Tata Sierra EV Launch Price : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘टाटा.इव्ही’ने अखेर आपली बहुप्रतिक्षित कार ‘ऑल-न्यू सिएरा.इव्ही’ अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे. ९० च्या दशकात भारतीयांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘सिएरा’ या आयकॉनिक कारला कंपनीने आधुनिक बोल्ड लुक आणि नेक्स्ट-जनरेशन ईव्ही तंत्रज्ञानासह बाजारात उतरवलं आहे.

नव्या पिढीची ही प्रीमियम मिड-एसयूव्ही दमदार परफॉर्मन्स, लक्झरी केबिन आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग रेंजचा अनोखा संगम आहे. या कारचे बुकिंग १ जुलै २०२६ सुरू झाले असून, १५ जुलै २०२६ पासून ग्राहकांना कारची डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल. भारतीय बाजारपेठेत या कारची सुरुवातीची किंमत १८.७९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Tata Sierra EV
Tata Sierra EV

सिएरा.इव्ही: पॉवर, परफॉर्मन्स आणि रेंजचे गणित

वैशिष्ट्येतपशील
सुरुवातीची किंमत१८.७९ लाख रुपये (एक्स-शोरूम)
एमआयडीसी रेंज६६५ किमी (प्रति चार्ज)
वास्तविक रेंज५१० ते ५३० किमी
पिक-अप (० ते १०० किमी/प्रतितास)अवघ्या ५.८ सेकंदात
पॉवर आणि टॉर्क३०६ पीएस पॉवर आणि ५०४ एनएम टॉर्क
एक्सप्रेस चार्जिंग१५ मिनिटांत २६३ किमी प्रवासासाठी सज्ज

कारची ३ प्रमुख वैशिष्ट्ये

लक्झरी लाइफस्पेस आणि आधुनिक केबिन

सिएरा.इव्हीचे केबिन हे एखाद्या आलिशान लाउंजसारखे डिझाइन केले आहे. यामध्ये या विभागातील सर्वात मोठे ‘पॅनोरामॅक्स सनरूफ’ देण्यात आले आहे. मनोरंजनासाठी थिएटर प्रो अनुभवासह ट्रिपल स्क्रीन सेट-अप, डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि सोनिकशाफ्ट सिस्टीम उपलब्ध आहे, जी प्रवाशांना कॉन्सर्ट-ग्रेड ऑडिओचा आनंद देते.

‘गो एनीव्हेअर, डू एनीथिंग’ परफॉर्मन्स

सर्व प्रकारच्या खडतर रस्त्यांवर सहज धावण्यासाठी या कारमध्ये ड्युअल-मोटर क्यूडब्ल्यूडी सिस्टीम दिली आहे. यात अल्ट्रा ग्लाइड सस्पेंशनसह फ्रिक्वेन्सी डिपेंडंट डॅम्पिंग आणि इंटेलिजंट टेरेन मॅनेजमेंट मिळते, ज्यामुळे गाडी चालवताना उत्कृष्ट नियंत्रण आणि स्थिरता मिळते. विशेष म्हणजे, ग्राहकांना या कारसोबत लाइफटाईम एचव्ही बॅटरी वॉरंटी मिळत आहे.

Tata Sierra EV
Tata Sierra EV

ई-वालेट सूट आणि सुरक्षा फीचर्स

ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित करण्यासाठी कारमध्ये ‘ई-वालेट सूट’ देण्यात आला आहे, ज्यामध्ये ऑटो पार्क, समन आणि रिव्हर्स असिस्ट यांसारखे फीचर्स आहेत. याशिवाय हायपरएआर हेड-अप डिस्प्ले आणि ५४०० एचडी कॅमेऱ्यासह ‘४साईट ब्लाइंड स्पॉट व्ह्यू’ सारखे अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान यात समाविष्ट आहे. सिएराचे फीचर्स पाहता आता लांबचा प्रवास सहज शक्य होणार आहे.