14 October 2019

News Flash

कलेचे चीज झाले..

‘क ला काना का’ मराठी एकांकिका स्पर्धेसाठी जोमाने तालमी सुरू होत्या.

‘क ला काना का’ मराठी एकांकिका स्पर्धेसाठी जोमाने तालमी सुरू होत्या. लेखक आणि दिग्दर्शकांना पुरस्कार जाहीर करण्यात येणार असल्याने विद्यार्थी कलाकारांनी नाटय़ लेखनावर आणि मांडणीवर विशेष मेहनत घेतली होती. समाजातील परिस्थितीवर आधारित संवेदनशील विषयांना हात घालत अनेक नाटके सादर करण्यात आली. विषयांची विविधता हे या स्पर्धेचे आकर्षण होते.

ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या ‘क ला काना का’ या एकांकिकेने प्रथम पारितोषिक पटकावले. सॅनिटरी पॅड हे महिलांसाठी अत्यावश्यक वस्तूवर जीएसटी लावल्याने ग्रामीण भागातील एक मुलीने छेडलेल्या लढय़ावर भाष्य करणाऱ्या ‘ते ती आणि..’ या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाची एकांकिकाही प्रथम क्रमांकाची भागीदार ठरली. बेताची परिस्थितीत असतानाही अशिक्षित घरात वाढणाऱ्या मुलांवर अपेक्षांचे ओझे काय असते, याचे वास्तववादी चित्रण मांडणाऱ्या पोद्दार महाविद्यालयाच्या ‘ड्रायव्हर’ या एकांकिकेला द्वितीय क्रमांक मिळाला. पोद्दार महाविद्यालयाच्या शंतनू रांगणेकर याला या एकांकिकेसाठी सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. माटुंग्याच्या रुपारेल महाविद्यालयाच्या एकांकिकेने तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. नाटकाचा दिग्दर्शक यश ढोल्ये याला उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले आहे.

याशिवाय लोकनृत्य स्पर्धेत लोकनृत्याचे गुरू म्हणून प्रसिद्ध असलेल्या विद्यार्थीप्रिय प्रशांत बाफलेकर यांचे हे लोकनृत्य बसविण्याचे २५वे वर्ष होते. यंदा त्यांनी १० ते ११ महाविद्यालयांना मार्गदर्शन केले. स्पर्धेत मुंबईबाहेरून आलेल्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य सादर केली.

लोकनृत्य स्पर्धा निकाल

 • प्रथम – व्हिवा महाविद्यालय, एस एन शेट्टी महाविद्यालय.
 • द्वितीय – नरसी मुंजी महाविद्यालय, साठय़े महाविद्यालय, अन्नालीला महाविद्यालय, मॉडेल महाविद्यालय.
 • तृतीय – अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालय, संत गाडगे महाराज महाविद्यालय.
 • उत्तेजनार्थ – सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, तुकाराम भाऊराव धरणे महाविद्यालय

एकांकिकाप्रमाणे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत सादर होणाऱ्या नाटुकली अर्थात ‘स्किट’ स्पर्धाना विशेष महत्त्व आहे. या नाटय़प्रकारात कमी वेळेत अधिक आशय रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान विद्यार्थी कलाकारांसमोर असते. वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयाच्या सभागृहात या स्पर्धा पार पडल्या. मराठी स्किट स्पर्धेत महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या ‘थोर पुरुष व त्यांच्या पुतळ्यांची होणारी अवहेलना’ला प्रथम पारितोषिक मिळाले. सेल्फीच्या नादामुळे माणूस कसा बंदिस्त होत गेला आहे, याचे चित्रण करणाऱ्या ‘सेल्फी’ या उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाच्या नाटुकलीला हिंदी स्किट स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले. या वेळी सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का, जीएसटी, पारंपरिक गणेशोत्सव, मानसिक बलात्कार, २९ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसात अडकलेली मुंबई अशा विविध विषयांवर नाटुकली सादर करण्यात आल्या.

 • मराठी स्किट निकाल
 • प्रथम – एम डी महाविद्यालय
 • द्वितीय – डी बी जे महाविद्यालय
 • तृतीय – एस एच महाविद्यालय, डहाणूकर महाविद्यालय

हिंदी स्किट निकाल

 • प्रथम – आर ए आय टी महाविद्यालय
 • द्वितीय – पिल्लई आणि गुरुकुल महाविद्यालय
 • तृतीय – पोद्दार महाविद्यालय, सीएचएम महाविद्यालय

मूकनाटय़ाचे मानकरी

मूकनाटय़ाच्या संकल्पनेवर आधारित वाढत्या हिंसाचारात शांततेची नितांत गरज, मेहनतीच्या कामाचे समाधान, स्वातंत्र्यानंतर भारताचा विकास हे विषय घेऊन मूकनाटय़े सादर करण्यात आली. शब्दांची मदत नसताना केवळ मुद्राभिनय, विशिष्ट हालचालींनी आशय-संवाद प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची कला या वेळी पाहावयास मिळाली.

मूकनाटय़ाचे निकाल

 • प्रथम – पोद्दार महाविद्यालय, पाटकर महाविद्यालय
 • द्वितीय – सोमय्या महाविद्यालय, वझे-केळकर महाविद्यालय
 • तृतीय – एम डी आणि डी बी जे महाविद्यालय

पारंपरिक वाद्यांचा साथीने दैनंदिन व्यवहारातील वस्तूंचा वापर करीत केलेली नादनिर्मिती ही यंदाचा ‘फोक ऑर्केस्ट्रा’ पार पडला. पितळेचे ताट, सुपामधील धान्य पाखडण्याच्या ध्वनी आणि बांबूच्या मदतीने तालनिर्मिती करण्यात आली. विद्यापीठाच्या विद्यार्थी भवनात पार पडलेल्या या स्पर्धेत १५ महाविद्यालये अंतिम स्पर्धेसाठी रिंगणात होती. पारंपरिक लोकसंगीताबरोबरच चित्रपट गीतांची सांगड रंगतदार ठरली.

‘फोक ऑर्केस्ट्रा’ निकाल

 • प्रथम – डहाणूकर महाविद्यालय
 • द्वितीय – अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय
 • तृतीय – पोद्दार महाविद्यालय

First Published on October 14, 2017 3:19 am

Web Title: articles in marathi on mumbai university youth festival