मुंबई : घरबसल्या थिएटरसारखा अनुभव देणाऱ्या स्मार्ट टीव्ही क्षेत्रात सॅमसंगने मोठी झेप घेत २०२६ सालासाठीची अत्याधुनिक ‘व्हिजन एआय’ टीव्ही श्रेणी भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. मायक्रो आरजीबी, ओएलईडी, निओ क्युएलईडी, द फ्रेम, मिनी एलईडी आणि युएचडी अशा विविध श्रेणींमध्ये सादर करण्यात आलेल्या या नव्या लाइनअपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित अनेक स्मार्ट फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, सॅमसंगने प्रथमच आपल्या जवळपास सर्व ४के आणि त्यावरील मॉडेल्समध्ये ‘व्हिजन एआय कम्पॅनियन’ तंत्रज्ञान उपलब्ध करून देत टीव्ही पाहण्याचा अनुभव अधिक वैयक्तिक, स्मार्ट आणि सिनेमॅटिक करण्याचा प्रयत्न केला आहे. सलग २० वर्षे जागतिक स्तरावर अव्वल टीव्ही ब्रँड राहिलेल्या सॅमसंगकडून हा मोठा तांत्रिक विस्तार मानला जात आहे.

एआयमुळे चित्र आणि आवाज अधिक जिवंत

या नव्या श्रेणीतील ‘एआय अपस्केलिंग प्रो’ तंत्रज्ञान कमी दर्जाच्या व्हिडीओचे रिअल टाइममध्ये विश्लेषण करून त्याची गुणवत्ता सुधारते. त्यामुळे चित्र अधिक स्पष्ट, खोल आणि नैसर्गिक दिसते. ‘कलर बूस्टर प्रो’ दृश्यांतील रंग अधिक उठावदार आणि वास्तववादी बनवते.

खेळप्रेमींसाठी सॅमसंगने ‘एआय सॉकर मोड’ सादर केला आहे. फुटबॉल सामना पाहताना चेंडूची हालचाल, मैदानातील रंगछटा आणि स्टेडियममधील आवाज अधिक प्रभावीपणे अनुभवता यावा यासाठी हे फीचर पिक्चर आणि साऊंडमध्ये आपोआप सुधारणा करते. तर ‘एआय साऊंड कंट्रोलर प्रो’ संवाद, प्रेक्षकांचा आवाज आणि पार्श्वसंगीत यांचे स्वतंत्र विश्लेषण करून ग्राहकांना हवा तसा ऑडिओ अनुभव देतो.

भारतात मायक्रो आरजीबीचे पदार्पण

सॅमसंगने भारतात प्रथमच ‘मायक्रो आरजीबी’ तंत्रज्ञान सादर केले आहे. ५५ ते ११५ इंच आकारातील आर९५एच आणि आर८५एच मालिकेत उपलब्ध असलेले हे टीव्ही स्वतंत्र लाल, हिरवे आणि निळे मायक्रो एलईडी वापरून अधिक अचूक प्रकाश नियंत्रण आणि नैसर्गिक रंग अनुभव देतात.

ओएलईडी मालिकेत ग्लेअर-फ्री तंत्रज्ञान

२०२६ ओएलईडी मालिकेत एस९५एच, एस९०एच आणि एस८५एच मॉडेल्सचा समावेश आहे. यामध्ये गडद काळा रंग, अधिक समृद्ध रंगसंगती आणि प्रीमियम डिझाइन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पूर्वी केवळ टॉप मॉडेलपुरते मर्यादित असलेले ‘ग्लेअर-फ्री’ तंत्रज्ञान आता अधिक मॉडेल्समध्ये उपलब्ध झाले आहे. त्यामुळे उजेड असलेल्या खोलीतही स्क्रीनवरील चित्र स्पष्ट दिसते.

किंमत किती?

सॅमसंगच्या नव्या टीव्ही श्रेणींच्या सुरुवातीच्या किंमती पुढीलप्रमाणे आहेत :

मायक्रो आरजीबी – ₹१,२४,९९० पासून
ओएलईडी – ₹१,१४,९९० पासून
द फ्रेम – ₹५६,९९० पासून
निओ क्युएलईडी – ₹५२,९९० पासून
मिनी एलईडी – ₹४२,९९० पासून
युएचडी – ₹३६,९९० पासून

साऊंडबार मिळणार मोफत

लॉन्च ऑफर अंतर्गत निवडक मॉडेल्सवर ग्राहकांना १,०२,९९० किमतीचा साऊंडबार आणि २३,९९० किमतीचा म्युझिक स्टुडिओ मोफत दिला जात आहे. याशिवाय २० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि आकर्षक ईएमआय पर्यायांची सुविधाही देण्यात आली आहे. सॅमसंगची ही नवीन एआय टीव्ही श्रेणी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह देशभरातील प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे.