scorecardresearch

देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक देणार जास्त फायदा, ग्राहकांना मिळणार ७.२५ टक्के व्याज

१५ दिवस ते २९ दिवसांच्या कालावधीतील एफडीवर आता सामान्य ग्राहकाला ४. ७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ४.७५ टक्के व्याज मिळेल.

Punjab And Sind Bank FD Rates
Punjab And Sind Bank FD Rates

रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट वाढवल्यानंतर बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरच्या व्याजदरात वाढीचा सिलसिला सुरूच आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयआयसीआय बँकेने बल्क एफडीवर व्याजदर वाढवला आहे. बँकेने २ कोटींपासून ५ कोटी रुपयांपर्यंत एफडी वाढवला आहे. नवे दर २२ मार्च २०२३ पासून लागू झाले आहेत. बँकेनं बल्क एफडीवर व्याज ०.२५ टक्क्यांनी वाढवलं आहे. बँक १५ महिन्यांच्या एफडीवर आता ७.२५ टक्के व्याज ग्राहकांना देते. आयसीआयसीआय बँकेने गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये बल्क एफडी व्याजदरात वाढ केली होती. आता केलेल्या वाढीनंतर ७ दिवस ते १४ दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकाला ४.७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ४.७५ टक्के व्याज दिलं जाणार आहे. १५ दिवस ते २९ दिवसांच्या कालावधीतील एफडीवर आता सामान्य ग्राहकाला ४. ७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ४.७५ टक्के व्याज मिळेल.

१२० दिवसांच्या एफडीवर मिळणार ६.५० टक्के व्याज

३० दिवस ते ४५ दिवसांच्या एफडीवर आता सामान्य नागरिकाला ५.५० टक्के आणि सीनिअर सिटीजनला ५.५० टक्के व्याज मिळेल. ४६ दिवस ते ६० दिवसांच्या एफडीवर सामान्य जनता आणि ज्येष्ठ नागिरकांना ५.७५ टक्के व्याज मिळते. अशा प्रकारे ६१ दिवस ते ९० दिवसांच्या एफडीवर ६ टक्के, ९१ दिवस ते १२० दिवसांच्या एफडीवर ६.५० टक्के, १२१ दिवस ते १५० दिवसांच्या एफडीवर ६.५० टक्के आणि १५१ दिवस ते १८४ दिवसांच्या एफडीवर ६.५० टक्के व्याज मिळेल.

आता मिळणार ७.२५ टक्के व्याज

आयसीआयसीआय बँकेनं व्याजदर वाढवल्यानंतर बँक आता २११ दिवस ते २७० दिवसांचा कालावधीतील एफडीवर सामान्य जनता आणि ज्येष्ठ नागरिक दोघांना ६.६५ टक्के, २७१ दिवस ते २८९ दिवसांच्या एफडीवर ६.७५ टक्के आणि १ वर्ष ते ३८९ दिवसांच्या एफडीवर बँक ७.२५ टक्के व्याज देणार आहे. ३९० दिवस ते १५ महिने पूर्ण झालेल्या एफडीवर आता ७.२५ टक्के व्याज बँकेकडून दिले जाणार आहे. १५ महिन्यांपासून १८ महिन्यांच्या कमी वेळेत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ७.१५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. २ वर्ष १ दिवस ते ३ वर्षांच्या कालावधीतील एफडीवर ७ टक्के आणि ३ वर्ष १ दिवस ते ५ वर्षांच्या अवधीतील सामान्य ग्राहकाला ६.७५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 11:44 IST

संबंधित बातम्या