सुरेश वांदिले

बारावीनंतर विविध ज्ञानशाखेतील संबंधित शैक्षणिक वर्षांतील प्रवेश प्रक्रिया संपत नाही, तोच ऑक्टोबर महिन्यात आयआयटी मुंबईच्या अंतर्गत असलेल्या इंडस्ट्रियल डिझाइन सेंटरच्या, बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमाच्या पुढील वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेची घोषणा केली जाते. यंदासुद्धा ती करण्यात आली असून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची परीक्षा १९ जानेवारी २०१९ रोजी घेतली जाईल. ही परीक्षा अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रस एक्झामिनेशन फॉर डिझाइन म्हणजे यूसीड (UCEED) या नावानं ओळखली जाते. या परीक्षेच्या गुणांवर आधारित इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर, मुंबईसोबतच आयआयटी गुवाहाटी (डिपार्टमेंट ऑफ डिझाइन) आणि आयआयटीडीएम (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन अँड मॅन्युफॅक्चुरिंग) जबलपूर येथील पदवीस्तरीय डिझाइन (अभिकल्प) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. पुढील काही खासगी संस्थासुद्धा यूसीडमधील गुण ग्राह्य़ धरतात-

*  सृष्टी स्कूल ऑफ आर्ट अँड डिझाइन – बेंगळूरु

*  व्हीआयटी युनिव्हर्सटिी- वेल्लोर

*  सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- कोक्राझार

*  इंद्रप्रस्थ इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी -दिल्ली

*  इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन- नॉयडा

*  युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलिअम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीज – देहरादून

*  वर्ल्ड युनिव्हर्सटिी ऑफ डिझाइन -दिल्ली एनसीआर

* चंदिगढ युनिव्हर्सटिी निरमा इन्स्टिटय़ूट डिझाइन अहमदाबाद

*  स्वप्नपूर्तीची संधी –

देशात अनेक ठिकाणी आयआयटी असल्या तरी मुंबई आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा असं अनेकांचं स्वप्न असतं. विज्ञान शाखेतील बारावी झालेल्या विद्यार्थ्यांचं हे स्वप्न पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी या तिन्ही स्तरांवर साकार होऊ शकतं. पण वाणिज्य आणि कला शाखेतील बारावी विद्यार्थ्यांची आयआयटी मुंबईत शिकण्याची स्वप्नपूर्ती होण्याची संधी यूसीड या परीक्षेद्वारे मिळू शकते. कारण या शाखेतील विद्यार्थ्यांना बसता येतं.

*   अर्हता –

१) या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या खुल्या आणि नॉन क्रीमी लेअर इतर मागास वर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९९४ रोजी किंवा त्यानंतर झाला असावा. अनुसूचित जाती, जमाती आणि अपंग संवर्गातील विद्यार्थ्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९८९ रोजी वा त्यानंतर झालेला झालेला असावा.

२) गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयासह बारावी विज्ञान परीक्षा देणारे वा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तीनही संस्थांमधील अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. मात्र गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय न घेता बारावी विज्ञान, वाणिज्य, कला आणि मानव्य शाखेतील विद्यार्थी हे आयआयटी मुंबई आणि आयआयआयटीडीएम जबलपूर या संस्थेतील अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात.

३)बारावी परीक्षेत किमान गुणांसह उत्तीर्ण.

*  प्रवेश प्रकिया –

या परीक्षेची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया नियमित शुल्कासह ९ नोव्हेंबर २०१८ रोजी संपेल. उशिराचे अतिरिक्त ५०० शुल्क भरून १६ नोव्हेंबर २०१८पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करता येईल. सर्व संवर्गातील मुली आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क १२०० रुपये आहे, तर खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क २४०० रुपये आहे.

परीक्षा केंद्रे –  महाराष्ट्रातील नागपूर, पुणे आणि मुंबई.

* अशी असते परीक्षा –

या परीक्षेमध्ये तीन तास कालावधीचा एक पेपर असतो. या पेपरची भाषा इंग्रजी असून ही परीक्षा पूर्णपण संगणक आधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड आहे. पेपर ३०० गुणांचा असतो. या पेपरमध्ये पुढील तीन भाग (सेक्शन ए, बी आणि सी) असतात.

(सेक्शन ए)- न्युमरिकल म्हणजेच संख्यात्मक प्रश्न. यात प्रश्नाचे उत्तर एखादी संख्या असते. या प्रश्नांसाठी कोणतेही पर्यायी उत्तरे दर्शवली जात नाहीत. संगणक पडद्यावरील व्हच्र्युअल (आभासी) कीबोर्डाचा (कळफलक) उपयोग करून अचूक उत्तराची संख्या नोंदवावी लागते.

