News Flash

एमपीएससी मंत्र : कायद्याचा अभ्यास

कायद्यांमधील महत्त्वाच्या घटकांचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सामान्य अध्ययन पेपर २ 

–  सुसंबद्ध कायदे

मागील लेखापर्यंत भारतीय राज्यव्यवस्थेच्या अभ्यासाबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आलेल्या विविध कायदे व अधिनियमांचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास कसा करावा याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

या विभागाचा जवळपास ७० ते ८०% भाग हा पेपर ३ वर overlap होतो. त्यामुळे हा विभाग परफेक्ट केला की पेपर ३ चा जवळपास २५% भागसुद्धा कव्हर होणार आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग खूप महत्त्वाचा आहे. कायद्यांमधील महत्त्वाच्या घटकांचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे.

या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास करायचाच आहे. मात्र एकूणच कायद्यांचा अभ्यास करताना काही मुद्दे साधारणत: लक्षात घ्यावे लागतील. यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले अधिनियम कसे अभ्यासायचे ते पाहू. या कायद्यामधील पुढील बाबींचे कलमे समजून घ्यावीत.

 • कायद्याची पार्श्वभूमी
 • महत्त्वाच्या व्याख्या
 • गुन्ह्य़ाचे स्वरूप
 • निकष
 • तक्रारदार (Complainant)
 • अपिलीय प्राधिकारी,
 • तक्रारी / अपिलासाठीची (असल्यास निर्णय देण्याची / कार्यवाहीची) कालमर्यादा
 • दंड / शिक्षेची तरतूद
 • अंमलबजावणीची प्रक्रिया – विहित मुदती, पाश्र्वभूमी, असल्यास विशेष न्यायालये
 • नमूद केलेले अपवाद

या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास करायला हवा. तसेच याबाबतच्या चालू घडामोडीही माहीत असायला हव्यात.

 • समाजकल्याण व सामाजिक विधिविधान

या कायद्यांपकी सामाजिक विधिविधानाचा भाग पेपर ३ च्या अभ्यासाचाही भाग आहे. या कायद्यांचा अभ्यास करताना भारतीय संविधान, मूलभूत अधिकार, राज्याची नीतिनिर्देशक तत्त्वे यांचा संदर्भ लक्षात घेऊन तरतुदी समजून घ्यायला हव्यात.

 • महिलांच्या संदर्भातील कायदे/ तरतुदी

घरगुती हिंसाचार व हुंडाबंदी कायद्यातील महिलांशी संबंधित कलमे व तरतुदी बारीक सारीक तपशिलांसहित पाहायला हव्यात. भारतीय दंड विधानातील (Criminal Procedure Code) महिलांच्या

बाबतीतील गुन्ह्य़ांबाबतच्या तरतुदीही सविस्तरपणे आणि बारकाईने तपशिलांसहित अचूक समजून घ्यायच्या आहेत. या विभागाबाबतचे प्रश्न पेपर २ व पेपर ३ मध्ये समांतरपणे विचारण्यात आलेले आहेत. यावरून याचे महत्त्व लक्षात येईल. माहिती अधिकार कायदा, २००५ मधील महिलांबाबतच्या तरतुदीही पाहायला हव्यात.

 • विशिष्ट समाजघटकांसाठी विधिविधान

या भागातील नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ व १९९५ च्या कायद्यांचा अभ्यास करताना वर सांगण्यात आलेल्या मुद्दय़ांबरोबरच या कायद्यांची उद्दिष्टे, अंमलबजावणी यंत्रणा व उपाययोजनांचाही अभ्यास करायला हवा. या परिपूर्ण अभ्यासाचा पेपर ३ च्या तयारीमध्ये खूप उपयोग होतो.

 • प्रशासनविषयक कायदे व उर्वरित नागरी कायदे
 • प्रशासनविषयक कायदे व उर्वरित नागरी कायदे यांचा अभ्यासक्रमातील मुद्दय़ांबरोबरच याआधी चर्चा केलेल्या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास गरजेचा आहे, विशेषकरून या कायद्यांच्या अनुषंगाने घडणाऱ्या चालू घडामोडी बारकाईने पाहायला हव्यात.
 • माहिती अधिकार अधिनियमातील माहिती आयोग, आयुक्त यांचे कार्य, अधिकार समजून घेतानाच लोकपालविषयक तरतुदीही समजून घेतल्यास फायद्याचे ठरते.
 • भारतीय पुरावा अधिनियम (Indian Evidence Act) यामधील फक्त कलम १२३चा अभ्यासक्रमात उल्लेख आहे. मात्र विषयाची व्यवस्थित समज येण्यासाठी कलम १२४ व १२५ ही समजून घेणे गरजेचे आहे.
 • कार्यालयीन गोपनीयता अधिनियम (Official Secrets Act) व फळक माहितीचा अधिकार अधिनियम हे जवळपास परस्पर विरोधी कायदे व पुरावा अधिनियमातील ही कलमे यांचा एकत्रित व विश्लेषणात्मक अभ्यास आवश्यक आहे.
 • भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील प्रकरण २- विशेष न्यायाधीश; प्रकरण ३ -शास्ती व दंडाची तरतूद या बाबी विशेषत्वाने पाहाव्यात.
 • सायबर सुरक्षा कायदा तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम यांच्यातील पारिभाषिक संज्ञा व विशिष्ट व्याख्या समजून घ्याव्यात. त्या आधारे तरतुदी समजून घेतल्यास त्या लक्षात राहणे सोपे होते.
 • ग्राहक संरक्षण कायदाही पेपर ३च्या अभ्यासाच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. यातील केंद्र, राज्य व जिल्हा अशा सर्व स्तरांवरील ग्राहक संरक्षण परिषदा, केंद्र, राज्य व जिल्हा अशा सर्व स्तरांवरील ग्राहक मंच आणि राष्ट्रीय ग्राहक आयोग यांची रचना, काय्रे, सदस्य, अधिकार, अपिलाची तरतूद या बाबी टेबलमध्ये तयार करता येतील. या तिन्हीमधील फरक समजून घ्यावा.
 • पेपर तीनमधील मानवी हक्कांचा जाहीरनामा, तसेच यासंदर्भातील ठराव, करार यांचाही संदर्भ या कायद्यांचा अभ्यास करताना घेणे दोन्ही पेपरच्या अभ्यासक्रमाची समज येण्यासाठी आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2018 2:35 am

Web Title: article about law study
Next Stories
1 कोलकात्यातील शैक्षणिक केंद्र जाधवपूर विद्यापीठ
2 भूगोलाच्या गतवर्षीय प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा
3 यशाचे प्रवेशद्वार : व्यवस्थापन शिक्षण आणि आपण
Just Now!
X