केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेच्या बदललेल्या संरचनेनुसार आयोजित केलेल्या २०१३ डिसें. परीक्षेमध्ये प्रथमच ‘एथिक्स अँड इंटिग्रिटी’ या पेपरचा समावेश करण्यात आला. २५० गुणांसाठी घेण्यात आलेल्या या पेपरमध्ये आयोगाला उमेदवाराकडून कोणत्या अपेक्षा आहेत, हे बऱ्याच प्रमाणात स्पष्ट झाले आहे. आजच्या लेखात आपण मागील आठवडय़ात झालेल्या या पेपरचे संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत.
सर्वप्रथम लक्षात येणारी बाब म्हणजे इतर सामान्य अध्ययनाच्या पेपरपेक्षा वेगळी असणारी या पेपरची धाटणी. केवळ पुस्तकी ज्ञानामधून उत्तरे लिहिणे या घटकासाठी अपेक्षित नाही. किंबहुना अनेक प्रश्न उमेदवाराला तिच्या/त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग उदाहरणे मांडण्यास प्रवृत्त करतात. तसेच या विषयाकरिता जाहीर केलेल्या अभ्यासक्रमावरून असे लक्षात येते की, या पेपरसाठीचे विषयज्ञान (Subject Knowledge) हे एका विद्याशाखेवर अवलंबून नसून आंतरविद्याशाखीय आहे. नीतीविषयक वा नतिकतेबाबतचे अनेक प्रश्न हे एकापेक्षा अधिक विचारक्षेत्रात (Domain)  मधील आहेत. नतिक तत्त्वज्ञान (Moral philosophy) व लोकप्रशासन (Public administration) यावर आधारित नीतीनियमविषयक (ethical) प्रश्न हा पेपरचा प्रमुख गाभा आहे.
विभाग अ व विभाग ब अशा दोन विभागांमध्ये सादर केलेल्या पेपरमधील सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. विभाग अ मध्ये एकूण ८ प्रश्न आहेत. हे ८ प्रश्न एकूण १२५ गुणांकरिता आहेत. मात्र प्रत्येक प्रश्नाला समान गुण नाहीत. पहिले तीन प्रश्न नतिक तत्त्वज्ञानासंबंधातील साधारण संकल्पना स्पष्ट आहेत किंवा नाही हे पाहणारे आहेत. दिलेल्या संज्ञांचा अर्थ, व्याख्या स्पष्ट करणे असे या प्रश्नांचे स्वरूप आहे. एक विशेष अधोरेखित करावयाची बाब म्हणजे गुण व त्यासाठी आवश्यक शब्दसंख्या हे प्रमाण प्रत्येक प्रश्नासाठी वेगळे आहे. उदा. सर्वात पहिल्या प्रश्नात १० गुणांकरिता १५० शब्द लिहिणे अपेक्षित आहे तर दुसऱ्याच प्रश्नात १५ गुणांकरिता २५० शब्द लिहिणे अपेक्षित आहे. मूल्य व नतिकता म्हणजे काय? सेवाभाव, सत्यनिष्ठा, बांधीलकी यावरील टिपा, प्रशासकीय सेवांसाठी आवश्यक इतर गुण अशा विषयांवर आधारित पहिले दोन प्रश्न आहेत. एकूण चार प्रश्नांमध्ये उमेदवाराचे वैयक्तिक मत विचारले आहे. यामध्ये विवेक, अंत:करणाचा आवाज यांसारख्या तत्त्वमीमांसेवर आधारित विषयांचा समावेश आहे. अधिभौतिकी (टी३ंस्र्ँ८२्रू२) च्या कडेने जाणारे हे विषय आहेत. अर्थातच याकरिता फार खोलवर जाऊन तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे अपेक्षित नाही. मात्र संज्ञांचे आकलन होण्याइतकी ओळख अपेक्षित आहे. तसेच या प्रश्नांमधून एकंदर पेपरची काठिण्य पातळी अधिक ठेवण्यात आयोगाने यश मिळवले आहे. स्पर्धा कायम राखणे व ती अटीतटीची ठेवणे यामधून साध्य झाले आहे. मात्र या प्रश्नांची संख्या मोजकीच आहे. इतर अनेक प्रश्न विषयाचे असलेले ज्ञान व ते आपल्या शब्दात मांडण्याची हातोटी यामधून उत्तमरीत्या हाताळले जाऊ शकतात. अशा प्रकारे संज्ञांचा अर्थ स्पष्ट