राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या वाणिज्य भाग तीनच्या निकालात नवप्रतिभा महाविद्यालयातील क्रिष्णवेणी आनंद जन्नरम हिने ७०.३५ टक्के गुण मिळवणून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. या अभ्यासक्रमातील ५० विद्यार्थ्यांपैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी ६८ एवढी आहे. याबद्दल जीवनविकास एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष बाबुराव झाडे, सचिव राजेंद्र झाडे, प्राचार्य डॉ. देवमन कामडी आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ज्योती तम्हाणे यांनी क्रिष्णवेणीसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यूपीएससीत १२४व्या क्रमांकावरील डॉ. बोंदरचा सत्कार शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉ. सिद्धेश्वर बोंदर याने युपीएससीमध्ये मिळवलेल्या सुयशाचा कौतुक सोहळा महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.

महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. सुभाष वाघे यांनी केले. यावेळी संघटनेचे सचिव डॉ. राजेश बसवार, डॉ. आशीष थटेरे, डॉ. मनिष भोयर, डॉ. मितेश चौहान, डॉ. आशीष काळे यांनी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी डॉ. गोपाल शर्मा, डॉ. घनश्याम कोडवानी उपस्थित होते. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार यांनी सिद्धेश्वरचे विशेष कौतुक केले. त्याच्या आगमनाच्यावेळी ढोल ताशांच्या गजरात व फटाके वाजवून जल्लोषात त्याचे स्वागत करण्यात आले. आयुष्यात अनेक अडचणी येत असतात व त्यांना न घाबरता आपली वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते. सिद्धेश्वरच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. अर्धवेळ काम करून शिक्षण पूर्ण तर केलेच शिवाय महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गात पाचव्या क्रमांकवार तर इतर मागासवर्गात तो प्रथम क्रमांकावर आहे.