|| श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृती यांमधील भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला या घटकाविषयी आढावा घेणार आहोत.

Shani Vakri 2024
३६५ दिवस ‘या’ ४ राशींना शनिदेव करणार मालामाल? शनि जूनमध्ये वक्री अवस्थेत बलवान होताच होऊ शकतात लखपती
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
home remedies for burning throat
घसा सतत खवखवतोय? तर झटपट आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करुन पाहा
जागतिकीकरणाचा परिणाम

भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला – उदय आणि विकास

भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांच्या इतिहासाची सुरुवात प्रागतिहासिक कालखंडापासून सुरू होते, ज्यामुळे या कलांची सुरुवात नेमकी कशी व कोठून झालेली आहे याची माहिती आपणाला मिळते. पण या घटकावर साधारणत: सिंधू संस्कृतीपासून प्रश्न विचारले जातात त्यामुळे या विषयाची परीक्षाभिमुख तयारी करताना आपणाला सिंधू संस्कृतीपासून सुरुवात करावी लागते. तसेच सिंधू संस्कृतीनंतर भारतात वैदिक संस्कृती अस्तित्वात आलेली होती; पण या संकृतीमधील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांचे अवशेष प्राप्त झालेले नाहीत. इ. स. पूर्व ६व्या शतकापासून या कलांचा इतिहास अखंडितपणे पाहावयास मिळतो. याची माहिती आपणाला तत्कालीन अवशेष आणि साहित्याद्वारे प्राप्त होते. प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्यापासून या कलांमध्ये मोठय़ा प्रमाणात विकास व्हायला सुरुवात झालेली होती.

प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर धर्माचा खूप मोठा प्रभाव होता. प्राचीन भारतात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माच्या प्रभावातून स्थापत्यकला आणि शिल्पकला याची निर्मिती झालेली होती. प्राचीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर बौद्ध धर्माचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो. कारण मौर्य कालखंडापासून बौद्ध धर्माला राजाश्रय मिळालेला होता पण त्याचबरोबर जैन आणि हिंदू धर्माशी संबंधित स्थापत्यकला आणि शिल्पकला याचीही निर्मिती करण्यात आलेली होती. हिंदू धर्माशी संबंधित मंदिरशैलीचे नागर आणि द्राविड असे दोन प्रकार असून ते प्राचीन कालखंडापासून अस्तिवात आहेत. यातील नागर शैली ही प्रामुख्याने उत्तर भारतात आणि द्राविड शैली दक्षिण भारतात आढळते. या दोन शैलीमधील काही वैशिष्टय़े घेऊन वेसर शैली तयार झालेली आहे, जी प्रामुख्याने मध्य भारतात वापरली जाते.

साधारणत: गुप्त कालखंडापासून हिंदू धर्माशी संबंधित मंदिरशैलीच्या इतिहासाची सुरुवात झालेली दिसून येते आणि त्यापुढील काळामध्ये यात झालेला विकास याची आपणाला कालखंडनिहाय माहिती प्राप्त करावी लागते. उदा – गुप्त कालखंड, गुप्तोत्तर कालखंड, सुरुवातीचा मध्ययुगीन कालखंड. यामध्ये उत्तर आणि दक्षिण भारतातील राजकीय सत्तांच्या कालखंडातील विकास ज्यामध्ये प्रामुख्याने चालुक्य घराणे, चोल, राजपूत राज्ये इत्यादींच्या काळातील स्थापत्यकला आणि शिल्पकला तसेच यांची वैशिष्टय़े याचे तुलनात्मक पद्धतीने माहितीचे संकलन करणे महत्त्वाचे ठरते. याचबरोबर मध्ययुगीन कालखंडात भारतात इन्डो-इस्लामिक स्थापत्यकलेची सुरुवात झालेली होती. ती दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य या कालखंडात विकसित झाली. याचबरोबर विजयनगर साम्राज्य, तेराव्या आणि चौदाव्या शतकातील उत्तर भारतातील प्रादेशिक सत्ता, अठराव्या शतकातील प्रादेशिक सत्ता आणि वसाहतकालीन स्थापत्यकला व शिल्पकला याचीदेखील माहिती असणे गरजेचे आहे. थोडक्यात, या मुद्दय़ांची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करताना कालखंडनिहाय योगदान आणि यामध्ये घडून आलेला विकास आणि बदल व त्याची वैशिष्टय़े यांसारख्या बाबींचा एकत्रित विचार करावा लागणार आहे, याची जाणीव असणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी कमीत कमी एक तरी प्रश्न या घटकावर विचारला जातो.

२०१३ ते २०१७ दरम्यान या विषयावर विचारण्यात आलेले प्रश्न.

  • मंदिर स्थापत्यकलेमध्ये चोल स्थापत्यकला उच्च विकास दर्शविते, चर्चा करा.
  • सिंधू संस्कृतीमधील नगर नियोजन आणि संस्कृतीने वर्तमान स्थितीमधील नागरीकरणामध्ये किती योगदान (कल्लस्र्४३) दिलेले आहे, चर्चा करा.
  • गांधार शिल्पकला जशी ग्रीकांची ऋणी लागते तसेच रोमन यांचीही लागते, स्पष्ट करा.
  • सुरुवातीची बौद्ध स्तूपकला लोकांची तत्त्व आणि कथानकाबरोबरच बौद्ध आदर्शाची यशस्वीरीत्या व्याख्या करते. स्पष्टीकरण द्या.

उपरोक्त प्रश्नांची उकल करताना दोन महत्त्वपूर्ण पलूंचा विचार करणे गरजेचे आहे. यातील पहिला पलू हा भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांच्या इतिहासाची सुरुवात आणि दुसरा पलू म्हणजे प्राचीन व मध्ययुगीन कालखंडामध्ये या कलांच्या विकासामध्ये झालेली प्रगती; याबाबत व्यापक समज असणे गरजेचे आहे. उपरोक्त विचारण्यात आलेले प्रश्न हे विशिष्ट कालखंडातील कलांचा आधार घेऊन विचारण्यात आले आहेत. म्हणून कालखंडनिहाय या कलांचा विकास, वैशिष्टय़े याची माहिती असणे गरजेचे आहे. प्रश्न हे कधी कधी संपूर्ण कालखंड गृहीत धरून विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या घटकाची तयारी सर्वागीण आणि सखोल पद्धतीने करणे अपरिहार्य आहे. कधी कधी या मुद्दय़ांशी संबंधित प्रश्न सद्य:स्थिती लक्षात घेऊन विचारले जातात उदा. सरकारने स्थापत्यकला आणि शिल्पकला याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कार्यान्वित केलेल्या योजना, कायदे आणि यांची उपयुक्तता इत्यादी बाबींवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.

या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता अकरावीचे An Introduction to Indian Art Part – क हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. तसेच याच्या जोडीला बारावीचे Themes in Indian History part – I क  आणि II व जुन्या एनसीईआरटीचे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत या पुस्तकातील भारतीय वारसा आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा. त्याचबरोबर या विषयावर बाजारामध्ये अनेक गाइडस स्वरूपात लिहिलेली पुस्तके उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या मुद्दय़ाचा अधिक सखोल आणि सर्वागीण पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो.