मुंबई: टाटा.इव्ही या भारतातील आघाडीच्या वाहन कंपनीने नवीन कर्व्ह.इव्ही सिरीजएक्स लॉन्च केली आहे, या दोन लांब पल्ल्याच्या, अनेक फीचर्सने समृद्ध आणि प्रीमियम गाड्या आहेत. १६.९९ लाख रुपयांच्या आकर्षक प्रारंभिक किंमतीत सुरू होणाऱ्या कर्व्ह.इव्ही सिरीजएक्समध्ये दोन व्हेरियन्ट आहेत- अॅकम्प्लिश्ड एक्स५५ आणि एम्पावर्ड एक्स५५. पाच रंगांचे पर्याय प्रदान करणाऱ्या कर्व्ह.इव्ही सिरीजएक्समध्ये प्रसिद्ध #डार्क आवृत्ती बरोबरच एक लक्षवेधी नायट्रो क्रिमसन रंगाचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
एक बोल्ड आणि अप्रतिम एसयूव्ही-कूप स्टाइल यांची सांगड घालत, कर्व्ह.इव्ही सिरीजएक्स ग्राहकांच्या दैनंदिन गरजा ध्यानात ठेवून बनविण्यात आली आहे. अंदाजे ४०० किमीची रिअल-वर्ल्ड रेंज आणि ५०२ किमीच्या एआरएआय प्रमाणित (पी१+पी२) रेंज सह, कर्व्ह.इव्ही सिरीजएक्स एक विश्वसनीय इंटरसिटी कार आहे, ज्यात स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. आजीवन एचव्ही बॅटरी वॉरंटी देणारी सिरिजएक्स ही कर्व्ह.इव्ही लाइन-अपला सुस्पष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण बनवते आणि या गाड्या उच्च मूल्य प्रदान करतात.
मुंबईतील एक्स-शोरूम किंमतीनुसार, अॅकम्प्लिश्ड एक्स५५ या प्रकाराची किंमत १६.९९ लाख रुपये आहे. एम्पावर्ड एक्स५५ हा प्रकार १९.१९ लाख रुपयांमध्ये उपलब्ध असून, एम्पावर्ड एक्स५५ डार्क या व्हेरिएंटची किंमत १९.४९ लाख इतकी ठेवण्यात आली आहे.
प्रत्येक नवी इव्ही दाखल करताना आमचा उद्देश एकच असतो की, इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सहजप्राप्य आणि लाभदायक व्हावी कर्व्ह.इव्ही सिरीजएक्स ग्राहकांना भारताच्या पहिल्या एसयूव्ही कूपचा अनुभव घेण्यासाठी सज्ज आहे. या गाड्यांमध्ये ५५ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक आहे, ज्यामुळे गाडीला ५०२ किमी. ची दीर्घ रेंज मिळते आणि आंतर-शहराचा प्रवास सुलभ होतो. तसेच आजीवन एचव्ही बॅटरी वॉरंटी देखील उपलब्ध करून दिली आहे, असे नवीन कर्व्ह.इव्ही सिरीजएक्स दाखल करताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले.
कर्व्ह.इव्ही सिरीजX विषयी:
प्रगत प्युअर इव्ही एक्टि.इव्ही आर्किटेक्चर द्वारा संचालित कर्व्ह.इव्ही सिरीजX श्रेणी आराम, परफॉर्मन्स आणि फ्यूचर-रेडी टेक्नॉलॉजी यांचा संयोग घडवते आणि अत्यंत आरामदायक शहरी ड्रायव्हिंगसाठी तसेच महामार्गांवरील आत्मविश्वासपूर्ण प्रवासासाठी १६७ एचपी आणि २१५ एनएम इन्स्टंट टॉर्क देते.
कर्व्ह.इव्ही अॅकम्प्लिश्ड एक्स५५:
ज्या ग्राहकांना अर्थपूर्ण कम्फर्ट आणि टेक्नॉलॉजीची अपेक्षा आहे, अशा ग्राहकांसाठी अॅकम्प्लिश्ड एक्स५५ डिझाईन करण्यात आली आहे. यामध्ये एक उघडता येणारे पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल २६.०३ सेंमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि नेव्हीगेशन, वायरलेस अँन्ड्रॉईड ऑटो™ आणि अॅपल कारप्ले™ सह टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट स्क्रीन आहेत. तसेच ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर सह एक ३६०-डिग्री सराऊंड व्ह्यू कॅमेरा सिस्टम देखील आहे, ज्यामुळे गाडी चालवणे सुलभ होते. पॅसिव्ह व्हेंटिलेशन असलेल्या भारतातील पहिल्या आर कम्फर्ट सीट्स, प्रीमियम बेनेके कालिको लेदरेट अपहोल्स्ट्री आणि सेरेनिटी स्क्रीन रियर सनशेड्सच्या माध्यमातून यामध्ये आरामदायकता आणखी वाढते आणि केबिनमध्ये बसण्याचा अनुभव खूपच सुखद होतो. दमदार रियल-वर्ल्ड रेंज, विचारपूर्वक दाखल केलेली फीचर्स आणि आकर्षक किंमतीच्या बळावर ही गाडी आत्मविश्वास, आराम आणि विश्वासार्हताची अपेक्षा ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी एक अधिक परिपूर्ण आणि व्यावहारिक पर्याय आहे.
कर्व्ह.इव्ही एम्पावर्ड एक्स५५:
एम्पावर्ड एक्स५५ ही कर्व्ह.इव्ही लाइन-अप मधील सर्वाधिक फीचर्सने ठासून भरलेली अप्रतिम अभिव्यक्ती असून ती #डार्क आवृत्तीत देखील उपलब्ध आहे. ही अॅकम्प्लिश्ड एक्स५५ च्या एक पाऊल पुढेच आहे आणि त्यात अनेक फीचर्स ठासून भरली आहेत. पुढच्या सीट्सवर अॅक्टिव्ह व्हेंटिलेशन, ६ प्रकारे पॉवर-अॅडजस्ट होणारी ड्रायव्हर सीट, दोन-टप्प्यात झुकणाऱ्या मागच्या सीट आणि इंटिरियर बारकावे यात आहेत. केबिनला एक वेगळी ओळख मिळाली आहे ती हरमन टचस्क्रीनची ३१.२४ सेंमी सिनेमॅटिक टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, आर्केड.इव्ही अॅप सूट आणि जेबीएलची ९-स्पीकर साऊंड सिस्टम (सनरूफसह) यांसारख्या टेक्नॉलॉजीमुळे. २० फीचर्स असलेली लेव्हल २ एडीएएस प्रगत सुरक्षा आणि ड्रायव्हर सपोर्ट प्रदान करते. आर१८ अलॉय व्हील्स, फ्रंकसह व्ही२व्ही / व्ही२एल, जेश्चरने नियंत्रित होणारे पॉवर टेलगेट आणि डायनॅमिक स्मार्ट लाइटिंग अनिमेशन्स यांसारख्या प्रीमियम सुविधा एका खऱ्या अर्थाने भविष्यासाठी सुसज्ज असलेल्या इव्ही एसयूव्ही चा अनुभव परिपूर्ण करतात.
