Zerodha Nikhil Kamath Success Story : झिरोधा ही एक ब्रोकरेज कंपनी आहे. याद्वारे तुम्ही ऑनलाइन डिमॅट खाते उघडून शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये पैसे गुंतवू शकता. भारतातील काही स्टार्टअप्सपैकी हे एक आहे, जे मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे. झिरोधाने या आर्थिक वर्षात २००० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, निखिल आणि नितीन कामत या दोन भावांनी ही कंपनी स्थापन केली असून, त्यांनी फायनान्सचं औपचारिक शिक्षणही घेतलेलं नाही. नितीन कामत अभियंता आहेत, तर निखिल कामत यांनी शाळेतूनच शिक्षणाला राम राम ठोकला. यामुळेच त्यांना कंपनी स्थापन करण्यासाठी निधीही मिळाला नाही. आजही बाहेरून एकही पैसा झिरोधामध्ये गुंतवला जात नाही, पण २ भावांनी स्वबळावर ही कंपनी स्थापन करून त्यातून मोठ्या प्रमाणात फायदा मिळवला आहे.
नितीन कामत हा अधिक लोकप्रिय चेहरा असून, तो दोन भावांमध्ये तो मोठा आहे. मात्र, धाकटा भाऊ निखिल कामतची कहाणी काही वेगळी नाही. ते सध्या कंपनीचे सह-संस्थापक आणि CFO आहेत. ज्या व्यक्तीला शालेय शिक्षणही पूर्ण करता आले नाही, त्याने शिकण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर १६,५०० कोटी रुपयांची कंपनी कशी बनवली या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. झिरोधाचे मूल्य सुमारे २ बिलियन डॉलरच्या आसपास आहे.
मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zerodha success story call center job at the age of 17 and a billionaire at the age of 34 the brothers founded a company worth 16500 crores vrd