आवश्यक ठरते याकडे लक्ष वेधते. भारतीयांची व्यस्त आणि वेगवान जीवनशैली अपु-या झोपेला कारणीभूत आहे. औउरा रिंगचा वापर केल्याने ही रिंग ग्राहकांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरुक करते, काळानुरुप सकारात्मक जीवनशैलीचे अवलंबन करण्यास मदत करते. भारत हा देश प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या देशातील ग्राहकांना औउराची सेवा उपलब्ध करुन देताना आनंद होत आहे, असे ‘इंडियाःद स्टेट ऑफ स्लीप २०२६’ अहवालाबद्दल औउरा कंपनीचे प्रमुख मार्केटिंग अधिकारी डग स्विनी यांनी सांगितले.

भारतीयांच्या झोपेच्या सवयीः अपुरी विश्रांतीमुळे होणारे आरोग्यावरील दुष्परिणाम

औउराच्या अहवालात, भारतीय ग्राहकांचा जगभरातील ग्राहकांच्या झोपेच्या सवयींशी तुलना करण्यात आली. यातील आकडेवारीनुसार, भारताचा सर्वात कमी झोप घेणा-या देशांच्या यादीत समावेश होतो. भारतीय ग्राहक दररोज रात्री पुरेशी झोप घेत नाहीत, या ग्राहकांची झोप केवळ ६ तास २८ मिनिटांपुरती मर्यादित असते, हे तास सर्वाधिक झोप घेणा-या देशांतील नागरिकांच्या झोपेच्या तासांशी तुलनात्मक पातळीवर ४० मिनीटांनी कमी असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

प्रत्येक प्रौढ व्यक्तीने निरोगी आरोग्यासाठी किमान ७ ते ९ तासांची झोप घेणे आवश्यक असते. मात्र बहुतांश भारतीयांना पुरेशी झोप मिळत नाही. व्यवसायाच्या मागणीनुसार, विविध देशांतील वेळापत्रकानुसार चालणा-या कामाच्या पद्धती, रात्री होणा-या भेटीगाठी, सतत ऑनलाईन माध्यमांवर सक्रिय राहण्याच्या सवयी यांमुळे भारतीयांना ७ ते ९ तासांची झोप मिळत नाही.

चुकीच्या जीवनशैलीमुळे झोपेच्या कार्यात बिघाड होतो. याचा थेट परिणाम डोळ्यांतील बाहुल्यांच्या हालचालींवर होत असून या हलचाली आता मंदावू लागल्या आहेत. भारतीय गाढ झोपेपासूनही दूरावत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. जागतिक पातळीवर इतर देशांच्या तुलनेत, भारतीयांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांची जलद हालचाल दर आठवड्याला कमी होऊ लागली आहे. ही हालचाल प्रत्येक आठवड्याला एका तासापेक्षा जास्त पटीने कमी होत आहे. डोळ्याच्या बाहुल्यांची जलद हालचाल ही नैसर्गिक प्रक्रिया असून, मानवी भावनांचे संतुलन राखण्यास मदत करते. या हालचाली नैसर्गिक प्रक्रियेनुसार जलद घडल्यास माणसाची स्मरणशक्ती सुधारते. निर्णयक्षमता वृद्धिंगत होते. झोपेच्या कमतरतेमुळे बहुतांश भारतीयांना सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही. मरगळलेल्या अवस्थेतच त्यांची सकाळची सुरुवात होते.

रिंग कुठे मिळणार?

 ही रिंग वक्तीनुरूप म्हणजे त्यांच्या हाताच्या बोटांच्या आकारानुसार, बारा वेगवेगळ्या आकारात उपलब्ध करून दिली आहे.ही रिंग ब्लॅक, सिल्वर, स्टेल्थ, ब्रश्ड सिल्व्हर, गोल्ड आणि रोझ गोल्ड अशा सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. देशभरातील १०० हून अधिक क्रोमा स्टोअर्समध्ये आणि अमेझॉनवरवर औउरा रिंग ४ खरेदीसाठी उपलब्ध करून दिली आहे. औउरा रिंग सिल्व्हर एण्ड ब्लॅक २८ हजार ९०० रुपयात तर स्टेल्थ, ब्रश्ड सिल्व्हर, गोल्ड आणि रोझ गोल्ड ३९ हजार ९०० रुपयात उपलब्ध करून दिली आहे.