|| निखिल पुरोहित

कला ही मुक्त, स्वच्छंदी आणि ललित असण्याचे आपण सगळे जाणतो. हे जरी वास्तव असलं तरी सांस्कृतिक व सामाजिक दृष्टीने कलात्मकता, सांस्कृतिक वारसा, रसिकता, मनोरंजन इ. आपल्याला समजेल अशा रीतीने पोहोचवण्यासाठी जी व्यवस्था कार्य करते त्याला आपण कलेचे व्यवस्थापन असे म्हणतो. या व्यवस्थापनेत सजग आणि संवेदनशीलरीत्या काम करणाऱ्या व्यक्तीला कला नियोजक किंवा कला व्यवस्थापक असे म्हणू शकतो. समकालीन आणि ऐतिहासिक वारसा, पुरातन वाङ्मय, शिल्प, चित्र, भित्ती चित्रे, स्थापत्य, काव्य, अनेक घराणे किंवा तांडा यांच्याकडे परंपरागत चालत आलेल्या चालीरीती, भौतिक जीवनाशी निगडित वस्तूंची परंपरा, धार्मिक किंवा शुभ प्रसंगी म्हटली जाणारी पदे, गीत, ओव्या, नाटय़ आणि नृत्य प्रयोग, वस्त्रालंकार, वेशभूषा, खाद्य पद्धती असे विविध विषय कला नियोजनाच्या कार्यात समाविष्ट होतात. कला नियोजकांचे प्रचलित रूप म्हणजे विविध समारंभांचा आयोजन कर्ता म्हणून, पण आज नियोजकांची जबाबदारी सांस्कृतिक घडामोडींना दिशा देण्याची आहे. सांस्कृतिक वारसांच्या संगोपनाला वठएरउड व वठ, रअअफउ अशा अनेक प्रमुख संस्थांकडून जागतिक पातळीवर प्राधान्य मिळत आहे. या लेखातून कला नियोजनाचे कार्य कशा पद्धतीने घडते, त्यातील सामाजिक, आíथक आणि वैयक्तिक प्रगती या व इतर अनेक मुद्दे समजून घेता येतील.

कला नियोजन ही संस्कृतीच्या प्रवाहात सातत्याने कळत नकळत प्रयोगात असलेली संकल्पना आहे. आपल्या सोसायटीत होणारे सांप्रदायिक कार्यक्रम हेसुद्धा काही अंशी कला नियोजनच. हे व्यासपीठ जिल्हा ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा उपलब्ध होतो तेव्हा त्या मागे विविध कार्यक्षमता, अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख, समाज व्यवस्थेचे भान, स्थानिक-जागतिक राजकीय स्थिती, सांस्कृतिक घडामोडींविषयी सजगता हे अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. औपचारिकरित्या कला नियोजकांचे कार्य आपल्याला वस्तू संग्रहालये, कला दालने, सांस्कृतिक संस्था, ग्रंथालये, संगीत, नाटक, सांस्कृतिक संमेलने, मोठय़ा कंपन्यांमध्ये असलेले सांस्कृतिक विभाग, लिलाव घर आणि डिजिटल मीडिया अशा विविध ठिकाणी आढळते. संग्रहालय, कला दालन अशा ठिकाणी त्यांना क्युरेटर, किपर, गॅलरी सहाय्यक, शिक्षण अधिकारी या पदांवर कार्य करताना आढळतात. संगीत, नाटक, सिने-कार्यक्रम, मुलाखत यांच्या प्रस्तुती मागे सर्व प्रकारच्या नियोजनाचा भार सांभाळणारे मॅनेजर्स, प्रोग्रॅम ऑफिसर (कार्याधिकारी) व त्यांच्या सोबत काम करणारे सहाय्यक हेसुद्धा कला नियोजकच होत. लिलावघरांमध्ये मोठय़ा प्रमाणात कला वस्तूंचे आíथक देवाणघेवाण होत असल्याने कलेचे जाणकार, अभ्यासक, अर्थशास्त्राचे ज्ञान असणाऱ्या व्यक्ती या ठिकाणी विविध पातळीवर कार्य करतात. मोठय़ा उद्योग समूहांमध्ये उरफ  अंतर्गत शिक्षण, सामाजिक विकास योजना राबविल्या जातात ज्यामध्ये कला ही शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्तींचे कार्य योजनेला योग्य आणि कलात्मकरीत्या राबवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. त्याशिवाय काही उद्योगसमूह कलासंग्रहदेखील करतात तर काही संदर्भात आंतरराष्ट्रीय वारसांच्या संगोपनासाठी आíथक आणि तांत्रिक साहाय्यदेखील करत असतात. अशा ठिकाणी नियोजकांची भूमिका महत्त्वाची ठरते. जे वेळच्या वेळी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांना आपल्या कलेविषयक माहिती आणि संबंधित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियमांच्या पालनासाठी आवश्यक उपाय देऊन काळजी घेतात. वठएरउड सारखी आंतरराष्ट्रीय संस्था सांस्कृतिक संयोजनाला, सर्वार्थाने समावेशक अशा कला शिक्षणाला प्राधान्य देत आहे. यामागील हेतू असा की, कलेच्या संवर्धनातून सृजन मूल्य आणि सांस्कृतिक वारसा यांच्यातील प्रवाही प्रक्रिया अबाधित ठेवणे.

