15 December 2017

News Flash

निकालाआधीचा निर्णय..

मोबाइल आणि संगणक विक्रेत्यांची तर दिवाळीच सुरू होती.

लोकसत्ता टीम | Updated: June 3, 2017 1:24 AM

 

याच साठी केला होता अट्टहास. असंच काहीसं वातावरण गेल्या काही दिवसांत दिसून आलं. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आणि मिठाईच्या दुकानांवर रांगा लागल्या. मोबाइल आणि संगणक विक्रेत्यांची तर दिवाळीच सुरू होती. आता यातही काहींच्या पदरी घवघवीत यश, तर काहींच्या पदरी थोडी निराशा दिसली. पण शो मस्ट गो ऑनअसं म्हणत पुढे चालत राहणे तितकेच गरजेचे आहे. धावत्या जगात गुणांना फार महत्त्व प्राप्त झालं आहे. आणि गुणांवरच पुढचा प्रवेश अवलंबून आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना काय करावे, कोणते क्षेत्र निवडावे याविषयी संभ्रम असतो. ते संभ्रम दूर व्हावेत म्हणून आता दहावीलाच मुलांची कल चाचणी केली जाते. परंतु बऱ्याच मुलांना वरवरच्या माहितीच्या आधारे चुकीचे मार्गदर्शन झालेले असते. यासाठीही आजकाल अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांना बोलावले जाते. यातून विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शन होते; परंतु स्वत:च्या जवळचं कुणी तरी मार्गदर्शन करणारे असावे असं सतत वाटते, म्हणूनच निकाल आणि निकालानंतर होणाऱ्या पूर्वपरीक्षा याची विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. कारण निर्णय निकालाच्या आधीच निश्चित असेल तर भविष्यातली एक पायरी चटकन गाठता येते. अशाच काही विद्यार्थ्यांच्या ध्येयाचा आणि त्या क्षेत्रातील तरुण यशस्वी व्यक्तींचा हा थोडक्यात घेतलेला परामर्श.

पुस्तकी ज्ञान नव्हे, अनुभवच कामी येतो!

मी स्वत: ज्या वेळी जे जे स्कुल ऑफ अप्लाइड आर्ट मधून बाहेर पडले आणि  एका एजन्सीमध्ये नोकरी करू लागले त्यावेळी माझ्या लक्षात आले कि अपान जे ज्ञान मिळवले  त्या ज्ञानाचा आणि आपल्या कामाचा तसा फारसा संबंध नाही. इथे प्रत्यक्ष कां करताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. त्यात जाहिरातक्षेत्र म्हणजे माणसांच्या भावनांशी केलेला खेळ आहे. एखादा लोगो किंवा एखादे लेबल डिझाईन करणे इथपर्यंत ठीक होते. पण काही अनुभव असे येतात तेव्हा हे जाहिरात क्षेत्र नव्हे तर त्यापलीकडचेच काहीतरी आहे असा समज होतो. मी जे काही शिकले त्याचा माझ्या पहिल्या नोकरीत म्हणावा तसा उपयोग झाला नाही याची मात्र खंत आहे.

जाहिरातीच्या क्षेत्रात येताना एखादी वस्तू वा एखादी सव्‍‌र्हिस विकताना, ती ज्याला/जिला विकत आहोत तिचा विचार करण्याची पद्धत, तिच्या सवयी ह्य बाबी आपण लक्षात घ्याव्या लागतात. व आपल्या ग्राहकाला आपण जे म्हणतो आहोत ते कसं बरोबर आहे हे पटवून देण्याचे कौश्यल्य असणे आवश्यक आहे. एखाद्यला अडकवून ठेवण्याजोगं तंत्र असायलाच हवं. नाहीतर त्या कामाचा उपयोग काय ?

याचा अर्थ असा होतो की मला समाजातील प्रत्येक व्यक्तीबरोबर संवाद साधता यायला हवा. त्यासाठी आपल्याकडे विनम्रता, भाषेतील गोडवा हा असायलाच हवा. कारण आपल्या समोर विकायला येणारे प्रॉडक्ट व सव्‍‌र्हिस ही कधी एखाद्य गर्भश्रीमंत तरुण मुलासाठी असेल तर कधी एखाद्य गावात आपल्या शेतात राबणारम्य़ा मध्यमवयीन शेतकरी असेल. मग ते आपल्याला त्याला पटवून देता यायलाचं हवं.

आणि हीच तर ह्य क्षेत्रातली गंमत आहे . तसेच भरपूर वाचन. देशभरच्या, जगभरच्या माणसांच्या गोष्टी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कान आणि डोळे उघडे ठेवून समाजात वावरायला हवं.  आपणच आपली जाहिरात करू शकलो तर नक्कीच आपण कशाच्याही जाहिरात करू शकतो. अनुभव बरे वाईट येत असतातच पण आपण आपलं कां परमानिक पाने करत राहायचं. कारण आपल्याला भेटलेली प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला काहीनाकाही तरी सांगून वा शिकवून गेलेली असते.

