प्रथमेश आडविलकर

वाडिया इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयीन जिऑलॉजी, देहरादून

Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
Suicide attempt of college girl due to harassment incident in Bharti University campus
छेडछाडीमुळे महाविद्यालयीन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न, भारती विद्यापीठ परिसरातील घटना
IIIT Pune
आयआयआयटी पुणेमध्ये प्रवेशाच्या जागांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत उद्या पहिला पदवी प्रदान समारंभ

उत्तराखंड राज्याची राजधानी असलेल्या देहरादून या शहरात असलेली वाडिया इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयीन जिऑलॉजी ही संस्था हिमालय पर्वतराजी आणि परिसराच्या भूशास्त्रामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली एक स्वायत्त संशोधन संस्था असून ती सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न नाही.

*   संस्थेविषयी

वाडिया इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयीन जिऑलॉजी या संस्थेची स्थापना दिल्लीमध्ये जून १९६८ साली दिल्ली विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागामध्ये करण्यात आली. कालांतराने एप्रिल १९७६मध्ये संस्थेला देहरादून येथे हलविण्यात आले. सध्या संस्थेचे मुख्य कार्यालय देहरादून येथे असून नड्डा-धर्मशाला, डोकरीयन बामक ग्लेशियर स्टेशन आणि अरुणाचल प्रदेशमधील इटानगर या ठिकाणी संस्थेची तीन फील्ड सर्च स्टेशन्स आहेत. स्थापनेपासूनच संस्थेचे नाव इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयीन जिऑलॉजी असे होते. या संशोधन संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. डॅराशॉ नोशेरवान वाडिया यांनी हिमालयाच्या भूगर्भशास्त्रातील संशोधनातील दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांच्या स्मरणार्थ संस्थेचे नाव बदलून वाडिया इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयीन जिऑलॉजी असे ठेवण्यात आले. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांच्या कालावधीत वाडिया इन्स्टिटय़ूट हिमालयीन भूगर्भशास्त्र या संशोधन क्षेत्रातील एक उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपास आलेले आहे. संस्था संशोधनासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधांनी सज्ज आहे; म्हणूनच ही संस्था देशातील उच्चस्तरीय संशोधनासाठी असलेली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची एक प्रगत प्रयोगशाळा म्हणून ओळखली जाते.

*   संशोधनातील योगदान 

वाडिया इन्स्टिटय़ूट ही हिमालयीन जिऑलॉजी म्हणजेच हिमालयाचे भूगर्भशास्त्र या विषयामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. या संशोधनाबरोबरच संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) प्राधान्य देत इतर शाखांमधील मूलभूत संशोधनाशी योग्य समन्वय साधलेला आहे. वाडिया इन्स्टिटय़ूटच्या सुरुवातीच्या काही वर्षांत संशोधनाचा प्रमुख विषय ‘कठीण भूगर्भीय संरचना असलेले रिमोट क्षेत्र’ हा होता. त्यामुळेच, संस्थेने तेव्हा अरुणाचल हिमालय, कुमाऊंमधील उच्च हिमालय, लाहौल-स्पिती, लडाखचे सिंधू-सिवनी आणि काराकोरम हे विषय भूगर्भीय संशोधनासाठी प्राधान्यक्रमाने घेतले होते. सध्या वाडिया इन्स्टिटय़ूट पूर्व आणि पश्चिम हिमालयाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर संशोधन करत आहे.

संस्थेच्या संशोधनाच्या इतर विषयांमध्ये स्ट्रक्चर अँड टेक्टोनिक्स, बायोस्ट्रेटिग्राफी, जिओमॉफरेलॉजी अँड एन्व्हायर्मेटल जिऑलॉजी, जिओफिजिक्स, पेट्रोलॉजी अ‍ॅण्ड जिओकेमिस्ट्री, सेडीमेंटोलॉजी इत्यादी विषयांचा समावेश आहे.

वाडिया इन्स्टिटय़ूट विविध शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांना आपल्या संशोधनाच्या माध्यमातून सल्ला देते. संस्था प्रामुख्याने रस्ते  संरेखन, पुलांसाठी जागेची निवड आणि पुलांचा पाया, उताराची स्थिरता आणि घसरत्या भूगर्भाचे नियंत्रण, जलविद्युत प्रकल्प आणि संबंधित संरचना, प्रवासी आणि मालवाहू रोप वे, जलविद्युत प्रकल्पांचे सिस्मोटेक्टोनिक्स आणि विकासात्मक प्रकल्पांच्या पर्यावरण संभाव्यता, खोल टय़ूबवेल्ससाठी जागेची निवड, छोटय़ा तसेच मोठय़ा हायडेल प्रकल्पांसाठी आवश्यक असलेली भूगर्भीय व्यवहार्यता इत्यादी विषयांतील सल्लागार सेवा प्रदान करते.

संस्थेने आपल्या संशोधनावर आधारित असे एक संग्रहालय बनवले आहे. ज्याचे नाव एस. पी. नौटीयाल संग्रहालय असे आहे. संग्रहालयाच्या माध्यमातून संस्था विद्यार्थी व सामान्यजनांना भूगर्भीय संशोधनाबद्दल शिक्षित करत आहे. हे संग्रहालय शक्तिशाली हिमालय पर्वताबद्दल सर्व प्रकारची माहिती देते. त्यामध्ये हिमालयाची उत्पत्ती, वेळ आणि स्थानातील उत्क्रांती, नसíगक संसाधने, भूगर्भीय जीवन, भूकंप आणि पर्यावरणविषयक पलू इत्यादी गोष्टी प्रामुख्याने आढळतात. २००९ साली केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मदतीने संस्थेने हिमालयीन ग्लेशियोलॉजी सेंटरची स्थापना केली. हवामान बदलण्याच्या अनुकूलतेची रणनीती विकसित करण्यासाठी, हिमनद्यांवरील वातावरणाचा प्रभाव नियंत्रित करणारी कारणे समजून घेण्यासाठी हिमालयीन ग्लेशियोलॉजीवर समन्वयित संशोधन पुढाकार घेणे हे या केंद्राचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

*   विद्यार्थ्यांसाठी संधी

वाडिया इन्स्टिटय़ूट संशोधन केंद्राबरोबरच एक स्वायत्त शैक्षणिक केंद्रही आहे. त्यामुळेच संस्थेमध्ये पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. दरवर्षी गुणवत्ताप्राप्त अनेक जेआरएफ वा एसआरएफ विद्यार्थी वाडिया इन्स्टिटय़ूटमध्ये पीएचडीचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. संस्था महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समर ट्रेनिग आयोजित करते.

*    संपर्क

वाडिया इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयीन जिऑलॉजी, ३३, जीएमएस मार्ग, देहरादून – २४८००१.

दूरध्वनी:  +९१-०१३५- २६२५२१२.

ईमेल –   director@wihg.res.in

संकेतस्थळ –  http://www.wihg.res.in/

itsprathamesh@gmail.com