(सेक्शन बी)- मल्टिपल सिलेक्ट. या भागात प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय दिले जातात. यापकी एक किंवा त्यापेक्षा जास्त पर्याय बरोबर असू शकतात.

(सेक्शन सी)- मल्टिपल चॉइस प्रश्न. या भागातही प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय दिले जातात. मात्र यामध्ये एकच अचूक उत्तर असतं.

* अभ्यासक्रम

सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येत असल्याने पेपरची रचनासुद्धा तशीच केली जाते. त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची संरचना केली आहे. परीक्षेमध्ये ढोबळमानाने पुढील घटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.

* दृश्यात्मक संकल्पना समजण्याची क्षमता – यामध्ये चित्र, आकृती यावर आधारित प्रश्न विचारले जातात. २ डी आकार किंवा ३ डी वस्तूंमधील बदल, सुधारणा किंवा परस्पर संबंध याविषयी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची चाचपणी अशा प्रश्नांद्वारे केली जाते. दैनंदिन जीवनातील यांत्रिकी आणि शास्त्रीय संकल्पना यांचे ज्ञान.

*   निरीक्षण आणि अभिकल्प संवेदनशीलता – सामान्य वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती यामध्ये दडलेल्या गुणांचा शोध घेणे, त्याविषयी विश्लेषणात्मक विचारमंथन व निरीक्षण कौशल्य आणि संवेदनशीलतेची क्षमता. काही विशिष्ट बाबींकडे विशेष लक्ष पुरवून त्यांचे विश्लेषण, कारणमीमांसा, वर्गीकरण आणि भविष्यवाणी करण्याची क्षमता, दृश्यात्मक गुणधर्म आणि कलात्मक परिणाम यामधील सूक्ष्म फरक ओळखण्याची क्षमता.

* पर्यावरण आणि सामाजिक जाणीव – हवामान, लोकसंख्या, पाणी, प्रदूषण, वनस्पती, नसíगक संसाधने यासारख्या पर्यावरणीय घटकांबाबत सर्वसाधारण समज किंवा आकलन. या सर्व घटकांचे वस्तू, प्रतिमा आणि पायाभूत सुविधा यांच्या अभिकल्पावर होणारे परिणाम, अभिकल्पासंदर्भात सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांबाबत जाणीवजागृती, अभिकल्पित कलाकृतींचा इतिहास, पर्यावरणदृष्टय़ा टिकावू आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेले अभिकल्प. कला, साहित्य आणि शिल्पकलेचा इतिहास.

* विश्लेषणात्मक आणि ताíकक कारणमीमांसा –

दिलेल्या गुणात्मक आणि संख्यात्मक माहितीचे विश्लेषण आणि ताíकक विश्लेषणाची क्षमता, दिलेल्या माहितीतील अभिकल्प नमुने ओळखण्याचे कौशल्य. मत प्रदíशत करणे, वादविवाद करणे किंवा सुयोग्य निकषांच्या बाजूने उपाययोजना करण्याचे कौशल्य, दडवलेल्या बाबी वा कल्पनांचा शोध घेण्याची क्षमता, त्यासंदर्भातील निष्कर्षांसाठीचे पुरावे किंवा युक्तिवाद शोधण्याची क्षमता. छोटय़ा उताऱ्यातील माहितीचा उपयोग करून दिलेल्या उत्तरांमधून सर्वाधिक अचूक उत्तर शोधण्याची ताíकक क्षमता. माहिती विश्लेषण.

* भाषा आणि सर्जनशीलता –

इंग्रजी भाषेचा उपयोग व आकलनाच्या अनुषंगाने भाषा आणि सर्जनशीलक्षमता, वाचन कौशल्य, इंग्रजी व्याकरणाचे ज्ञान, वेगळ्या व नावीन्यपूर्ण सर्जनशील पर्यायांचा शोध घेण्याची व विचार करण्याची क्षमता,

* अभिकल्प विचारप्रणाली आणि समस्या निर्धारण –

दृश्यात्मक साम्य, रुपके, चिन्हे आणि प्रतीके यांचा उपयोग करण्याची क्षमता, व्यामिश्रता समजून घेण्याची क्षमता, समस्यांची ओळख, पर्यायांचा शोध, पर्यायांचे विश्लेषण आणि उपयांची निवड. यूसीड परीक्षा ही अभिकल्प कलचाचणी आहे. या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांचा अभिकल्प अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने कल, क्षमता, कौशल्य आणि कमकुवत बाजू समजून घेण्यासाठी प्रश्नांची संरचना केली जाते. चित्रकलेतील कौशल्य असल्यास उत्तम,  पण नसेल तरी तो या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तितकासा महत्त्वाचा पलू गणला जात नाही.