करणे, वैयक्तिक अनुभवांची नतिक मांडणीशी सांगड घालणे यावर सुरुवातीच्या काही प्रश्नांमध्ये भर दिला गेला आहे. या पुढील प्रश्न प्रकार म्हणजे महान व प्रसिद्ध व्यक्तींच्या विचारांचा कल्पनाविस्तार करणे. प्रत्येकी १० गुणांना विचारले गेलेले तीन प्रश्न महात्मा गांधी, अब्राहम िलकन आणि अ‍ॅरिस्टॉटल यांच्या विचारांवर आधारित आहे. प्रत्येक प्रश्न १५० शब्दांमध्ये लिहिणे अपेक्षित आहे. या प्रश्नांकडे लघुनिबंधक अशा स्वरूपातदेखील बघता येईल. अर्थात कल्पनाविस्तार या निबंध प्रकाराची ओळख व सराव असल्यास कमी वेळात हे लिखाण अधिक परिणामकारक होऊ शकते.  या तीन सुविचारांमध्येदेखील विषयाचे वैविध्य आयोगाने कायम राखले आहे. या विचारांविषयी लिहीत असताना त्या व्यक्तीची एकंदरीत नतिक विचारप्रणाली माहीत असणे उपयुक्त ठरेल. तसेच या विचारांचा उत्तम प्रशासनाशी व त्यातील नीतीनियमविषयक बांधीलकीशी काय संबंध आहे, हे अधोरेखित करणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त एका प्रश्नामध्ये केवळ मानवतेच्या चांगुलपणाविषयीचे एक विधान देऊन त्याबद्दल उमेदवाराचे काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याचबरोबर राजकारणाचा नतिकतेशी असणारा संबंध व त्या विषयीचा उमेदवाराचा दृष्टिकोन यावर भर देत १० गुणांसाठी १५० शब्दांत प्रतिसाद अपेक्षित आहे. तसेच भावनिक बुद्धिमत्ता व त्याचा प्रशासनात शक्य असलेला वापर यावरदेखील एक प्रश्न विचारला गेला आहे. अशा प्रकारे विभाग अ मध्ये नतिक तत्त्वज्ञानातील विचार, संज्ञा त्याबद्दल उमेदवाराचा वैयक्तिक दृष्टिकोन आणि व्यापक नतिक विचारप्रणालींशी ओळख असे या घटकाचे स्वरूप आहे. विभाग अ मधील काही प्रश्न यूपीएससीने जाहीर केलेल्या नमुना प्रश्नातून जवळजवळ तसेच्या तसे विचारले गेले होते जसे की, कामाबद्दलची निष्ठा, बांधीलकी, पाठपुरावा करण्याचे फायदे या संकल्पनांचे स्पष्टीकरण. नमुना प्रश्नपत्रिकेत प्रशासकीय अधिकारी व नतिकता यावर आधारित प्रश्न दिला होता. या परीक्षेमध्ये प्रशासकीय सेवा व नतिकता यावर आधारित प्रश्न विचारला गेला आहे.
विभाग ब हा पूर्णत: केस स्टडीजना वाहिलेला विभाग आहे. एकूण ६ प्रकरणे १२५ गुणांकरिता विचारली गेली आहेत. या विभागातदेखील प्रत्येक प्रश्नासाठीचे निर्धारित गुण व त्याकरिता नियोजित शब्दसंख्या यांचे प्रमाण वेगवेगळे आहे. पूर्वपरीक्षेमधील निर्णयक्षमता चाचणी व समस्या सोडवणूक याच घटकाचे एक विस्तारित व अधिक बारकाव्यांची नोंद घेणारे रूप असे या घटकाचे वर्णन करता येईल. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे विभाग ब मध्येदेखील यूपीएससीने पुरविलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेमधील काही प्रश्न जवळजवळ तसेच्या तसे विचारले गेले आहेत. तसेच २०११, २०१२ व २०१३ या वर्षी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेतील निर्णयक्षमता चाचणी या घटकातील प्रश्नांवर आधारित विषय पुन्हा हाताळले गेले आहेत. अर्थात अतिशय किरकोळ बदल वगळता प्रश्नामधून विचारली जाणारी नतिक संकल्पना सारखीच आहे. उदाहरणार्थ, याच वर्षीच्या म्हणजे २०१३ च्या पूर्वपरीक्षेमध्ये