scorecardresearch

Premium

दोन हजाराच्या नोटा बदलून घेतल्या का? राहिला फक्त आठवडा, ३० सप्टेंबरनंतर या नोटांचं काय होणार?

३० सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेतून बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

2 thousand notes meme
ग्राहकांना २३ मे २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत या नोटा बॅंकांमध्ये बदली करता येणार आहेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याकरता आता फक्त एक आठवडा उरला आहे. या आठवड्याभरात नागरिकांनी स्वतःजवळील दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करायच्या आहेत. दोन हजाराच्या नोटा बंद होणार असल्याची घोषणा मे महिन्यात करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ मध्ये एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद केल्या होत्या. एका रात्रीत निर्णय घेऊन नोटाबंदी करण्यात आली होती. त्यानंतर, एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद केल्याने दोन हजाराची नवी नोट लॉन्च करण्यात आली. ही सर्वांत मोठी चलनी नोट होती. परंतु, १९ मे रोजी निर्णय घेत दोन हजाराच्याही नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. हे आवाहन करण्याआधीआपासूनच दोन हजाराच्या नोटा चलनातून कमी झाल्या होत्या. परंतु, १ सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या एकूण ७ टक्के नोटा चलनात आजही आहेत.

2000 rupee notes
रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली, आता ७ ऑक्टोबरपर्यंत बदलता येणार
allotment JNPT developed plots, Project victims instructed CIDCO Bhawan documents
जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड प्रकिया ३ ऑक्टोबर पासून सुरू होणार; सिडको भवनात दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत कागदपत्रे स्वीकारणार
Byju’s Layoff
बायजू दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; कर्जदारांना ९९४७ कोटी देण्यास तयार, नेमकी योजना काय?
ST
महिला प्रवाशांचे ‘जाऊ बाई जोरात’! एसटीतून सवलतीत पहिल्या ६ महिन्यांत तब्बल एवढ्या जणींचा प्रवास

३० सप्टेंबरनंतर या नोटांचं काय होणार?

३० सप्टेंबरनंतर या दोन हजारांच्या नोटांचं काय होणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर अजिबात घाबरू नका. ३० सप्टेंबरनंतरही या नोटा कायदेशीर राहतील, फक्त त्याचा व्यवहाराच्या उद्देशाने स्वीकार केला जाणार नाही. या नोटा फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्येच बदलल्या जातील. परंतु, विहित कालावधीत नोटा का बदलून घेतल्या नाहीत, असं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. ब्लूमबर्गने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What will happen if deadline to exchange or deposite 2 thousands notes is missed sgk

First published on: 25-09-2023 at 13:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×