News Flash

माझ्या मते.. : हेतू साध्य होईल का?

कॅन्टीन हा कॉलेजमधला एक मोठा आकर्षणाचा कोपरा असतो.

 

विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयीन उपाहारगृहांमध्ये ‘जंकफूड’वर घातलेली बंदी तुम्हाला कितपत योग्य वाटते?

कॉलेजबाहेरचं खाणं आहेच

कॅन्टीन हा कॉलेजमधला एक मोठा आकर्षणाचा कोपरा असतो. त्यामुळे कॅन्टीनमधील जंकफूडवर आणलेल्या बंदीचा हेतू नक्कीच विद्यार्थ्यांना पौष्टिक पदार्थ मिळावेत आणि त्यांनी ते खावेत असा आहे. मात्र खरेच हा हेतू साध्य होईल का? विद्यार्थी कॅन्टीनऐवजी कॉलेजबाहेर मिळणारे जंकफूड खाण्याकडे आपला मोर्चा वळवतील. यापेक्षा विद्यार्थ्यांनीच किती प्रमाणात जंकफूड खावे याकडे लक्ष दिल्यास ते अधिक योग्य होईल. त्यामुळे यूजीसीने घेतलेला जंकफूड बंदीचा निर्णय योग्य असला तरी त्यामागचा त्यांचा हेतू साध्य होईल का, हे पाहावे लागेल.

आदित्य गरुड सोमय्या महाविद्यालय

 

खाण्याचे पर्याय उपलब्ध करा

कॅन्टीनमधल्या जंकफूडवर बंदी घालून फायदा काय? कारण कॉलेजबाहेर मिळणाऱ्या जंकफूडचा पर्याय हा मुलांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे केवळ कॉलेजमधल्या जंकफूडवर बंदी आणण्यापेक्षा कॉलेज आवारात मिळणाऱ्या जंकफूडवर बंदी आणणे तितकेच महत्त्वाचे आहे. याशिवाय बऱ्याचदा मांसाहारी पदार्थ कॅन्टीनमध्ये उपलब्ध नसल्याने विद्यार्थी जंकफूडकडे वळताना दिसतात. त्यामुळे मांसाहारी पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी कॉलेज प्रशासनाने विचार करावा.

सिद्धी वेंगुर्लेकर विद्यालंकर महाविद्यालय

 

जंकफूड निर्मितीचे पर्याय बंद करावेत

बऱ्याचदा प्रसिद्ध जंकफूडची निर्मिती करणारी उपाहारगृहे महाविद्यालयामध्ये अथवा आवारात असलेली पाहायला मिळतात. त्यामुळे जंकफूड बंदीचा निर्णय योग्य असला तरी सर्वप्रथम अशा उपाहारगृहांना कॉलेज आवारातून बाहेर करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय पालकांनीही आपल्या पाल्याच्या आहारावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण बऱ्याचदा पालकच मुलांना बाहेर खाण्याचे सल्ले देताना दिसतात.

बिंदू जाधव साठय़े महाविद्यालय

 

खिशाला परवडणारे..

कधी कधी जंकफूड खाण्याशिवाय आमच्याकडे काहीच पर्याय नसतो. अनेकदा कॅन्टीनमध्ये जंकफूड पदार्थ स्वस्त आणि खिशाला परवडणारे असतात. त्यामुळे त्यांचा पर्याय हा नेहमीच चांगला ठरतो. यापेक्षा स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्यास तो आम्हाला स्वीकारायला निश्चितच आवडेल.

तन्मय शिरोडकर शासकीय तांत्रिक महाविद्यालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2016 12:23 am

Web Title: loksatta campus katta readers opinion 7
Next Stories
1 नोकरीमय कॅम्पस
2 अभिरुची वाढवणारी शिक्षणव्यवस्था हवी
3 माझ्या मते.. : राजकीय स्वार्थासाठी पेंग्विनचा बळी
Just Now!
X