विद्यापीठ पातळीवरील पेपर अनधिकृतरीत्या उघड करण्याकरिता आलेल्या दबावाबद्दल प्रश्न विचारला गेला होता. याच प्रश्नासारखा, ज्यामध्ये विद्यापीठ, पेपर याऐवजी तुम्ही वित्त मंत्रालयातील अधिकारी आहात व काही माहिती अनधिकृतरीत्या उघड करण्याकरिता तुमच्यावर दबाव टाकला जात आहे अशा प्रकारची केस (ूं२ी) देण्यात आली आहे. केस स्टडीज खालील विषयांवर आधारित आहेत. माहितीचा अधिकार (माहिती उघड करण्याबाबतची नतिकता), कमी गुणवत्तेचे काम अथवा निर्धारित वेळेत पूर्ण करावयाचे काम यातील नतिक द्विधा, शिवकाशीतील बालकामगारांचा प्रश्न, नोकरभरतीतील नातेवाइकांना / जवळच्या व्यक्तींना दिले जाणारे प्राधान्य  व त्याच्याशी निगडित नतिक प्रश्न, अनधिकृतरीत्या माहिती देण्यातील नीतीनियमविषयक कंगोरे, कामाच्या ठिकाणी अनुभवास येणारे लैंगिक शोषण व त्यासंबंधीचे नतिक प्रश्न हे साधारण केस स्टडीचे विषय आहेत. या सर्वामधून आपणास असे लक्षात येते की, नीतिमत्तापूर्ण प्रशासन राबविण्यातील प्रत्यक्ष अडचणी व त्यांचा सामना करण्याचे विविध मार्ग यावर या प्रश्नांचा भर आहे. तसेच प्रत्येक केसबरोबरच २ अथवा ३ मार्गदर्शक प्रश्न उपलब्ध करून दिले आहेत. जेणेकरून २५० शब्दांमधील प्रतिसाद कोणत्या मुद्दय़ांवर ठळक भर देणारा असावा यासाठीची दिशा निश्चित केली आहे.
एकूण प्रश्नपत्रिकेचा विचार केल्यास प्रमुख सकारात्मक बाब म्हणजे प्लेटो, सॉक्रेटिस, अ‍ॅरिस्टॉटल यांसारख्या तत्त्वज्ञांच्या अभिजात विचारसरणींवर अनावश्यक भर न देता भारतीय सामाजिक व नतिक प्रश्नांची नाळ जोडणारे हे प्रश्न आहेत. या वर्षीच्या इतर सर्व सामान्य अध्ययनाच्या पेपरच्या संरचनेशी मिळतीजुळती अशी या पेपरचीदेखील रचना आहे. स्वत:चे विचार शब्दात मांडत असताना वेळेचे भान ठेवत वैचारिक मांडणी व तिचा प्रत्यक्ष परिस्थितीशी असलेला संबंध यातील दुवा सांधणे हे या पेपरने समोर ठेवलेले सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र लिखाणाचा पुरेसा सराव, महत्त्वाच्या विचारवंतांची व त्यांच्या नतिक वैचारिक मांडणीचा सखोल अभ्यास अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिकेची दखल घेण्यास आवश्यक बाबी आहेत. पुन्हा एकदा यूपीएससीच्या तयारीमधील लिखाणाच्या सातत्याचे महत्त्व या पेपरमधून अधोरेखित झाले आहे. एकंदर संरचनेत प्रमुख बदल स्वीकारत असताना उमेदवाराच्या नतिक विचारांचा कल तपासून पाहणारा व नीतिनियमविषयक चौकटींच्या ज्ञानाचा कस लावणारा हा घटक निश्चितच सकारात्मक बदल आहे व हा बदल योग्य मनोभूमिकेतून स्वीकारणे व सखोल अभ्यास करणे उचित ठरेल.    
 admin@theuniqueacademy.com

Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
ntpc and shipping corporation disinvestment
एनटीपीसी, शिपिंग कॉर्पोरेशनच्या निर्गुंतवणुकीला सर्वोच्च प्राधान्य, निवडणुकीनंतर १०० दिवसांच्या कालावधीत भागविक्री शक्य
Farmers in Navi Mumbai Airport Notified Impact Area oppose amended DCPR
नैनातील शेतकऱ्यांचा सूधारित युडीसीपीआरला विरोध
drug-resistant tuberculosis
औषध प्रतिरोध क्षयरोग नियंत्रणात, क्षय बरा होण्याचा दर २०२३ मध्ये ८२ टक्के