सामाजिक आर्थिक विकासाच्या गरजेतून संतुलन राखणे हे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट आहे. यातूनच भविष्याची योग्य वाटचाल होऊ शकते. जर्मनीच्या शिक्षण आणि विज्ञान संशोधन विभागातील केंद्रीय मंत्र्यालयाच्या २०१६च्या ग्रीन टॅलेंट स्पर्धा २०१६-२०१७ या वर्षी ‘समुद्र आणि महासागर’ विषय घेण्यात आला आहे. या वेळी हवामान बदल, प्रदुषण आणि पृथ्वीवरील सर्वाधिक मोठे नैसर्गिक स्रोत मानल्या जाणाऱ्या महासागरांमध्ये होणाऱ्या अमाप मासेमारीच्या परिणाम या समस्यांची उत्तरे शोधणारे त्याचबरोबरच सर्वसाधारणपणे पर्यावरणासमोरील आव्हाने, संशोधन सहकार्य यासंबंधित संशोधनाचा विषय असावा.
संशोधनाच्या विविध क्षेत्रांतील कल्पक हरित कल्पना जगासमोर आणणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी वयाची अट नसून पर्यावरणासंबंधित संशोधन असल्यास त्याची माहिती संस्थेच्या संकेत स्थळावर देण्यात आली आहे. या स्पर्धेमधून निवड झालेल्या विजेत्यांना जर्मनीचा दौरा करता येणार असून जर्मनीतील संशोधक संस्था आणि संस्थामधील तज्ज्ञांशी संवाद साधत येणार आहे. या स्पर्धेची सुरुवात २००९ पासून झाली असून दरवर्षी जर्मनी मंत्रिमंडळाकडून देशभरातील २५ तरुण संशोधकांना जर्मनीचे मंत्री जोहाना वांका यांनी दिलेल्या अर्थसाहाय्यामार्फत ग्रीन टॅलेंट पुरस्काराने गौरविण्यात येते. मागील वर्षी या स्पर्धेत सहभागी झालेल्या दोन भारतीय नागरिकांची निवड झाली होती.
आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ४६ देशातील १५७ तरुण संशोधक आणि शास्त्रज्ञांचा गौरव करण्यात आला आहे. विजेत्यांची निवड जर्मनीच्या तज्ज्ञ मंडळींकडून करण्यात येते. यासंबंधितच्या अधिक माहिती आणि अर्ज भरण्यासाठी http://www.greentalent.de या संकेतस्थळावर संपर्क साधावा.