आधार कार्ड अपडेट करणे पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे. तुम्ही तुमचा आधार तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर किंवा ऑनलाइन देखील अपडेट करू शकता. जर तुमचे आधार कार्ड १० वर्षांहून अधिक जुने असेल आणि एकदाही अपडेट केले नसेल, तर तुम्हाला तुमचे आधार अपडेट करून घ्यावे लागणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने १४ जून २०२३ पर्यंत आधार अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. यानंतर ही सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. विशेष म्हणजे आता तुम्ही घरी बसून आधार कार्ड अपडेट करू शकता, कसे ते जाणून घेऊ यात.

आयडी प्रूफ आणि घराचा पत्ता अपलोड करावा लागणार

ऑनलाइन आधार अपडेटसाठी तुम्हाला तुमचा आयडी प्रूफ आणि घराचा पत्ता अपलोड करावा लागेल. हे दस्तऐवज तुम्हाला तुमचा लोकसंख्याशास्त्रीय (demographic) तपशील दुरुस्त करण्यात मदत करेल.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
should i file income tax
विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?

आधार अपडेट कसे करायचे?

तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरच्या मदतीने https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करावे लागेल.
यानंतर तुम्हाला आधार क्रमांक आणि OTP टाकावा लागेल.
आता दस्तऐवज अद्ययावत पर्याय निवडा आणि त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला ड्रॉप लिस्टमध्ये तुमचा आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफ स्कॅन करून अपलोड करावा लागेल.
तुम्ही सबमिटवर क्लिक केल्यानंतर विनंती क्रमांक मिळेल आणि आधार अपडेट फॉर्म सबमिट करावा लागेल.
रिक्वेस्ट नंबरद्वारे तुम्ही तुमच्या आधारची स्थिती जाणून घेऊ शकता.
आधार कार्ड अपडेट केल्यानंतर तुम्ही तुमचे अपडेट केलेले आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

हेही वाचाः पोस्ट ऑफिसमध्ये २००० रुपयांच्या नोटा बदलून मिळणार का? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

अपडेट फी कधी भरावी लागणार?

तुम्हाला आधार अपडेटची मोफत सुविधा फक्त आधार पोर्टलवर मिळेल. जर तुम्ही आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट केले तर तुम्हाला अपडेट शुल्क भरावे लागेल. आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावे लागते.

हेही वाचाः सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशानंतर गौतम अदाणींचे ‘अच्छे दिन’; समूहाला तीन दिवसांत १.८ लाख कोटींचा नफा