News Flash

नव्या-जुन्यांची चुरस

या कार्यशाळेत संगीत, नाटय़ आणि ललित कला श्रेत्रातील तंज्ज्ञानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

प्रथम वर्ष पदवीचे वर्ग सुरू होत नाही तोच महाविद्यालयांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे वारे वाहू लागले आहेत. विद्यापीठाने या वर्षीच्या युवा महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर केले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धाविषयी माहिती मिळावी या उद्देशाने यंदा पाच ठिकाणी कार्यशाळाही घेण्यात आल्या. गत वर्षीचे विजेते आणि नवे खेळाडू यांच्यात यंदा चांगलीच चुरस पाहावयास मिळणार आहे. पाहू या यंदाचे युवा महोत्सवाचे वेळापत्रक आणि गतवर्षीच्या विजेत्यांची मते.

महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वर्तुळात कमालीची उत्सुकता लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या विभागीय फेरीच्या तारखा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे  जाहीर करण्यात आल्या. २८ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान या विभागीय फेऱ्या मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हय़ात पार पडणार आहेत.

४९ व्या युवा महोत्सवासाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हय़ातील काही महाविद्यालयांना विभागीय फेरीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडण्यात येते. त्यानंतर निवडलेले स्पर्धक महाविद्यालयात त्या-त्या विभागानुसार विभागीय फेरी होऊन अंतिम फेरीसाठी पाठवले जातात. यंदाच्या वर्षी विभागीय फेरीतील सादरीकरणाच्या स्पर्धा २८ जुलै रोजी सिंधुदुर्ग विभागातून एस.एच.केळकर देवगड महाविद्यालयात, २९ जुलै रोजी रत्नागिरी विभागातून डी.जे.सामंत पाली महाविद्यालयात, ३१ जुलै रोजी रायगड विभागातून डॉ.नानासाहेब धर्माधिकारी कोलाड महाविद्यालयात आणि १ ऑगस्ट रोजी रयत शिक्षण संस्था पनवेल महाविद्यालयात, ३,४,६ ऑगस्ट रोजी ठाणे विभागातून खर्डी, साकेत आणि व्हिवा महाविद्यालयात तर मुंबई विभागातून ७,८,९ आणि १३,१४ ऑगस्ट रोजी बी.एल.अमलानी (विलपार्ले), वी.जी.वझे (मुलुंड), आर.ए.पोद्दार (मांटुगा) या महाविद्यालयात होणार आहेत. तसेच ललित कला आणि साहित्य विभागाच्या स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी संत गाडगे महाराज महाविद्यालय (गिरगाव), मोतिलाल झुनझुनवाला महाविद्यालय (वाशी),  गाला महाविद्यालय (सांताक्रूझ) या महाविद्यालयात पार पडणार आहेत. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी विद्यापीठातर्फे विशेष कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत संगीत, नाटय़ आणि ललित कला श्रेत्रातील तंज्ज्ञानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या सगळ्या स्पर्धाच्या तारखा जाहीर झाल्यामुळे महाविद्यालयात सध्या तयारीला जोम आला आहे. रंगीत तालमी, सामानांची जमवाजमव, प्रतिनिधींच्या बैठका करण्यात ही कलाकार मंडळी व्यस्त आहेत. गत वर्षीच्या विजेत्यांमध्येही या वर्षीच्या सहभागाबद्दल उत्साहाचे वातावरण असून त्यांनीही आपल्या वैयक्तिक तालमींना सुरुवात केली आहे तर अशाच काही गतविजेत्या मित्र-मैत्रिणींची यंदाच्या सहभागाबद्दल जाणून घेतलेली मते..

राष्ट्रीय चमूत सहभागी होण्याचे स्वप्न..