कला संयोजकांचे कार्य उपरोक्त क्षेत्रांप्रमाणे भिन्न आणि विविधता पूर्ण असू शकेल. कलेचे संवर्धन या शब्दातच अनेक आणि विस्तीर्ण असे अर्थ गíभत आहेत. समोर असलेले कला प्रकार, कलाकार, त्यातील सौंदर्य आणि अर्थ-व्यापार, सौंदर्य मूल्य, त्याची व्यापकता, त्या कलाप्रकाराचे आणि स्थानिक जीवनाशी असलेले परस्पर संबंध, त्यात गुंतलेले व्यावहारिक आणि कायद्याची बाजू या सर्व गुणांचा विचार करणे, त्या विचारांना प्रत्यक्ष रूप देऊन सातत्याने आजच्या जीवनात त्याचे महत्त्व टिकवणे हा कला संयोजकांच्या कार्याचे प्रदीर्घ परीघ आहे. अर्थात हे सर्व कार्य वेगवेगळ्या पातळींवर, क्षमतेनुसार, इच्छा, रस, चिकाटी, उपलब्ध संसाधनांच्या आधारे सुरू राहणारी धडपडी क्रिया आहे. होतकरू आणि जिज्ञासूंना असे प्रश्न पडत असतील की, अशा परोपकारी कार्य करणाऱ्या लोकांचे घर कसे चालत असतील? त्यांना मिळणारा मोबदला सामान्य जीवन जगण्यास पूरक आहे का? त्यांचे कसे भागते?

लेखात वर सांगितलेल्या उपक्षेत्रांपैकी बहुतेक क्षेत्र ही संघटित आहेत, ज्या ठिकाणी कामाचे स्वरूप आणि व्याप्ती बव्हंशी ठरलेले असतात. बहुतेक ठिकाणी रोजगार कायदे लागू आहेत ज्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना इतर सहकाऱ्यांसारखेच नोकरीचे फायदे उपलब्ध आहेत. असे असतानाच कला क्षेत्रातील अधिकाधिक काम स्वरूपातून घडते. या क्षेत्राशी निगडित लोक मुळातच स्वच्छंदी, मुक्त विचारांचे आणि काही प्रमाणात विक्षिप्त स्वभावाचे असतात. अशा लोकांना नऊ ते पाच कार्यपद्धती आवडत नाही. बरेच वेळेला त्या त्या क्षेत्रांच्या कार्याच्या मागणीनुसार ठराविक वेळा वा मर्यादांचे पालनही शक्य होत नाही. याला आपण डायनॅमिक वर्क सिस्टिम म्हणू शकतो.

कला नियोजक जणू पडद्यामागचे कलाकार असतात. त्यांच्या कार्याची व्याप्ती आणि गुंता कार्यक्षेत्राप्रमाणे बदलणारी आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अभ्यासू वृत्ती हे सर्व भिन्न  असल्याचा अंदाज वाचकांना आलाच असेल. गेल्या काही दशकांमध्ये अशा प्रकारच्या संयोजनाला व कामाला वाव आणि गरज वाढली असून या कार्यासाठी आवश्यक गुणांविषयी जाणून घेऊया.

कलेविषयीची आस्था हे प्रमुख गुण जे कोणत्याही कला नियोजकामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. समाज आणि संस्कृतींचा पोत याची जाण हे दुसरे महत्त्वाचे घटक. निवडलेल्या कलेच्या निर्मितीचे प्रत्यक्ष अनुभव किंवा निरीक्षण, त्या कलेचा इतिहास आणि आजची वाटचाल, याबद्दल समज आवश्यक आहे. याबरोबरच त्या कलेतील व्यवहाराचे आणि आíथक व्यापाराचे अंदाज असणे अभिप्रेत आहे. संगणकीय ज्ञान, संभाषण कौशल्य, वेळेचे नियोजन, कार्यसिद्धीसाठी सहकाऱ्यांसोबत काम करण्याची तयारी, प्रवासाची आवड, आपले संपर्क वर्तुळ प्रबळ करणे आणि आपल्या वैयक्तिक क्षमता आणि मर्यादांची समज हे सर्व गुण कला नियोजनातही आवश्यक आहेत.

एकूण कला क्षेत्र ही आजवर अनियोजित पद्धतीने चालणारी यंत्रणा राहिली आहे. कलाकार, कला शिक्षण संस्था, कलेला पाठिंबा देणारे रसिक, कला दालने, सरकारी योजना या सर्वाचा ताळमेळ भारतात अजून हवा तेवढा बसलेला नाही. स्वातंत्र्योत्तर काळापासून आजवर हा समग्र कला उद्योग अजूनही संभ्रमात आहे. पण बदलत्या काळानुसार या क्षेत्रातही प्रगतीचे वारे फिरू लागले आहेत. अर्थात जेव्हा कलेला उद्योगाचे रूप दिले जाते तेव्हा कलात्मक स्वातंत्र्यावर मर्यादा आणि शक्यता दोन्ही वाढतात. कलेतून मनोरंजन, नीतिमूल्यांची जोपासना, समाज सुधारणा होणे अशा अनेक अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांचे ओझे कला आणि निगडित यंत्रणांवर टाकली जाते. योग्य आणि समावेशक अशा योजनेतून या अपेक्षा पूर्ण होण्यास दुजोरा मिळेल आणि सांस्कृतिक संवर्धनाचे कार्य पुढे जाऊ शकेल.

पुढील लेखात कला नियोजनाचा इतिहास, विविध संस्थांमधून दिले जाणारे औपचारिक प्रशिक्षण आणि पदवी, नमूद केलेल्या उपक्षेत्रांमधील कामाचे स्वरूप, संलग्न आíथक, राजकीय मुद्दे या सर्वाविषयी माहिती करून घेता येईल.

nikhiljp85@gmail.com