महाविद्यालयातील तरुण मंडळी जरी सुटय़ांचा आंनद लुटत असली तरी व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणारी विद्यार्थी मंडळी मात्र इंटर्नशिप करण्यात व्यस्त आहेत. परीक्षा संपल्यानंतर इंटर्नशिपचे दार विद्यार्थानी सुट्टीत उघडले आहे. व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम विद्याय्र्थाना भविष्यात स्वत:च्या पायावर उभा राहण्यास मदत करतो. मात्र पुस्तकी ज्ञानासोबतच त्याला व्यावहारिक ज्ञानाची आवश्यकता असते. इंटर्नशिप नेमक्या व्यावसायिक गोष्टीची जाण मुलांना करून देते. अभियांत्रिकी, वास्तुविशारद, व्यवस्थापन आणि माध्यमक्षेत्रात प्रत्यक्ष काम करणे महत्त्वाचे असते. प्रत्यक्ष काम केल्याने अनुभवाची शिदोरी विद्यार्थ्यांच्या गाठीशी बांधली तर जातेच; मात्र नोकरी वा व्यवसाय करताना हे अनुभव कामाला येतात. बऱ्याच वेळा महाविद्यालये स्वत: मुलांना इंटर्नशिप मिळवून देतात. अशाच काही विद्याय्र्थाची इंटर्नशिपबाबत जाणून घेतलेली मते.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !
Satyam Surana
पंतप्रधान मोदींचे समर्थन केल्यामुळं युकेमध्ये भारतीय विद्यार्थ्याची हेटाळणी

कायद्याची इंटर्नशिप

मी विधि महाविद्यालयात पहिल्या वर्षांत कायद्याचे शिक्षण घेत आहे. इंटर्नशिप हा प्रकार माझ्यासाठी नवीन असल्याने त्याचा अनुभव आणि त्यामधून मिळणारा अनुभव घेण्यासाठी मी उत्साहात आहे. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी इंटर्नशिप हा प्रकार महत्त्वाचा आहे. एखाद्या अनुभवी वकिलाच्या हाताखाली अथवा एखाद्या संस्थेमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम करण्यासाठी इंटर्नशिपमधून मिळालेला अनुभव फार कामास येतो. शिवाय इंटर्नशिपचे आयोजन महाविद्यालय करत असल्याने शोधण्याचे कष्ट वाचले जाणार आहेत.

प्राजक्ता बोरकर 

कॅटरिंग व्यवस्थापनाचा अनुभव

आमच्या अभ्यासक्रमाच्या पहिले आणि दुसरे वर्ष लेखी परीक्षांचे असते. मात्र चौथ्या परीक्षेनंतर महाविद्यालयाकडूनच चार महिन्यांसाठी प्रशिक्षणासाठी आम्हाला पाठवले जाते. शिवाय प्रशिक्षणाचे पैसही दिले जातात. तसेच प्रशिक्षणानंतर त्याचे प्रमाणपत्रही दिले जाते, ज्याचा उपयोग शेवटच्या वर्षांला म्हणजे तिसऱ्या वर्षांचा अंतिम सहाव्या परीक्षेसाठी होतो. कॅटरिंग व्यवस्थापनाच्या इंटर्नशिपमध्ये एकूण चार विभाग येतात. ज्यामध्ये खाण्याचे व्यवस्थापन, खाणे आणि सेवा, कार्यालयीन कामकाज आणि हाऊसकीपिंग असे पर्याय उपलब्ध असतात. या चार विभागांचा अनुभव घेतल्यानंतर आमच्या प्रगतिपुस्तकात कामाबाबत शेरा दिला जातो. या सगळ्याचा फायदा नोकरी मिळवताना होतो.

शैलेश गायकवाड

जबाबदारी आली..

मी मूळची सिंधुदुर्गची आहे. मुंबईत गेली ३ वर्षे रुईया महाविद्यालयात माध्यम शिक्षणाचा अभ्यास मी घेतला आहे. मुख्य म्हणजे माध्यम क्षेत्रात काम करताना इंटर्नशिपच्या अनुभवाचा तुम्हाला फार उपयोग होतो. माध्यम शिक्षणाची

तीन वर्षे मी सातत्याने विविध माध्यमांमध्ये काम केल्याने त्याचा फायदा परीक्षा लिहितानाही झाला. माध्यम इंटर्नशिप केल्याने मी सतत अपडेट राहायला शिकले. शिवाय माध्यमक्षेत्रात काम करणे अत्यंत जबाबदारीचे काम आहे याची जाणीव मला इंटर्नशिपने करून दिली. कारण माध्यमामध्ये एक चूक तुम्हाला खूप महागात पडते. कारण लाखो लोक तुम्हाला पाहत किंवा वाचत असतात त्यामुळे चूक झाल्यास तुमच्या काम करत असलेल्या माध्यमाचे नाव खराब होते.

क्रांती कानेटकररुईया महाविद्यालय

स्टार्टअपने स्टार्ट झालो.

सध्या स्टार्टअपची लाट असल्यामुळे मला त्याबद्दल कुतूहल होते. त्यामुळे मी सेल्स क्षेत्रातील इंटर्नशिप निवडली. याद्वारे मला उच्च व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांशी व ग्राहकांशी थेट संवाद साधता येतो. त्यामुळे मला दोन्ही बाजू नीट समजून घेण्याची संधी मिळते. कंपनी अजून उभारत्या पातळीवर असल्याने स्टार्टअपला यशस्वी करण्यासाठी काय काय गरजेचे असते हे मला या निमित्ताने जवळून बघायला मिळते. इंटर्नशिपमध्ये काम करून आत्मविश्वास मिळतो. त्यामुळे पुढच्या मुलाखतीला समोरे जाणे सोपे पडते. शिवाय तुमचं काम आवडल्यास त्याच कंपनीतून तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते.

ओंकार कुलकर्णी, एमबीए, एनएमआयएमएस हैदराबाद

मेहनतीला पर्याय नाही हे समजले

मी एल अँड टी या कंपनीत पोस्ट प्रोजेक्ट ट्रेनी म्हणून काम करतोय. इंटर्नशिप ही पुढे मिळणाऱ्या नोकरीची तालीम असते. महाविद्यालय संपल्यानंतर लगेच नोकरीला रुजू होण्यापेक्षा इंटर्नशिप केल्याने बराच फायदा होतो. काम शिकण्याव्यतिरिक्त चारचौघात कसे वागावे, कसे बोलावे हे उमगते. आपण इंटर्न असल्याने आपल्या काही चुकांना नजरेआड केलं जातं. ही सूट एखाद्या कर्मचाऱ्याला मिळणे कठीण असते. इंटर्नशिप करताना मला चांगला अभियंता होण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे समजलं. या दरम्यान मी नवीन लोकांना भेटलो ज्यांनी मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे एक दिशा दिली. शिवाय मी तिथे शिकण्याचा मला मोबदला मिळाला.

अजिंक्य रत्नपारखी, एमटेक, व्हीआयटी चेन्नईै