कृषीउद्योगाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलत असून या क्षेत्राला कुशल, नवीन संकल्पना राबविणाऱ्या, नवनवीन सुधारणा स्वीकारणाऱ्या आणि उत्पादनासाठी नवे मार्ग शोधणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींची निकड आहे. हे मनुष्यबळ युवावर्गाच्या रूपात उपलब्ध होणे ही काळाजी गरज आहे. त्याविषयी-

रोजगार संधींच्या दृष्टीतून कृषीक्षेत्राकडे पाहण्याचा युवापिढीचा रोख गेल्या काही वर्षांपर्यंत नकारात्मक आहे असे जाणवायचे. त्यामागे अनेक कारणे होती. यातील प्रमुख  म्हणजे कृषी क्षेत्रातील रोजगार संधींबद्दलची अनभिज्ञता आणि शेतीतील कामाला समाजात प्रतिष्ठा मिळणार नाही, तसेच या कामांतील आमदनी तुलनेने कमी आणि बेभरवशाची, असे गरसमज. मात्र, आज कृषिउद्योगात अशा अनेक नोकरीच्या संधी शक्य आहेत, ज्या योगे उत्तम मिळकत तर होईलच, शिवाय तुमच्या कामाला समाजमान्यताही मिळेल. या सर्व गोष्टींची माहिती युवापिढीपर्यंत पोहोचवता आली आणि यात सरकारी यंत्रणांचा पाठिंबा मिळाला, तर कृषी शिक्षण आणि कृषी उद्योगातील संधींकडे युवावर्गाचा ओघ वाढेल.
शेतकी क्षेत्रात तरुणांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो कारण-
कृषीक्षेत्र आता पूर्वीइतके मेहनतीचे काम राहिले नसून अनेक तांत्रिक सुधारणा व उपकरणांचा अंतर्भाव झाल्याने, टेक्नोसॅव्ही तरुण या क्षेत्राकडे वळून योग्य माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वत:ची प्रगती करू शकतात, आणि स्वत:ला आणि शेती कामाला प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतात. तसेच देशातील वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी जास्तीत तरुण होतकरू पिढी या शेत्रात उतरून शेतीचे उत्पादन वाढवण्याची आता आवश्यकता आहे.
सध्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिढीची जागा जर तरुण शेतकऱ्यांनी घेतली नाही, तर त्याच जुन्या पद्धतीने केलेल्या शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या अन्नधान्य निर्मितीचा मेळ वाढत्या अन्नधान्याच्या गरजेशी लागणे कठीण आहे.
देशातील शेती व्यवसायाकडे नवीन पिढीचे असेच दुर्लक्ष होत राहिले तर नजीकच्या भविष्यात शेती उत्पादने आयात करावी लागतील.  
समाजमनातील शेतकऱ्याची असलेली गरीब, खेडवळ ही प्रतिमा बदलण्याची गरज आहे. नित्यनवीन तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पना लीलया ग्रहण करणारी तरुण पिढी हा बदल सहज घडवून आणू शकेल.
तरुण पिढीची ऊर्जा आणि काम करण्याची धडाडी पाहता शेती उद्योगाच्या उत्पादन क्षमतेत भरपूर वाढ होऊ शकेल.
तरुण वर्गाला शेतीव्यवसायातील प्रगतीच्या संधींकडे आकर्षति करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. शाळांमधून वेळोवेळी मुला-मुलींना या व्यवसायाबद्दल सकारात्मक माहिती देण्याची गरज आहे. नोकरी शोधणाऱ्या युवावर्गाला शेती व्यवसायाकडे आकृष्ट करणे महत्त्वाचे ठरते.  
सध्याच्या शिक्षण पद्धतीत ‘शेती’ हा विषय अभ्यासक्रमांतून वगळण्यात आलेला दिसतो. आताचे शिक्षण फक्त भविष्यातील पांढरपेशा, कॉर्पोरेट कर्मचारी तयार करीत आहे. मात्र, ज्या अन्नावर आपण आपला देह पोसतो, ते पिकवणाऱ्या कृषी क्षेत्राबद्दलही विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, आवड निर्माण होणे गरजेचे ठरते.
शैक्षणिक अभ्यासक्रमांतून शेती शिक्षण योग्य प्रकारे युवापिढीसमोर सादर करायला हवा.