अनघा निगवेकर, वरिष्ठ क्रिएटिव्ह डायरेक्टर, जे वॉल्टर थॉम्पसन

 

निष्ठा ठेवल्यास निश्चितच देशसेवा

मी वकिली पेशा स्वीकारायचं असं ठरवलं आणि त्या दिशेने पावलं उचलली. आणि या क्षेत्रात आल्यावर समजले की लोक म्हणतात तितकी काही वकिली सोपी नाही यामध्ये अभ्यासाचा आणि ज्ञानाचा आवाका पुरता मोठा आहे. कायद्यातील कलमांचा खूपच बारकाईने अभ्यास करावा लागतो. महाविद्यालयात शिकत असताना शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळे हा अभ्यासक्रम अधिकच सोपा होतो. आवड असेल तर नक्कीच या क्षेत्रात यायला काही हरकत नाही. शेवटी स्वत:मधले गुणच तुम्हाला पुढे घेऊन जात असतात. वकिली म्हणजे जे चित्रपटांमधून पाहतो त्या पलीकडे बरेच काही आहे. या क्षेत्रात यायचं असेल तर याविषयी थोडी माहिती असणे आवश्यक आहे. कारण समाजभान, नेतृत्व, ठामपणा, मुद्देसूद मांडणी आणि न्यायालयाप्रति निष्ठा ठेवून या क्षेत्रात काम करावे लागते. देशाला आज अशा कायदेपंडितांची गरज आहे. तरुण व नव्या दमाच्या विद्यार्थ्यांनी हे क्षेत्र आवडीने निवडायला हवं, कारण प्रामाणिकपणे काम केल्यास ही निश्चितच एक देशसेवा ठरेल.

सागर गाडेकर, डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालय

 

सारासार विचार,nकलात्मक मांडणी

आतापासूनच शहरातील इमारती, गावातली घरे, निसर्गातल्या विविध बाबींचं निरीक्षण करायला हवं. याच गोष्टी जेव्हा क्रमिक पुस्तकात समोर येतील, तेव्हा त्या समजण्यास सोप्या जातील. निदान वास्तू वा चित्रकलेसारख्या विषयांमध्ये तरी हे तंत्र उपयोगाचे ठरते. एक विशिष्ट वस्तू पानावर आणणं तसं फार काही अवघड नसतं; पण अभ्यासाच्या दृष्टीने त्याविषयीची थोडी माहिती आधीपासूनच असली तर ते काम सोपं होऊन जातं; पण या क्षेत्रात संयम हवाच आणि हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं.

सारासार विचार आणि त्याची कलात्मक मांडणी ही फार गरजेची असते. अशा कामांमध्ये शिक्षक मदत करतातच; पण एक कौशल्य अवगत असणे गरजेचे आहे. वास्तुविशारदाला सक्रिय आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच नेहमी वावरावं लागतं. नेमकी मांडणी आणि प्रात्यक्षिकांवर भर असणे आवश्यक आहे. दृष्टी ही कलात्मक असली पाहिजे.

तेजस्विनी शिंदे, वास्तुशात्र विद्यार्थी, रचना संसद.

 

मेहनतीची तयारी हवी!

संगणकाची पूर्ण माहिती व चित्रकलेची आवड असेल तर अनिमेशन हे एक वेगळी आणि कलात्मक शाखा निवडायला काहीच हरकत नाही. अनिमेशन कडे आपल्याला करिअर म्हणून बघता येईल .या मध्ये सुद्धा पदवी आणि डिप्लोमा असे दोन प्रकार असतात त्या मध्ये पदवी  हि तीन वर्षांंची असते व डिप्लोमा हा साधारणता सहा महिन्याचा असतो हा कोर्स तुम्ही तुमचा महाविद्य्लाय सांभाळून सुद्धा करू शकता रोज चे तीन तास या कोर्से साठी दिले तरी तुम्ही बरच काही शिकू शकता.

या मध्ये vfx ,garfic design या सारख्या गोष्टीचा समावेश आहे जे आज काल च्या चित्रपट, कार्टुन, मध्ये  तुम्हला बघायला मिळतात त्यामुळे या क्षेत्रामध्ये करण्यासारखं आणि पुरेसं अर्थार्जन होण्यासारखं बरचं काही आहे. यामध्ये कल्पनाविस्तार हा प्रमुख घटक आहे. आपल्याला एखाद्य गोष्टीची उत्तम कलात्मक मांडणी आणि त्यामागची काल्पनिक घटना रचता यायला हवी. या क्षेत्राला आज अंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थान प्राप्त झाले आहे. मेहनतीची तयारी  आणि यासाठी लागणारे तंत्र आपल्या हाती असेल तर या क्षेत्रात या आपण केलेल्या कामचा आनंद मिळेल हे मी निष्टिद्धr(१५५)तपणे सांगू शकते.

तन्मयी सवदी, अ‍ॅनिमेशन शाखेची विद्यार्थिनी

First Published on June 3, 2017 1:24 am

Web Title: maharashtra hsc result 2017 result issue student