‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’ उपक्रमात ‘अतिशहाणे वि. अर्धवट’ या अग्रलेखावर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. त्यातील प्रथम पारितोषिकविजेती प्रतिक्रिया..

अजिंक्य यादव
Untitled-24
Loyalty to country ALWAYS. Loyalty to government, when it deserves it  मार्क ट्वेन देशभक्तीची संज्ञा अशी सांगतो. हे वाक्य सध्याच्या राष्ट्रभक्तीची अनेकानेक व्हर्जन्स निघालेल्या आपल्या देशाला बरेचसे लागू पडते. आताचे मोदी सरकार जेव्हापासून सत्तेत आले आहे तेव्हापासून प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रात उजव्या विचारांचे बस्तान बांधायचा प्रयत्न करत आहे आणि हे एफटीआयआय, आयआयटी, एपीएससीचे प्रकरण, हैदराबाद विद्यापीठाचे रोहितचे प्रकरण असो, यातून दिसून आले आहे. साहजिकच, क्रियेला प्रतिक्रिया या नियमाने विरोध होणे स्वाभाविक आहे; परंतु आम्ही सांगू तोच राष्ट्रवाद, आम्ही सांगू तीच देशभक्ती, नाही तर तुमचा तो राष्ट्रद्रोह, हा जो सरकारचा आणि सरकारच्या अघोषित परंतु अधिकृत संघटनांचा अट्टहास आहे त्यातून जेएनयूचा संघर्ष पुढे आला आहे.

कॉलेज प्रशासन हाताळू शकेल अशा मुद्दय़ाचा बाऊ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याचे काम या सरकारनी केले आहे. ळँी उ४ल्ल३१८ ह्र३ँ४३ ं ढ२३ डऋऋ्रूी या कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काश्मीर आणि काश्मिरींच्या प्रश्नांविषयी कार्यक्रमापासून जो घटनाक्रम सुरू झाला आहे, तिथे तिथे सरकार तोंडघशी पडत आलेले आहे आणि ही नामुश्की स्वत: त्यांनी ओढवून घेतली आहे, हे काही घटनांनी दिसून येते. प्रथमत: पोलिसांनी काहीही पुरावे नसताना, फेक व्हिडीओजच्या आधारे बेकायदेशीररीत्या कन्हैया कुमारला अटक केली. तिथे ज्या घोषणा दिल्या गेल्या त्या समर्थनीय नाहीच, अभिव्यक्तिस्वातंत्र्य वापरताना तारतम्य हवेच याबद्दल दुमत नाही; परंतु ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवण्याचे लेबिलग सुरू झाले ते िनदनीयच! अफझल गुरूची फाशी हा आजही मानवाधिकाराच्या कक्षेत तसेच काश्मिरी तरुणांच्या अस्मितेचा विषय आहे. काश्मिरी तरुणांची अस्मिता अभ्यासायची झाल्यास खुद्द अफझलच्या मुलाखती पाहिल्या तरी कल्पना येते. सतत डावलले जाण्याची भावना, आस्फासारखे कायदे यामुळे ३७० असूनही काश्मीर हे भारताच्या ‘राष्ट्र’ या संकल्पनेच्या नजीक पोहोचू शकलेले नाही. ‘भारत माझा देश आहे’ या प्रतिज्ञेच्या पहिल्या ओळीसमोर काश्मिरी तरुणांच्या प्रश्नचिन्ह आहे. अर्थात यामुळे २००१ च्या हल्ल्याचे समर्थन कोणीही करू नये; परंतु अफझल हा काश्मिरींसाठी क्रांतिकारक का ठरला वा का ठरतोय हे पाहणे सोडून एबीव्हीपीसारख्या संघटनांना वैचारिक चर्चा गेली तेल लावत, फक्त राष्ट्रभक्तीची सर्टििफकेट्स वाटायची खुमखुमी निर्माण झाली आहे. हैदराबादच्या घटनेतले माहितीपटावरील बॅन, शीतल साठेंना विरोध इ. अशी अनेक उदाहरणे आहेत आणि जेएनयूच्या वादाची ठिणगीही अशीच पडली आणि या सरकारने या वादाचे पॉलिटिकल ग्लोरिफिकेशन केले आणि तेही गृहमंत्री आणि शिक्षणमंत्री यांनी.