सध्या शेती उद्योगात टिकून असलेल्या तरुणांची यशोगाथा उर्वरित तरुण पिढीसमोर आणायला हवी, जेणे करून कृषी क्षेत्राबद्दल त्यांना आकर्षण निर्माण होईल. याकामी मोबाइल फोन, संगणक, इंटरनेट यांचा प्रभावी उपयोग होईल.
जगभरातील १५ वष्रे ते २४ वष्रे वयोगटातील एक अब्ज लोकसंख्येपकी खूप मोठय़ा प्रमाणावर युवावर्ग अशिक्षित, कुपोषित, उपाशी आणि गरिबीने गांजलेला आहे, त्यांच्याकडे नोकरी मिळवण्यायोग्य कौशल्य नसल्याने, यातील ग्रामीण युवावर्ग अर्थार्जनाच्या संधींसाठी स्थलांतर करतो. जर तरुणांना योग्य पाठिंबा आणि संधी दिली तर त्यांच्यातील अतुल्य क्षमता, ग्रामीण सुधारणांच्या कामात भरीव कार्य करू शकेल. यामुळे त्यांची प्रगती होईलच त्याचबरोबर देशाचीही आíथक प्रगती शक्य होईल. आव्हानात्मक नोकरीच्या संधींसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेली शेती हा एक मार्ग आहे.
कृषीउद्योगाचा चेहरा आता पूर्ण बदलला आहे. या क्षेत्राला कुशल, नवीन संकल्पना राबविणाऱ्या, नवनवीन सुधारणा स्वीकारणाऱ्या आणि उत्पादनासाठी नवे मार्ग शोधणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींची गरज आहे. हे तरुण पदवीधर कुशल, माहितीतज्ज्ञ, बदलत्या काळानुसार विचार करणारे, स्वत:बद्दल आत्मविश्वास असणारे असायला हवेत.
कृषी महाविद्यालयांनी या क्षेत्रासमोर असलेली आव्हाने पेलण्यायोग्य सक्षम आणि जगाची अन्नधान्याची गरज भागवू शकतील असे पदवीधर घडवणे हे स्वत:चे ध्येय मानायला हवे.
कृषीक्षेत्रात अनेक प्रकारच्या कुशल व्यावसायिकांची चणचण भासत आहे. उदा. अ‍ॅग्रोनॉमिस्ट, लाइव्ह स्टॉक प्रोडक्शन स्पेशालिस्ट, फार्म मॅनेजर, अ‍ॅग्रीकल्चरल र्मकडाइज रीप्रेझेन्टेटिव्हज, संशोधक, पत्रकार, विपणन व्यावसायिक, ग्रामीण वित्त पुरवठा अधिकारी, पार्क्‍स रिक्रिएशन ऑफिसर.
शेती क्षेत्रातील पदवीच्या बळावर विद्यार्थी अन्य क्षेत्रातही नोकरी मिळवू शकतात.
भारतातील अनेक कृषी महाविद्यालयांपकी बारामतीचे द कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर हे महात्मा फुले विद्यापीठाशी जोडलेले आहे. आज देशातील हे एकमेव विद्यालय आहे, जे डच युनिव्हर्सटिी ऑफ व्हीएचएल, नेदरलँडशी जोडलेले आहे. अभ्यासक्रमाची पहिली दोन वष्रे बारामतीत शिक्षण घेतल्यानंतर उर्वरित दोन वष्रे विद्यार्थी नेदरलंडला शिक्षण घेऊ शकतात किंवा बारामती विद्यालयात तीन वर्षांचा शिक्षणक्रम पूर्ण करून एक वर्षांसाठी कोणताही अन्य शिक्षणक्रम विद्यार्थी नेदरलंडमध्ये पूर्ण करू शकतात. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षकांकडून, तसेच भारतातील उच्चशिक्षित शिक्षकांकडून ज्ञान मिळते. कृषीक्षेत्राला उत्तम दर्जाचे मनुष्यबळ मिळावे यासाठी अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्याकडून हा उपक्रम राबविला जातो.
तेव्हा मित्र-मत्रिणींनो, आपल्या जगण्याचा मूलाधार असलेल्या शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास, आपल्याला प्रगतीच्या अनेक वाटा सापडतील, तेव्हा करिअरचे क्षेत्र निवडताना कृषी क्षेत्राचा प्राधान्याने विचार व्हायला हवा.               

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान
10 most-in demand jobs roles of 2024
कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित २०२४ मधील मागणी असणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या…