व्याख्यान
टेडएक्स या व्याख्यान मालिकेतील सर्वात प्रभावी वक्ते म्हणून ओळख असलेले पॉल डून आणि मसामी सातो यांचे व्याख्यान ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ‘बाय वन गिव्ह वन’ ही संकल्पना सांगणारे हे दोघे ‘पॉवर ऑफ स्मॉल’ या विषयावर बोलणार आहे. हे व्याख्यान थडोमल सहानी सेंटर फॉर मॅनेजमेंट, २५७, स्वामी विवेकानंद मार्ग, वांद्रे (प.) या संस्थेत ९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत पार पडणार आहे. हे व्याख्यान सर्वासाठी खुले आहे.
वक्तृत्व स्पर्धा
वक्तृत्वही कला अवगत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर खूप संधी मिळतात. तेथे प्रत्येक वेळी झळकणारा तो विद्यार्थी महाविद्यालयील जीवनात काहीसा दूर फेकला जातो. यामुळे महाविद्यालयांमध्येही वक्तृत्व स्पर्धा महत्त्वाची ठरते. ‘शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचा’च्या वतीने ‘लोकनायक जयप्रकाश आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा’ रविवारी २४ जानेवारी रोजी मुंबई सर्वोदय मंडळ येथे आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांसाठी खुली असून स्पर्धेसाठी शेतकरी सन्मानाने कसा जगेल? वाढती असहिष्णुता, गांधींचे वेगळेपण हे तीन विषय ठेवण्यात आले आहे. संपर्क : ९२२१४१४०५७.
महाविद्यालयाचा तारा
महाविद्यालयात असताना किंवा महाविद्यालय सोडल्यानंतर आपण केलेल्या कामाचा आढावा घेऊन अनेक महाविद्यालये माजी विद्यार्थ्यांचा गौरव करत असतात. रुईया महाविद्यालयात ‘ज्वेल ऑफ रुईया आणि रायझिंग स्टार’ हे पुरस्कार देण्यात येतात. यंदा
‘ज्वेल ऑफ रुईया’ हा पुरस्कार एम. एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाचे डॉ. रवी बापट यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर
‘रायझिंग स्टार’ हा पुरस्कार आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर आणि कॅप्टन
प्राजक्ता देसाई यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा महाविद्यालयाच्या सभागृहात डॉ. अनिल अवचट यांच्या अध्यक्षतेखाली ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे.