27 October 2020

News Flash

इंदिरा गांधी राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्रात अपंग उमेदवारांना विशेष संधी

अर्जदाराचे वय ४० वर्षांहून अधिक नसावे.

(संग्रहित छायाचित्र)

द.वा. आंबुलकर

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, नवी दिल्ली येथे अपंग उमेदवारांसाठी राखीव असणाऱ्या संशोधन अधिकारी पदासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

*   आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव – अर्जदारांनी पुरातत्त्वशास्त्र, कला, भाषाशास्त्र, इतिहास, संगीत, माहिती तंत्रज्ञान यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित विषयातील दस्तावेज लिखाण व संशोधनपर कामाचा कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असायला हवा.

*   वयोमर्यादा – अर्जदाराचे वय ४० वर्षांहून अधिक नसावे.

*   वेतनश्रेणी व भत्ते – निवड झालेल्या उमेदवारांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्रात संशोधन अधिकारी म्हणून दरमहा ९३००-३४८०० अधिक ४५०० श्रेणी भत्ता या वेतनावर नेमण्यात येईल.

वरील वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदेही देय असतील.

*   अधिक माहिती व तपशील – अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १ ते ७ सप्टेंबर २०१८ च्या अंकात प्रकाशित झालेली इंदिरा गांधी राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्राची जाहिरात पाहावी अथवा सांस्कृतिक केंद्राच्या  http://www.igcar.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

*   अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख – संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर (अ‍ॅडमिन), इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर दि आर्टस्, ११, मानसिंह मार्ग, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 4:44 am

Web Title: article about special opportunity candidates
Next Stories
1 जागतिकीकरण
2 परंपरा आणि आधुनिकतेचा संगम पंजाब विद्यापीठ
3 नोकरीची संधी
Just Now!
X