युवा महोत्सवाचे मागच वर्ष माझ्यासाठी खुप सुदंर होत. साठय़े महाविद्यालयाने सादर केलेल्या हिंदी आणि मराठी अशा दोन्ही एकांकिका अंतिम फेरीत येऊन मराठी एकांकिका अर्बन तृतीय तर हिंदी एकांकिका तपीश ही प्रथम क्रमाने विजयी झाल्या. त्याच बरोबरीने तपीशसाठी सवरेत्कृ ष्ठ अभिनेत्रीची दोन सुवर्ण पदके मला मिळाली त्यामुळे आनंदात आणखीनच भर पडली. गेल्यावर्षीची हीच उमेद कायम ठेवत यंदाही युवा महोत्सवात मी सहभागी झाली असून त्याच्या तालमीला जोमाने सुरुवात केली आहे.यंदा नव्या दिग्दर्शकाचा हाताखाली काम करायला मिळत असल्याने मला नवीन नाटय़ प्रकिया अनुभवता येतेय. त्यामुळे काम करायला नवीन उत्साह निमार्ण झाला आहे. तसेच यावर्षी युवा महोत्सवाच्या राष्ट्रीय चमूत सहभागी होण्याची इच्छा आहे.

– मानसी प्रभुलकर, साठय़े महाविद्यालय

यावर्षी दुप्पट मेहनत करतोय..

गेल्या वर्षी युवा महोत्सवात मी प्रथमच सहभागी झालो होतो आणि योगायोगाने आमच्या पोदार महाविद्यालयाच्या मराठी एकांकिका ‘वेटिंग फॉर गोदोत’साठी मला सवरेत्कृ ष्ठ अभिनयासाठी सुवर्ण पदक मिळाल होत. पण गेल्या वर्षीच्या योगायोगावर विश्वास न ठेवता यावर्षी मी दुप्पट मेहनत करतोय. युवा महोत्सवाच्या नाटय़ स्पर्धत तगडे स्पर्धक सहभागी होत असल्याने स्पर्धची रंगत अधिक वाढते आणि या शर्यतीत माझे गतवर्षीचे अस्तिव टिकवूण राहण्यासाठी दुप्पट मेहनतीने तालमीला लागलोय यासाठी आमच्या दिग्दर्शकांचे सल्ले लक्षात घेतोय. तसेच महाविद्यालयाच्या सी एल पदाची जबाबदारीही माझ्यावर असल्याकारणाने मेहनतीसारखीच जबाबदारीही दुप्पट झाली आहे.

– शंतनु रांगणेकर, पोदार महाविद्यालय

जबाबदारी वाढली..

गेल्या वर्षी युवा महोत्सवाची तयारी मी अवघ्या दहा दिवसांच्या तालमीत केली होती. तरीही अंतिम फेरीत मला हिंदी एकपात्रीसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल होत. यंदा मी मराठी आणि हिंदी एकपात्री अशा दोन्हीं स्पर्धामध्ये  सहभागी झाले आहे. पण यंदा जबाबदारी वाढली आहे, कारण गेल्यावर्षी पारितोषिक मिळाल्यामुळे खूप अपेक्षा वाढल्या आहेत. म्हणून थोडी भीती वाटतेय; पण मला स्वत:वर  पूर्ण विश्वास आहे. या वर्षीचा एकपात्रीचा माझा विषय सोपा आहे. त्यामुळे हा विषय अधिक प्रभावशाली पध्दतीने मांडण्याचा मी प्रयत्न करणार असून वरच्या क्रमाकाचे बक्षिस मिळविण्यासाठी भरपूर मेहनत करणार आहे.

– श्वेता पानमंद, शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालय

अखेरीस यश मिळाले..

माझा गेल्या वर्षीचा युथ फेस्टिवलचा अनुभव हा रोमांचक आणि अविस्मरणीय आहे. मागील वर्षे हे माझ्या शैक्षणिक वर्षांतले शेवटचे वर्ष असल्याने महाविद्यालयाला एक तरी पदक मिळवूण देण्याची इच्छा होती जी पुर्ण झाली. वकृत्त्व आणि वादविवाद स्पर्धेत मला तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक आणि पदक मिळाले.

– सौरभ नाईक, साठय़े महाविद्यालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 1:07 am

Web Title: campus events college fests in mumbai
Next Stories
1 स्वकीयांशीच कठोरता..
2 पोकेमॉन गो; जरा जपून..
3 विद्यार्थी, पाऊस आणि खाबूगिरी..
Just Now!
X