सरकार इथेही चुकीचे ठरले, कारण गृहमंत्रिपदावर असलेल्या राजनाथ सिंह जेव्हा खुलेआम विद्यार्थ्यांची आणि हाफिज सईदची मिलीभगत असल्यागत वक्तव्ये करतात, तेही फेक ट्विटर अकाऊंटच्या संदर्भाने, तेव्हा हा अक्षम्य बेजबाबदारपणा असतो. याचबरोबर विद्यार्थी नुसत्या घोषणा दिल्याने राष्ट्रद्रोही ठरत नाही, हे सुप्रीम कोर्टने आधीच सांगून ठेवले आहे, हे माहीत नसणे हे अज्ञान एक वेळ स्मृती इराणींसारख्या मंत्रीकडून ठीक आहे, परंतु जे संघाच्या वैचारिक बौद्धिकाने तयार झालेले आहेत त्या राजनाथ सिंहांनी ते जोपासावे? आणि मुख्य म्हणजे यात सीमेवर लढणाऱ्या सनिकांची जेएनयूच्या विद्यार्थ्यांशी तुलना वगरे वगरे भावनाप्रधान बोलून जनमत भडकवण्यात बऱ्यापकी यशस्वी ठरलेल्या आणि सरकारच्या प्रचारयंत्रणेच्या भाग असलेल्या एबीव्हीपीसारख्या संघटनांनी कधी राष्ट्रपित्याला गोळ्या घालणाऱ्या नथुरामची पुण्यतिथी न चुकता साजरी करणाऱ्या िहदू महासभेसारख्या संघटनांना कधी जाब विचारल्याचे ऐकिवात आहे काय? उलट, त्याला ‘वध’ असे संबोधून त्याचे उदात्तीकरण करण्यात या संघटना आघाडीवर असतात. अशा संघटनांनी कोण राष्ट्रभक्त आणि कोण राष्ट्रद्रोही हे सांगावे? म्हणजे आपला तो नथुराम आणि दुसऱ्याचा तो अफझल असा न्याय आहे का? ज्यांचे सामाजिक प्रश्न हे धर्म, झेंडे आणि रंगानुसार बदलतात त्यांनी या देशाला अखंडतेचे डोस पाजावे? या जेएनयूच्या मुद्दय़ावर रान माजले, कारण त्या विद्यार्थ्यांची राष्ट्रभक्ती यांच्या क्रायटेरियात बसत नाही. त्यांना देशद्रोही म्हणताना, त्यांचे आपल्या शिक्षणाचे बाजारीकरण होऊ नये यासाठी केलेले आंदोलन कुणीच पाहत नाही. खरं तर, रोहितचे आंदोलन कितीही नाही म्हटले तरी ढिले करण्यात सरकारला यश आले आहे. जेएनयूविषयी मत कलुषित करण्यात सरकारला यश आले आहे आणि या प्रकरणी त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाची खूप मदत झाली आहे; परंतु आता हळूहळू घोषणा देणारे कोण होते आणि काहीही दोष नसताना कोणाला पॅन्ट ओली होईपर्यंत मारले गेले आहे, हे समोर येतच आहे. कन्हैय्या कुमारचा चूक नसताना झालेला छळ ही येत्या काळात सरकारची होणारी नाचक्की असणार आहे. विचाराचा लढा विचारांनी लढावा हे ज्या प्रवृत्तींना मान्य नाही, त्यांनी धाकदपटशाच्या जोरावर जी काही हिटलरशाही चालवायची आहे ती चालवावी. शेवटी विजय हा लोकशाही तत्त्वांचाच होणार हे निश्चित!
(एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे)