News Flash

प्रश्नवेध यूपीएससी : भारतीय चित्रकला

सामान्य अध्ययन पेपर पहिला

(संग्रहित छायाचित्र)

श्रीकांत जाधव

मुख्य परीक्षा

सामान्य अध्ययन पेपर पहिला

आजच्या लेखामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृती या विषयातील भारतीय चित्रकला, भारतीय साहित्य, भारतातील धार्मिक चळवळी व परकीय प्रवासी यावर २०१३ ते २०१८ दरम्यान  विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आकलनात्मक आढावा घेणार आहोत. याचसोबत प्रश्नाला अनुसरून नेमके व समर्पक उत्तर कसे लिहावे याची चर्चा करणार आहोत.

  • Discuss the Tandava dance as recorded in the early Indian inscriptions. (‘सुरुवातीच्या भारतीय शिलालेखामध्ये नोंद करण्यात आलेल्या ‘तांडव’ नृत्याची चर्चा करा.’) (२०१३, ५ गुण आणि १०० शब्दमर्यादा).

स्पष्टीकरण

*      हा प्रश्न संकीर्ण माहितीबरोबरच तांडव नृत्याची माहिती या दोन बाबींचा विचार करून विचारण्यात आलेला आहे.

*      या कलेची माहिती आपणाला शिलालेखामध्ये मिळते. शिवाय या कलेविषयी लेणी, मंदिरे तसेच साहित्यातही माहिती उपलब्ध आहे. या प्रश्नामध्ये मात्र शिलालेखामधील माहितीच्या आधारे चर्चा करणे अपेक्षित आहे. तसेच या शिलालेखाची माहिती म्हणजे कोणत्या कालखंडातील शिलालेख, त्याचे नाव इत्यादी विशिष्ट माहिती देऊनच चर्चा करावी लागते व त्यामुळे उत्तर अधिक समर्पक लिहिता येते.

  • Mesolithic rock cut architecture of India not only reflects the cultural life of the times but also a fine aesthetic sense comparable to modern painting. Critically evaluate this comment.. (‘आधुनिक चित्रकलेच्या तुलनेत भारतातील मध्याश्मयुग शिल्प स्थापत्य हे फक्त त्या वेळेचे सांस्कृतिक जीवनच दर्शवीत नसून त्यामधील सुरेख सौंदर्यपण दर्शविते, या भाष्याचे चिकित्सक मूल्यमापन करा.’) (२०१५, १२.५ गुण आणि २०० शब्दमर्यादा).

स्पष्टीकरण

*  या प्रश्नाचे व्यवस्थित आकलन केल्यास असे दिसून येते की, मध्याश्मयुगातील कलेचा सर्वात आधी आढावा घ्यावा लागतो. या काळातील मानवाने नसर्गिक गुहांमध्ये चित्रकला केलेली आहे. या चित्रकलेच्या माध्यमातून तत्कालीन जीवनाचे रेखाटन केलेले आहे. याचे सद्य:स्थितीतील पुरावे भारतातील भीमबेटका येथे उपलब्ध आहेत.

*  या चित्रकलेची वैशिष्टय़े व यातील सुरेखपणा आणि याची तुलना आधुनिक चित्रकलेशी करून आधुनिक चित्रकलेची वैशिष्टय़ेपण नमूद करावी लागतात. तसेच या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून मूल्यमापन करावे लागते. अर्थात यातील समानता आणि भिन्नता अशा अनुषंगाने चिकित्सा करणे अपेक्षित आहे.

  • Krishnadeva Raya, the King of Vijayanagar, was not only an accomplished scholar himself but was also a great patron of learning and literature. Discuss.

(‘विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय हा फक्त एक कुशल विद्वानच होता असे नाही, तो विद्या आणि साहित्याचाही आश्रयदाता होता. चर्चा करा.’) (२०१६, १२.५ गुण आणि २०० शब्दमर्यादा).

स्पष्टीकरण

*  हा प्रश्न एका व्यक्तीच्या कार्याशी संबंधित आहे. या प्रश्नाचे योग्य पद्धतीने उत्तर लिहिण्यासाठी सर्वप्रथम राजा कृष्णदेवराय याचे सांस्कृतिक योगदान नेमके काय होते याची माहिती असणे गरजेचे आहे. याचबरोबर तो एक कुशल विद्वान होता हे उदाहरणासह स्पष्ट करावे लागते.

* त्याच्या दरबारात असणाऱ्या विद्वानांची माहिती आणि त्या विद्वानांनी लिहिलेल्या साहित्याची थोडक्यात माहिती द्यावी. शिवाय त्याने विद्या आणि साहित्यवाढीसाठी कशा पद्धतीने विद्वानांना राजाश्रय दिलेला होता इत्यादी सर्व पलूंचा आधार घेऊन चर्चात्मक पद्धतीने उत्तर लिहिणे येथे अपेक्षित आहे.

  • How do you justify the view that the level of excellence of the Gupta numismatic art is not at all noticeable in later times? (‘गुप्त काळातील नाणीशास्त्र कलेमधील उत्कृष्टतेची पातळी नंतरच्या काळात मुळीच लक्षणीय नाही. तुम्ही या मताला, कशाप्रकारे सिद्ध कराल?’) (२०१७, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा)

स्पष्टीकरण

* भारतात नाणीशास्त्रामध्ये जी प्रगती झालेली होती याचे महत्त्वाचे कारण, गुप्त काळाच्या अगोदरपासूनच भारताचे युरोपमधील ग्रीक व रोमन साम्राज्यासोबत संबंध प्रस्थापित झालेले होते. युरोपमधील नाणीशास्त्र हे भारताच्या तुलनेत अधिक विकसित होते आणि याचा प्रसार भारतातही झाला आणि येथील राजसत्तेनेही या नाणीशास्त्राचे अनुकरण केले.

* गुप्त कालखंडाच्या शेवटी भारताचा रोमन साम्राज्यासोबतचा व्यापार संपुष्टात आलेला होता. भारतात गुप्त कालखंडानंतर भारतीय सरंजामशाहीचा उदय झालेला होता. त्यामुळे नंतरच्या काळात गुप्त काळातील नाणीशास्त्र कलेमधील उत्कृष्टतेची पातळी पाहावयास मिळत नाही असे मानले जाते. अशा पद्धतीने उत्तर संकीर्ण माहितीचा आधार देऊन लिहिणे अपेक्षित आहे.

  • Assess the importance of the accounts of the Chinese and Arab travellers in the reconstruction of the history of. (भारतीय इतिहासाच्या पुनर्रचनेमध्ये चायनिज आणि अरब प्रवासी यांच्या वृत्तान्ताचे महत्त्व याचे मूल्यांकन करा.) (२०१८, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा)

स्पष्टीकरण

* हा प्रश्न भारतीय इतिहासाच्या प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडाशी संबंधित आहे. प्राचीन भारतात म्हणजेच गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंडात फाहीयान, ह्य़ू-एनत्संग, इ-ित्सग या चायनिज प्रवासी यांनी भारताला भेटी दिलेल्या होत्या तसेच तत्कालीन भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींवर त्यांनी भाष्य केलेले होते आणि याचे पुरावे उपलब्ध आहेत.

* मध्ययुगीन भारताच्या सुरुवातीच्या काळात भारतात अरबांची आक्रमणे सुरू झालेली होती. यामुळे अरब प्रवाशांनी भारताला भेटी दिलेल्या होत्या. यामध्ये अल्बेरुनी, अल मसुदी इत्यादी प्रसिद्ध अरब प्रवासी होते. त्यांनी तत्कालीन भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींवर भाष्य केलेले होते आणि याचे पुरावे उपलब्ध आहेत.

*  प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये चायनिज आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अरब प्रवासी यांची यादी देऊन त्यांनी केलेल्या नोंदी, भाष्य व त्यांची पुस्तके याची उदाहरणे द्यावी. त्याद्वारे भारतीय इतिहासाच्या पुनर्रचनेमध्ये चायनिज आणि अरब प्रवासी यांच्या वृत्तान्ताचे महत्त्व अधोरेखित करून मूल्यांकन करणे गरजेचे आहे.

उपरोक्त चर्चा ही मुखत्वे प्रश्नाचे आकलन कोणत्या आयामावर करावे याची दिशा स्पष्ट करते. विषयाचा सर्वागीण आढावा आणि व्यापक समज असल्याखेरीज प्रश्नाचे योग्य आकलन करता येत नाही. याचबरोबर प्रत्येक प्रश्नासाठी शब्दमर्यादा आहे याचे भान ठेवणे गरजेचे आहे. या पुढील लेखामध्ये आधुनिक भारताचा इतिहास यावरील प्रश्नांची चर्चा करणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 12:14 am

Web Title: article about indian painting
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : चालू घडामोडींचे सर्वव्यापी स्वरूप
2 यूपीएससीची तयारी : वर्तन बदलण्याची प्रक्रिया
3 शब्दबोध : अक्षता
Just Now!
X