SpaceX Nvidia Space AI Data Cente : सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा सुरू आहे. पूर्वी कोणत्याही माहितीसाठी लोक गुगलवर सर्च करायचे, आता तेच प्रश्न चॅटजीपीटी आणि जेमिनीला विचारले जात आहे. परिणामी एआयच्या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी दिग्गज टेक कंपन्या पाण्यासारखा पैसा ओतत आहेत. यात आता आणखी एका मोठ्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची जागतिक अंतराळ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी स्पेसएक्स (SpaceX) ने एआय क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेतली आहे. स्पेसएक्सने एआय रेसमध्ये आघाडीवर असलेल्या ‘एनव्हिडिया’ (Nvidia) कंपनीसोबत मोठा करार केला आहे.

स्पेसएक्स अंतराळात उभारणार डेटा सेंटर्स

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्व डोराला उभा उसलेल्या डेटा सेंटर्सवर स्पेसएक्सने लक्ष केंद्रीत केलं आहे. यापूर्वी अशक्यप्राय वाटणारे अंतराळ पर्यटन यशश्वी करुन दाखवणारी स्पेसएक्स आता थेट अंतराळात डेटा सेंटर्स उभारण्याची योजना आखत आहे. कंपनी जमिनीवरील डेटा सेंटर्स आणि अंतराळातील कॉम्प्युटिंग नेटवर्क या दोन्हीसाठी एनव्हिडियाच्या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यासाठी एनव्हिडियाच्या ‘Vera Rubin NVL72’ आर्किटेक्चरचा वापर करण्यात येणार आहे. गुगल आणि अँथ्रॉपिक यांसारख्या आघाडीच्या कंपन्या स्पेसएक्सच्या क्लाउड कॉम्प्युटिंग क्षमतेचा वापर करणार आहेत.

‘स्टारमाइंड’ उपग्रह आणि एनव्हिडियाचे ‘वेरा रुबिन’

एनव्हिडियाचे वेरा रुबिन NVL72 (Vera Rubin NVL72) हे रॅक-स्केल एआय सुपरकॉम्प्युटर ७२ रुबिन जीपीयू आणि ३६ वेरा सीपीयू यांचे संयोजन आहे. हे जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान असल्याचे मस्क यांनी म्हटलं आहे. २०२७ मध्ये अंतराळात सोडल्या जाणाऱ्या प्रत्येक ‘स्टारमाइंड’ उपग्रहामध्ये या तंत्रज्ञानाचा विशेष वापर केला जाईल. यामुळे अंतराळातच मोठ्या प्रमाणात डेटा प्रोसेसिंग करणे शक्य होईल, अशी माहिती एलॉन मस्क यांनी दिली.

xAI ची खरेदी आणि आर्थिक कमाई

मस्क यांनी हळूहळू एआय क्षेत्रात विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. २ फेब्रुवारी रोजी ‘xAI’ (ज्यात ग्रोक चॅटबॉट आणि ‘X’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा समावेश आहे) ही कंपनी स्पेसएक्सची पूर्ण मालकीची उपकंपनी बनली. यामुळे स्पेसएक्सच्या व्यवसायात ‘कनेक्टिव्हिटी’ आणि ‘स्पेस’ नंतर ‘एआय’ हा तिसरा प्रमुख कमाईचा स्रोत बनला आहे. ‘कोलॉसस’ आणि ‘कोलॉसस २’ डेटा सेंटर्सद्वारे क्लाउड सेवा पुरवून कंपनीने एआय इन्फ्रास्ट्रक्चरमधून १.६ अब्ज डॉलरचा महसूल मिळवला. कंपनीने आतापर्यंत १४.१ अब्ज डॉलर मूल्याचे क्लाउड-सर्व्हिस करार पूर्ण केले आहेत. एआय विभागाचा ऑपरेटिंग तोटा मार्च तिमाहीतील २.४७ अब्ज डॉलरवरून कमी होऊन जून तिमाहीत १.२६ अब्ज डॉलरवर आला, तर समायोजित EBITDA १.१५ अब्ज डॉलर नोंदवला गेला.