Top 5 Selling Cars In India 2026 : आगामी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल. पण, कोणती कार घ्यावी हे ठरत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. वर्ष २०२६ चे पहिले सहा महिने संपले असून या कालावधीत भारतीय ग्राहकांनी कोणत्या गाड्यांना सर्वाधिक पसंती दिली आहे, याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. यात उत्कृष्ट परफॉर्मन्स, मायलेज आणि फीचर्सनुसार सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप ५ कार्सची यादी देण्यात आली आहे.
१. मारुती सुझुकी डिझायर
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची ‘डिझायर’ ही सेडान कार २०२६ च्या पहिल्या सहामाहीत विक्रीच्या शर्यतीत अव्वल ठरली आहे. पहिल्या सहा महिन्यांत मारुती सुझुकी डिझायरची १.२६ लाख युनिट्सची विक्री झाली. मारुती सुझुकी डिझायरची किंमत एक्स शोरूम किंमत ६.२५ लाखांपासून सुरू होते. या कारचे खास वैशिष्ट्ये म्हणजे उत्कृष्ट मायलेज आणि आकर्षक डिझाईन.
२. टाटा पंच
मारुतीनंतर देशातील दुसरी प्रमुख ऑटो कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या ‘टाटा पंच’ या मायक्रो-एसयूव्हीने भारतीय ग्राहकांच्या मनावर राज्य केले आहे. २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत टाटा पंचची एकूण १.१९ लाख युनिट्सची विक्री झाली, ज्यामुळे ती देशातील दुसरी सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली. टाटा पंचची किंमत ५.६९ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही गाडी आपल्या ५ स्टार सेफ्टी रेटिंग आणि बिल्ट क्वॉलिटीसाठी ओळखली जाते.
३. टाटा नेक्सॉन
टाटा मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही ‘टाटा नेक्सॉन’ सातत्याने विक्रीचे रेकॉर्ड मोडत आहे. २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत नेक्सॉनची एकूण १.१८ लाख युनिट्सची विक्री झाली, ज्यामुळे ती देशातील तिसरी सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. टाटा नेक्सॉनची किंमत ७.३९ लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते. नेक्सॉन प्रगत फीचर्स आणि पेट्रोल/डिझेल/EV पर्यायांमुळे लोकप्रिय ठरली आहे.
४. मारुती सुझुकी अर्टिगा
कुटुंबासाठी ७-सीटर कार शोधणाऱ्या ग्राहकांसाठी मारुतीची ‘अर्टिगा’ ही पहिली पसंती ठरली असून ती चौथ्या स्थानावर आहे. मारुती सुझुकीने सहा महिन्यांत १.०८ लाख युनिट्सची विक्री झाली. या कारची किंमत ८.८५ लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते. प्रशस्त केबिन आणि सीएनजीमुळे मिळत असलेले उत्तम मायलेजमुळे लोकांच्या पसंतीस उतरली आहे.
५. मारुती सुझुकी वॅगनआर
मारुतीची लोकप्रिय हॅचबॅक कार ‘वॅगनआर’ने या यादीत नसती तरच नवल होते. मारुती सुझुकी वॅगनआरच्या विक्रीने पहिल्या सहा महिन्यांत १,००,००० युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे. या कारची किंमत ४.९८ लाखांपासून सुरू होते. कमी बजेट, टॉल-बॉय डिझाईन आणि किफायतशीर मेंटेनन्समुळे अनेक वर्षांपासून मारुती सुझुकी वॅगनआर मध्यमवर्गीयांची पहिली पसंती आहे.
