News Flash

माझ्या मते.. : राजकीय स्वार्थासाठी पेंग्विनचा बळी

राणीच्या बागेत आलेल्या पेंग्विनपैकी एक पेंग्विनचा मृत्यू झाला.

राणीच्या बागेत आलेल्या पेंग्विनपैकी एक पेंग्विनचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात या पेंग्विन्सना आपल्या देशातील वातावरणाशी जुळवून घेणे शक्य आहे का? त्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे का? या व अशा अनेक प्रश्नांचा विचार करुन पेंग्विन भारतात आणले गेले. मात्र तरीही त्यांचा सांभाळ करण्यात काही त्रूटी राहिल्या आणि एका पेंग्विनचा बळी गेला. यामुळे पेंग्विन राणीच्या बागेत आणणे कितपत योग्य आहे याबाबत तरुणाईचे मत..

अभ्यास करणे गरजेचे आहे

पेंग्विन आपल्याकडे रूळतील असा काळ पाहण्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीचे मतदान होण्याआधी ते लोकांना पाहण्यासाठी खुले केले जातील, अशाप्रकारे त्याची आखणी करण्यात आली होती. ज्यांनी पेंग्विन आणून त्याचे श्रेय मिळविण्याचा प्रयत्न केला त्यातल्या कुणीही पेंग्विन मेल्यावर तिथे जाऊन चार गोष्टी तपासण्याची, चार तज्ज्ञ मंडळींशी बोलण्याचीही जबाबदारी घेतली नाही. हवामान बदलाच्या परिणमाची झळ पहिल्यांदा या पशुपक्ष्यांना, मग पिकांना आणि पर्यायाने माणसांना बसते. प्राणीशास्त्राचा, त्यांच्या वागणुकीचा समूळ अभ्यास केलेला नसेल.

प्रसाद पाष्टे, मुंबई विद्यापीठ      

पूर्वनियोजनाची गरज होती

शीत प्रदेशातील प्राण्यांना मुंबईत आणून प्रशासनाने अक्कल दाखवलीच. जरी त्यांनी इतर  भौगोलीक वातावरणात रुळवण्यासाठी सर्वप्रथम त्याठिकाणचे आवश्यक असे पूर्वनियोजन करणे गरजेचे असते. मात्र कोणत्याही प्रकारचे पूर्वनियोजन न करता पेंग्विन आणले गेले. त्यानां इथे आणून राहण्यासाठी कृत्रिम वातावरण निर्माण केले गेले. शिवाय त्यांना प्रायोगिक तत्वावर बांधलेल्या कक्षात ठेवण्यात आले. ही घाई केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे.

–  सिद्धेश मिरगळ साठ्ये महाविद्यालय

राजकीय स्वार्थासाठी

पेंग्विन आणण्याच्या आधी भारतातील त्यांचासाठी अनुकूल वातावरणाचा प्रशासनाने अभ्यास केला का ? त्यासाठी प्राणीतज्ज्ञ, हवामान अभ्यासक यांची मते जाणून घेतली का ? हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. भारतातात नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या  प्राणीप्रजातींबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत.

तुषार मांडवकर, कोकण ज्ञानपीठ तांत्रिक महाविद्यालय.

प्रकल्प कौतुकास्पद मात्र नियोजनात घोळ

मुंबईत जागतिक दर्जाचे प्राणिसंग्रहालय निर्माण करण्याचा पालिकेचा मानस कौतुकास्पद असला तरी त्यासाठी लागणारा पूर्वअभ्यास, साधनांची पूर्वनियोजितता याची पूर्तता पालिकेने केली नाही आणि तिथेच सगळा घोळ झालेला दिसतो. इतर उष्णकटीबंधीय देशात आज शीत प्रदेशातील प्राणी आहेत मात्र त्यांचे योग्य देखभाल आणि नियोजन केले जाते त्यामुळे आपल्याकडेही अश्या प्रकारे योग्य नियोजन केल्यास अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते.

ओमकार मगदूम शासकीय तांत्रिक महाविद्यालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2016 12:53 am

Web Title: loksatta campus katta readers opinion 6
Next Stories
1 दिवाळी युवकांक हवा..
2 रोजगारशून्यतेवर उत्पादनवाढीचा उतारा
3 माझी दिवाळी, माझे सेलिब्रेशन..
Just Now!
X