Why Market down today: शेअर बाजारात गेल्या काही सत्रांपासून सुरू असलेल्या तेजीला आज (शुक्रवारी) मोठा धक्का लागला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,०१७ अंशाची घसरण होऊन ८१,१८३ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही २९२.९१ अंशाची घसरण होऊन २४,८५२ पातळीवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण झाल्यानंतर लालेलाल झालेल्या बाजारामुळे गुंतवणुकदारांना पाच लाख कोटींच्या नफ्यावर पाणी सोडावे लागले.

भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातील सर्वच क्षेत्र लाल रंगाने आज व्यापले होते. यामध्ये पीएसयू बँकांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर निफ्टीच्या घसरणीत रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि एसबीआयचा मोठा वाटा आहे. मुंबई शेअर बाजारातील मिडकॅप निर्देशांक १.४ टक्क्यांनी घसरला. तर स्मॉलकॅप निर्देशांकात १ टक्क्यांची घसरण झाली.

GST Council Meeting : २००० रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर १८ टक्के कर द्यावा लागणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची…
Adani Faces Challenges in Kenya| Kenya Workers Strike Against Adani Project
Adani Airport Project in Kenya: “अदाणी’ला जावंच लागेल”, केनियामध्ये शेकडो कामगार रस्त्यावर उतरले; आंदोलन संपूर्ण नैरोबीत पसरलं!
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
plastic manufacturing factory Ghatkopar fire
घाटकोपरमध्ये प्लास्टिक वेष्टन तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

हे वाचा >> Maharashtra FDI : महाराष्ट्रात गुजरातच्या आठपट परकीय गुंतवणूक; फडणवीसांनी जाहीर केली आकडेवारी

बाजारात घसरण होण्याची कारणे काय?

फायनान्शियल एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिकेत मंदीची चाहूल लागल्यानंतर तेथील बाजार रात्रभर घसरल्याचे दिसले, त्यानंतर त्याचा प्रभाव भारतीय शेअर बाजारावरही पडल्याचे दिसले. अमेरिकेन शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर त्याचे पडसाद आशियाई शेअर बाजारावर दिसून आले. शुक्रवारी अमेरिकेत रोजगाराशी संबंधित महत्त्वाचा अहवाल सादर होणार आहे. हा अहवाल फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराशी संबंधित निर्णयांवर परिणाम करू शकतो.

तसेच १४ दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. त्यामुळे अनेक गुंतवणूक दारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली. बाजारात होत असलेली ही विक्री हे एक कारण घसरणीला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा >> Goldman Sachs about Gold: सोन्यात गुंतवणूक करावी का? ‘गोल्डमन सॅक्स’ म्हणतं ‘Go for it’, कारण…

गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज (६ सप्टेंबर) घसरून ४६०.४६ लाख कोटी रुपयांवर खाली आले. गुरुवारी (५ सप्टेंबर) या कंपन्यांचे बाजार भांडवल ४६५.६८ लाख कोटी रुपये इतके होते. आज मोठी घसरण झाल्यानंतर बाजार भांडवलात ५.२२ लाख कोटींची घसरण पाहायला मिळाली.

सरकारी बँकांची निराशाजनक कामगिरी

शेअर बाजारातील पीएसयू अर्थात शेअर बाजाराच्या समभागांत मोठी घसरण पाहायला मिळाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडे दिलेल्या आकडेवारीनुसार, बँक ठेवींमध्ये ११.७ टक्क्यांची वाढ आणि बँक क्रेडीटमध्ये १५ टक्के वाढ दिसून आली. या दोन्हींमध्ये बरेच अंतर वाढल्यामुळे संभाव्या समस्या निर्माण झाल्या. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकात ३.५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. तर इंडियन बँक, कॅनरा, एसबीआय, बँक ऑफ बडौदा आणि पीएनबीचे शेअर्स तीन ते पाच टक्क्यांनी घसरले.