News Flash

अनुसूचित जाती- नवबौद्ध विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाजकल्याण आयुक्तालय, पुणे द्वारा राज्यातील अनुसूचित जाती/ नवबौद्ध विद्यार्थी-विद्यार्थिनींना २०१३-२०१४ या शैक्षणिक वर्षांत परदेशातील शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या

| July 8, 2013 08:00 am

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाजकल्याण आयुक्तालय, पुणे द्वारा राज्यातील अनुसूचित जाती/ नवबौद्ध विद्यार्थी-विद्यार्थिनींना २०१३-२०१४ या शैक्षणिक वर्षांत परदेशातील शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या व देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या खालीलप्रमाणे आहे –
० पदव्युत्तर पदवी : व्यवस्थापन – ८, अभियांत्रिकी – १०, वैद्यकीय – ८.      एकूण शिष्यवृत्त्या – २६.
० डॉक्टरेट-पीएच.डी. : कला – १०, वाणिज्य – ४, विज्ञान – ६,
अभियांत्रिकी – ४. एकूण शिष्यवृत्त्या – २४.
आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी पात्रतेचे खालील निकष पूर्ण केलेले असावेत-
० विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
०  विद्यार्थी अनुसूचित जाती/ नवबौद्ध असावेत.
० अर्जदार विद्यार्थ्यांचे वय ३५ वर्षांहून अधिक नसावे.
० अर्जदार विद्यार्थ्यांचे पालक आणि कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
० संबंधित विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमांसाठी विदेशी विद्यापीठ वा संबंधित संशोधन संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.
० अर्जदार विद्यार्थ्यांच्या पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी कमीत कमी ५० टक्के असायला हवी.
शिष्यवृत्तीचे स्वरूप व तपशील : निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी विमान भाडे, इंग्लंडमधील शैक्षणिक संस्थांसाठी वार्षिक नऊ हजार पौंड तर अमेरिका व इतर देशांमधील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी वार्षिक १४ हजार यू. एस. डॉलर्स शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येतील.
याशिवाय त्यांना आकस्मिक खर्च, पुस्तके, अभ्यास दौरा, कार्यशाळेतील सहभाग, टायपिंग-बाइंडिंग इ.साठी वार्षिक अनुक्रमे एक हजार पौंड व १,३७५ यू. एस. डॉलर्स देण्यात येतील.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा विभागाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्ह्य़ाचे साहाय्यक आयुक्त- समाज कल्याण, संबंधित विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अथवा आयुक्त व समाज कल्याण विभागाच्या शिक्षण शाखेतही उपलब्ध होऊ शकतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व अंतिम तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, ३, चर्च रोड, पुणे ४११ ००१ या पत्त्यावर १७ जुलै २०१३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना विदेशी विद्यापीठ वा संशोधन संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी व संशोधनपर पीएच.डी. शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 8:00 am

Web Title: abroad education scholarships for sc navabauddha students
टॅग : Scholarships
Next Stories
1 रॉबर्ट हूक : शापित यक्ष!
2 संगीतातील उच्च शिक्षणविषयक अभ्यासक्रम
3 महाविद्यालयांची निवड करताना जरा जपून!
Just Now!
X