नॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट, हैदराबाद येथे उपलब्ध असणाऱ्या कृषी व्यवस्थापन विषयातील दोन वर्षीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी कृषी, कृषी विज्ञान वा संबंधित विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत. याशिवाय अर्जदार विद्यार्थ्यांनी सीएटी-२०१३ अथवा सीएमएटी २०१३ यांसारखी व्यवस्थापन अभ्यासक्रमविषयक प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
प्रवेश पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना त्यांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारीव व्यवस्थापन पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्या आधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट- हैदराबादच्या कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या २०१४-२०१६ या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश देण्यात येईल. प्रवेश प्रक्रिया साधारणपणे मे-जून २०१४ मध्ये पूर्ण करण्यात येईल.
अधिक माहिती : अभ्यासक्रमासंबंधी अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट अकादमीच्या http://www.naarm.ernet.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
प्रवेश अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज जॉइंट डायरेक्टर (अ‍ॅडमिन) अ‍ॅण्ड रजिस्ट्रार, नॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद ५०००३०
(आंध्र प्रदेश) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०१४.