हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अॅग्रिकल्चरल एक्स्टेन्शन मॅनेजमेंट येथे दोन वर्षे कालावधीचा कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्याकरता पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश-अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी कृषी-विज्ञान वा संबंधित विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी ५० टक्के गुणांसह (अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्क्य़ांपर्यंत शिथिलक्षम) उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय त्यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे घेण्यात येणारी कॉमन अॅडमिशन टेस्ट, ‘कॅट’ २०१४ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
निवड पद्धती –अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांच्या पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व ‘कॅट’मधील गुणांकाच्या आधारे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
अधिक माहिती – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अॅग्रिकल्चरल एक्स्टेन्शन मॅनेजमेंट, हैदराबादच्या http://www.manage.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज भरण्याची मुदत – संपूर्णपणे भरलेले प्रवेश-अर्ज नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अॅग्रिकल्चरल एक्स्टेन्शन मॅनेजमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद- ५०० ०३० या पत्त्यावर ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

Central Institute of Fisheries Education Mumbai recruitment 2024
CIFE Mumbai recruitment 2024 : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! पाहा अधिक माहिती
master of human capital management and employee relations affiliated to mumbai and nagpur university
शिक्षणाची संधी : एचआर’मधील संधी
Organizing an international conference on Dr Babasaheb Ambedkar in london
लंडनमध्ये आज आंतरराष्ट्रीय परिषद; शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. आंबेडकर
Central Board of Secondary Education
नोकरीची संधी: ‘सीबीएसई’मधील संधी

केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयांतर्गत असणाऱ्या जयपूर येथील चौधरी चरणसिंह नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अॅग्रिकल्चरल मार्केटिंग येथे कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार विद्यार्थ्यांनी कृषी वा संबंधित शाखेतील पशुविज्ञान, दुग्धव्यवसाय, खाद्य तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी यांसारख्या विषयातील पदवी कमीत कमी ६० टक्के गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी ४५ टक्के) उत्तीर्ण केलेली असावी.जे विद्यार्थी यंदा वर नमूद केलेल्या पात्रता परीक्षेला बसणार असतील त्यांनाही या अभ्यासक्रमाला अर्ज करता येईल.
वरील शैक्षणिक पात्रतेशिवाय अर्जदार विद्यार्थ्यांनी सीएटी-२०१४ अथवा सीएमएटी-२०१४-१५ यांसारखी प्रवेश पात्रता परीक्षा देणे आवश्यक आहे.
निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व सीएटी-सीएमएटी यांसारख्या प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. त्याआधारे त्यांनी कृषी-व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या २०१५-२०१७ या शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक – अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास १०० रु. चा ‘डायरेक्टर जनरल, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अॅग्रिकल्चर मार्केटिंग’च्या नावे असणारा व जयपूर येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती-अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अॅग्रिकल्चरल मार्केटिंग, जयपूरच्या http://www.aicte.cmat.in किंवा http://www.ecsniam.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि शेवटची तारीख – विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश-अर्ज डायरेक्टर जनरल, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अॅग्रिकल्चरल मार्केटिंग, कोटा रोड, बांबाला, संगनेरजवळ, जयपूर- ३०२०३३ या पत्त्यावर ३१ जानेवारी २०१४ पर्यंत पाठवावा.