केंद्र सरकारतर्फे राज्यातील मुसलमान, ख्रिस्ती, शीख, बौद्ध व पारसी या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेनंतरच्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तींसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत नव्याने उपलब्ध होणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या ४५,१८९ असून त्याशिवाय याआधी दिल्या गेलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्तींचे नूतनीकरण करण्याची पण योजना आहे.
उपलब्ध अभ्यासक्रम : या शिष्यवृत्ती योजनेत उपलब्ध अभ्यासक्रमांमध्ये बारावीच्या परीक्षेपासून पीएचडी व त्याशिवाय डीएड, बीएड, एमएड, विविध पदविका अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अभ्यासक्रम यासारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
आवश्यक पात्रता : अर्जदार राज्याचे कायम रहिवासी व वरील नमूद केलेल्या अल्पसंख्याक समुदायातील असावेत व त्यांच्या पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी कमीतकमी ५० टक्के असायला हवी. अर्जदारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांहून अधिक नसावे. अर्जदार विद्यार्थ्यांनी इतर कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेचा फायदा घेतलेला नसावा.
निवड प्रक्रिया : अर्जदारांचे अर्ज त्यांच्या संबंधित शिक्षण संस्था प्रमुखाद्वारे मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, अमरावती, नागपूर, पनवेल, सोलापूर येथील संयुक्त संचालक- तंत्रज्ञान व उच्च-शिक्षण संचालनालय यांच्या कार्यालयामार्फत पाठवणे आवश्यक आहे.
वर नमूद केल्याप्रमाणे प्राप्त झालेल्या अर्जापैकी पात्रताधारक अर्जामधून विद्यार्थ्यांची या योजनेअंतर्गत निवड करण्यात येऊन त्यांना संबंधित अभ्यासक्रमाच्या २०१३-१४ या शैक्षणिक सत्रासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील : शिष्यवृत्तीच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी राज्य सरकारच्या उच्च शिक्षण व तंत्रज्ञान संचालनालयाच्या दूरध्वनी क्र. ०२०-२६१२६९३९ या दूरध्वनी क्र. ०२०-२६१२६९३९ वर संपर्क साधावा अथवा संचालनालयाच्या http://www.momascholarship.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : वर नमूद केल्याप्रमाणे संबंधित संयुक्त संचालक यांच्या कार्यालयात जमा करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१३.
राज्यातील वरील अल्पसंख्याक समुदायाच्या पात्रताधारक विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना लाभदायक ठरू शकते.